नत्र किंवा Nitrogen पिकाचे मुख्य अन्न-द्रव्य

नत्र किंवा Nitrogen पिकाचे मुख्य अन्न-द्रव्य ♥प्रगतशील शेतकरी♥
(नत्र सहसा युरीया वा अन्य मिश्र खताव्दारे पिकास देतो)

♥नत्र (नायट्रोजन-परमाणुभारांक १४.०१) – हें अधातुरूप मूलद्रव्य आहे. इ. स. १७७२ मध्यें डी. रुदरफोर्ड यानें हें प्रथम पृथक करून असें दर्शविलें कीं, हवेतील प्राण काढून टाकिला असतां एक वायु रहातो व त्याच्या अंगीं ज्वलनक्रिया किंवा श्वासोच्छास क्रिया यांनां मदत करण्याचें सामर्थ्य नसतें. वातावरणापैकीं सुमारें शें. ७९ भाग (आकारमानानें) नत्र आहे. संयोगीस्थितींत, सिंधुनत्रित, सोरा, अमोनियाचे क्षार व प्राणी आणि वनस्पति यांच्या पेशिजालांत व द्रवांत नत्र आढळतो. वातावरणांतील प्राण काढून टाकिला असतां नत्र मिळतो. ही गोष्ट कोंडलेल्या हवेंत स्फुर जाळल्यानें किंवा तापलेल्या तांब्याच्या किसावरून हवा घालविल्यानें करतां येते.

♥अम्ननत्रायित (किंवा सिधुनत्रायित व अम्नहरिदं यांचें मिश्रण); अम्मनत्रित व हरिद यांचें मिश्रण;  व अम्नद्विक्रुमित हीं तापविलीं असतां नत्र तयार होतो. नत्रहरिदाच्या निविष्ट द्रावणांत हरवायु सोडल्यास, नत्रहरिदावर उपहरायितें किंवा उपब्रुमायितें यांची क्रिया झाल्यास व अम्ननत्रितावर मंगलद्विप्राणिदक्रिया झाल्यासहि नत्र मिळतो.

♥जिवंत झाडें जमिनींतून नत्रससंयुक्त पदार्थ शोषून घेतात व त्यांवर त्यांचें पोषण होतें;  यास्तव ते संयुक्त पदार्थ फार महत्त्वाचे आहेत. जमिनींतील नत्रस कमी झाल्यास दुसरे घालावे लागतात यामुळें नत्रस खतांची मागणी सुरू झाली. हल्लीं खत तयार करण्याकरितां हवेंतील नत्राचा उपयोग करून घेतात.

♥नत्र हा रंगहीन, रुचिरहित व वासरहित वायु असून तो पाण्यांत फारच थोडा द्रवतो. तो हवेपेक्षां किंचित हलका आहे. तो स्वत: जळत नाहीं किंवा त्यांत दुसरें जळण्यासारखे पदार्थहि जळूं शकत नाहींत. नत्राचें द्रवीकरण झालेलें आहे. द्रवीभूत वायु १९५.५ श. उष्णमानावर उकळूं लागतो व त्यावेळीं त्यांचें विशिष्टगुरुत्व ८१.३ असतें.

♥जमिनीतील सेंद्रिय पदार्थ, तसेच निरनिराळी सेंद्रिय खतांतील कर्ब-नत्र गुणोत्तर फार महत्त्वाचे असते. जेव्हा जास्त कर्ब-नत्र गुणोत्तर असणारे सेंद्रिय पदार्थ जमिनीत मिसळले जातात तेव्हा सूक्ष्म जिवाणू कार्यान्वित होऊन कर्बाची मुबलक उपलब्धता झाल्यामुळे त्यांची संख्या वाढते. पीकपद्धतीमध्ये द्विदल पिकांची फेरपालट नत्राच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.
डॉ. विलास खर्चे

♥नत्राचे जमिनीतील प्रमाण, जमिनीचा प्रकार, पोत, सामू, हवामान, खतांचे व्यवस्थापन, पीकपद्धती इत्यादींवर अवलंबून असते. जसजसे तापमान वाढते, तसतसे जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे विघटन होत जाते आणि नत्र कमी होत जाते. हलक्‍या पोताच्या जमिनींच्या तुलनेत चिकण मातीयुक्त भारी जमिनीत नत्राचे प्रमाण चांगले असते.

♥पिके नत्राचे शोषण नायट्रेटच्या स्वरूपात करतात. आपल्याकडील उष्ण हवामानाच्या प्रदेशातील जमिनीत नत्राचे प्रमाण कमी असते. नत्राचे जमिनीतील प्रमाण, जमिनीचा प्रकार, पोत, सामू, हवामान, खतांचे व्यवस्थापन, पीकपद्धती इत्यादींवर अवलंबून असते. जसजसे तापमान वाढते, तसतसे जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे विघटन होऊन नत्र कमी होत जाते. हलक्‍या पोताच्या जमिनींच्या तुलनेत चिकण मातीयुक्त भारी जमिनीत नत्राचे प्रमाण चांगले असते.

♥नत्राचे शोषण -
१) जमिनीमध्ये नत्र मुख्यतः सेंद्रिय आणि असेंद्रिय अशा दोन स्वरूपांत आढळते. सर्वांत मोठ्या प्रमाणातील नत्र सेंद्रिय स्वरूपात असून, फक्त दोन टक्के नत्र असेंद्रिय स्वरूपात असते.
२) सेंद्रिय स्वरूपातील नत्राचे हळूहळू असेंद्रिय स्वरूपात रूपांतर झाल्यानंतरच हे नत्र पिकांना उपलब्ध होते. कारण पिकांची मुळे अन्नद्रव्यांचे शोषण धनायन किंवा ऋणायन या स्वरूपातच करीत असतात. त्यामुळे निरनिराळ्या सेंद्रिय पदार्थांमधील नत्र (उदा. सेंद्रिय खते, हिरवळीची खते, पीक अवशेष इत्यादी) सेंद्रिय स्वरूपात असते. त्याचे रूपांतर असेंद्रिय स्वरूपात झाल्याशिवाय यातील नत्र पिकास उपयोगी पडत नाही.
३) जमिनीतील सूक्ष्म जिवाणूंद्वारा या सेंद्रिय स्वरूपातील नत्राचे रूपांतर पिकांसाठी पोषणासाठी आवश्‍यक असणाऱ्या नायट्रेटच्या स्वरूपात होत असते.
४) जमिनीतील सेंद्रिय पदार्थ, तसेच निरनिराळी सेंद्रिय खतांतील कर्ब-नत्र गुणोत्तर फार महत्त्वाचे असते. जेव्हा जास्त कर्ब-नत्र गुणोत्तर असणारे सेंद्रिय पदार्थ जमिनीत मिसळले जातात (उदा. तृणधान्य पिकांचे कुटार, अवशेष) तेव्हा यांचे कर्ब-नत्र गुणोत्तर ३० ः १ किंवा त्यापेक्षा जास्त असते. तेव्हा सूक्ष्म जिवाणू कार्यान्वित होऊन कर्बाची मुबलक उपलब्धता झाल्यामुळे त्यांची संख्या वाढते, सेंद्रिय पदार्थ लवकर कुजतात. परिणामी त्यांची नत्राची गरज वाढते. ही गरज ते जमिनीतील नत्रातून भागवितात, त्यामुळे नत्राचे प्रमाण कमी होते.
५) जेव्हा कमी कर्ब-नत्र गुणोत्तर असणारे पदार्थ वापरले जातात (उदा. द्विदल वनस्पती, तसेच हिरवळीच्या खत पिकांसारखे सेंद्रिय पदार्थ) यांचे कर्ब-नत्र गुणोत्तर ३० ः १ पेक्षा कमी आहे. हे घटक वापरले जातात तेव्हा कर्ब कमी असल्यामुळे जिवाणूंची संख्या एकदम वाढत नाही. त्यामुळे सेंद्रिय पदार्थांतील नत्राचे विघटन होते. परिणामी जमिनीत पिकांसाठी आवश्‍यक असणारी नत्राची उपलब्धता वाढते. अशा तऱ्हेने वापरण्यात येणाऱ्या सेंद्रिय पदार्थातील कर्ब-नत्र गुणोत्तर महत्त्वाचे असते.
६) जास्त कर्ब-नत्र गुणोत्तर असणारे सेंद्रिय पदार्थ उदा. उसाचे पाचट, गव्हांडा यांचा योग्य वापर होण्यासाठी अल्प प्रमाणात नत्रयुक्त खत वापरून कुजण्याच्या प्रक्रियेचा वेग वाढविणे गरजेचे असते.

♥नत्र कमतरतेची लक्षणे -
१) नत्राच्या कमतरतेची लक्षणे प्रथम पिकाच्या जुन्या पानांवर दिसून येतात. नवीन पाने हिरवीच राहून जुनी पाने पिवळी पडतात.
२) नत्राच्या कमतरतेमुळे पिके वेळेआधीच पक्व होऊन उत्पादनात घट येते, प्रथिनांचे प्रमाण कमी होते. सर्वसाधारणपणे पिकांमधील नत्राचे प्रमाण एक टक्‍क्‍यापेक्षा कमी झाल्यास नत्राची कमतरता जाणवते.
३) अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे पीक दाखवतेच असे नाही. म्हणजे अन्नद्रव्यांचे प्रमाण पिकात आधीच कमी झालेले असते आणि कालांतराने कमतरतेची लक्षणे दिसू लागतात. प्रत्येक अन्नद्रव्याच्या कमतरतेची विशिष्ट लक्षणे उशिरा का होईना पिकावर विशिष्ट स्वरूपात दिसून येतात.
४) नत्राच्या कमतरतेचे प्रमुख लक्षण म्हणजे पिकाची वाढ खुंटलेली दिसून येते. नत्राच्या कमतरतेमुळे पिकांवर फुले कमी दिसतात.

♥नत्राच्या जास्त वापराचे विपरीत परिणाम -
१) नत्राचा जास्त वापर केल्यामुळे पिकांमध्ये लुसलुशीतपणा वाढतो, पाने खाली वाकतात, पिके फक्त उंच होऊन लोळतात, शर्करा आणि पोषणतत्त्वे कमी होतात.
२) नत्राच्या जास्त वापरामुळे पिकांची भरपूर आणि लुसलुशीत वाढ होऊन पिके किडी व रोगास संवेदनशील होऊन त्यांच्या प्रादुर्भावास बळी पडतात.
३)नत्राच्या अतिरिक्त वापरामुळे खतांची कार्यक्षमता कमी होते, जास्त शाखीय वाढ झाल्यामुळे उत्पादनात घट येते. ४) नत्राचा अतिरिक्त आणि जास्त वापर केल्यास नायट्रेट स्वरूपातील नत्र पिकांच्या मुळाच्या खोळीच्या थराखाली जाऊन भूगर्भातील पाण्याचे प्रदूषण करण्याचा धोका असतो.

♥नत्राचे स्रोत -
१) नत्राचा पुरवठा करण्यासाठी विविध सेंद्रिय स्रोत आणि खते वापरता येतात. सेंद्रिय घटकामध्ये नत्राचे प्रमाण कमी असते. त्यामुळे जास्त उत्पादन देणाऱ्या पिकाच्या जातीपासून शाश्‍वत उत्पादकतेसाठी या सेंद्रिय घटकांना विविध नत्रयुक्त खतांची जोड द्यावी लागते.
२) शेणखतामध्ये ०.५ टक्के नत्र असते. याचप्रमाणे कंपोस्ट, गांडूळखत, तलावातील गाळ, शहरी सांडपाण्यातून तयार केलेले स्लज, साखर कारखान्यातील मळी, कोंबडीखत, वराहखतातूनही नत्र उपलब्ध होते.
३) नत्राचे उत्तम स्रोत म्हणून हिरवळीची पिके, धैंचा, ताग, गिरिपुष्प, मूग, उडीद, चवळी यांची लागवड केल्यास वीस टन हिरवळीचे खत जमिनीला मिळते. त्यामुळे ४० ते ९० किलो नत्र प्रतिहेक्‍टरी जमिनीस मिळते.
४) पिकांची काढणी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पिकांचे अवशेष शिल्लक राहतात. निरनिराळ्या अवशेषांपासून ते कुजल्यानंतर बरेचसे नत्र जमिनीस मिळते. जवळजवळ ५ ते २० किलो नत्र प्रतिहेक्‍टरी या घटकातून जमिनीत मिसळले जाते.
५) पीकपद्धतीमध्ये द्विदल पिकांची फेरपालट नत्राच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.

♥नत्राचे स्थिरीकरण -
१) जैवरासायनिक प्रक्रियांद्वारा नत्राची मात्रा वाढविण्यासाठी महत्त्वाची आहे. जवळजवळ ४० ते २०० किलो नत्र प्रतिहेक्‍टर प्रतिवर्ष जमिनीला स्थिरीकरणाच्या स्वरूपातून मिळते.
२) काही प्रमुख पिकांमध्ये स्थिरीकरणाद्वारा मिळणारे नत्र उदा. सोयाबीनमध्ये १०५ किलो, चवळीमध्ये ९० किलो, भुईमुगामध्ये ४२ किलो, हरभरामध्ये ४० किलो आणि मुगामध्ये ७० किलो नत्र प्रति हेक्‍टरी प्रत्येक वर्षी मिळते.
३) हे नत्राचे प्रमाण द्विदल पिकाचा प्रकार, जमिनीतील नत्राचे प्रमाण, नत्रयुक्त खतांचा वापर स्फुरद व पालाश आणि दुय्यम अन्नद्रव्यांचा पुरेसा पुरवठा, तसेच तापमान, जमिनीतील ओलावा व सामू इत्यादींवर अवलंबून असते.

♥नत्राची कार्यक्षमता -
नत्राची कार्यक्षमता ही ५० टक्के असून, जमिनीत मिसळण्यात येणाऱ्या नत्रापैकी ५० टक्के नत्र पिकाद्वारा वापरण्यात येते आणि उर्वरित ५०टक्के नत्र जमिनीत राहते. त्यांपैकी काही चिकण मातीसोबत स्थिर होते आणि उर्वरित नत्र वातावरणात निघून जाते. त्यामुळे नत्राची कार्यक्षमता वाढविणे अत्यंत गरजेचे असते.

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!