आले पिकाची लागवड जास्त पावसाच्या प्रदेशात
भातशेती आणि आले संदर्भ ♥प्रगतशील शेतकरी♥
♥तांदुळ
महाराष्ट्राती सर्वाधिक दर हेक्टरी तांदळाचे उत्पादन देणारा जिल्हा कोल्हापुर आहे. परंतु भात पिकाचे क्षेत्र ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक आहे. कोल्हापुर क्षेत्रात हेक्टरी उत्पादन जास्त आहे तर निश्चितच लागणीखालील क्षेत्र वाढविणे फायद्याचे ठरेल कारण जमिन, हवामान आणि पर्जन्यमान कोल्हापुर जिल्ह्यात सोईस्कर आहे.
♥आले
आले पिकाची लागवड जास्त पावसाच्या प्रदेशात केली जाते, तर कमी पावसाच्या प्रदेशाच्या मात्र पाणी देण्याशिवाय पर्याय राहत नाही. आल्याची लागवड एप्रिल -मे महिन्यात करत असल्यामुळे पावसाची सुरवात होईपर्यंत सुरूवातीच्या काळात या पिकास पाणी देणे गरजेचे असते. कारण मुळांना स्थिरता प्राप्त होण्यासाठी आणि चांगला तग धरून राहण्यासाठी हा कालावधी महत्त्वाचा असतो, म्हणून लागवडीनंतर आंबवणीचे पाणी जमिनीच्या मगदुरानुसार तिसर्या - चौथ्या दिवशी लगेच द्यावे. पावसाळ सुरू झाल्यानंतर पावसाचे पाणी जमिनीमध्ये साठून राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. पावसामध्ये १०ते १२ दिवस खंड पडल्यास या पिकास पाणी द्यावे. हिवाळ्यात १२ ते १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
आधुनिक सिंचन पद्धतीने पाणी द्यावयाचे झाल्यास तुषार सिंचन, ठिबक सिंचन यासारख्या पद्धतींचा अवलंब करावा. गादीवाफा पद्धतीने या पिकाची लागवड करावी, एका गादीवाफ्यावर दोन ठिबक सिंचनाच्या नळ्या टाकाव्यात आणि २ लि. / तास एवढेच पाणी देणार्या तोट्या बसवाव्यात. जमिनीच्या मगदुरानुसार हा संच सुरुवातीस अर्धा ते पाऊण तास सकाळ - संध्याकाळ आणि त्यानंतर एक ते दीड तास चालवावा.
संकलित!
Comments
Post a Comment