देवनागरी लिपीला 'गणेशविद्या' असेही म्हणतात!
देवनागरी लिपीला 'गणेशविद्या' असेही म्हणतात!
एक प्रसिद्ध आख्यायिका आहे की, व्यासांनी श्रीगणेशाला महाभारत लिहिण्यासाठी लेखनिक होण्याची विनंती केली.
लिहिताना मला थांबावे लागू नये अशा प्रकारे सलग मजकूर सांगण्याची अट श्रीगणेशाने घातली.
सलग मजकूर सांगताना थोडी सवड मिळावी म्हणून व्यासांनी श्रीगणेशाला प्रतिअट घातली की, त्याने महाभारत लिहिताना नव्या आणि परिपूर्ण अक्षरसंचासह आणि नव्या परिपूर्ण लेखन पद्धतीने लिहिले पाहिजे.
श्रीगणेशाने ही अट पाळताना व्यासांच्या उच्चारांचे नीट अवलोकन केले.
उच्चारांशी सुसंगत अक्षरचिन्हे निवडली.
लेखन वेगाने होण्यासाठी श्रीगणेशाने जोडाक्षर पद्धती विकसित केली.
श्रीगणेशाने तेव्हा विकसित केलेल्या लेखन पद्धतीत काही बदल होत होत आजची मराठी देवनागरी लिपी उपलब्ध झाली आहे.
ही उपलब्ध लिपी अतिशय शास्त्रीय आहे.
जगातील सर्व मानवांना तेहेतीस मणके असतात.
या तेहेतीस मणक्यांशी या देवनागरी लिपीतील तेहेतीस चिन्हे एकास एक संगतीने जुळलेली आढळतात, त्यांना सध्या मराठी देवनागरी लिपीतील तेहेतीस व्यंजनचिन्हे म्हणून ओळखले जाते.
मणक्यांच्या वरील भागातील मुखाशी संबंधित सोळा उच्चारांशी सोळा अक्षरचिन्हे जुळलेली आहेत त्यांना मराठी देवनागरी स्वरचिन्हे म्हणून सध्या ओळखले जाते.
या चिन्हांच्या सहाय्याने श्रीगणेशाने जोडाक्षर पद्धतीही विकसित केली.
यासह तीन संयुक्त व्यंजनचिन्हेही श्रीगणेशाने निर्माण केली.
श्रीगणेशाने ही सर्व बावन्न चिन्हे ॐ या बीजाक्षराच्या विविध अवयवांपासून निर्माण केली होती.
या बावन्न चिन्हांचा उपयोग करून
२०७३७ दोन अक्षरी जोडाक्षरे,
७४६४९६ तीन अक्षरी जोडाक्षरे,
२६८७३८५६ चार अक्षरी जोडाक्षरे,
९६७४५८८१६ पाच अक्षरी जोडाक्षरे निर्माण होतात.
श्रीगणेश या देवाने हा अक्षरसंच व लेखन पद्धती निर्माण केली
आणि ती नागरिकांच्या वापरासाठी खूपच सोयीची ठरली म्हणून कोणीतरी विद्वानाने या व्यवस्थेला *देवनागरी लिपी* हे नाव दिले.
या लिपीतील *ग* , *ण* , *श* ही तीन अक्षरचिन्हे या लिपीतील इतर चिन्हांपेक्षा वेगळी आहेत.
या तीन चिन्हांच्या बाराखडीतील पहिल्या स्थानी सुट्टा काना आहे.
ग,ण,श या तीन अक्षरांचे हे वेगळेपण, ही स्वर व्यंजन व्यवस्था गणेश या देवतेनेच निर्माण केल्याचे सूचक मानून श्रद्धाळू गणेशभक्त देवनागरी लिपीला *गणेशविद्या* म्हणतात.
गणेशविद्या या चिन्ह व्यवस्थेत स्थळ, काळानुरूप बदल होत होत सध्या वापरात असलेल्या मराठी, हिंदी, तमिळ, कन्नड, बांग्ला, उडिया, मल्याळी, तेलुगू, गुजराती, पंजाबी, शारदा लिप्या विकसित झाल्या आहेत.
श्रीगणेशाने मानवाला दिलेल्या या वैज्ञानिक लेखन व्यवस्थेची माहिती गणेश चतुर्थी निमित्त सर्व जगापर्यंत पोचवावी हे सर्वांना आवाहन !
संकलित!
Comments
Post a Comment