गणपतीचे पत्र

*गणपतीचे पत्र*

होय मला गोड धोड खायला आवडतं. माझ्या बाबांप्रमाणे मी सिक्स पॅकवाला नाही. पण वर्गणीच्या नावाने धाकदपटशा करून खाल्लेला पैसा हा पदार्थ मला मुळीच आवडत नाही.

होय. मला माणसांमध्ये राहायला आवडतं. बाबांसारखं मी हिमालयात जाऊन बसत नाही. किंवा कार्तिकदादा सारखं मला स्त्रियांची ऍलर्जी नाही. पण अशक्य गर्दी करून लोकांना त्रास होणे हेही मला आवडत नाही.

होय. संगीताचा मी भोक्ता आहे. माझ्या या लांब कानांनी मी खूप काही ऐकतो/ऐकलंय. पण तुम्ही कानशत्रू लोक भसाड्या आवाजात जी काय आयटम सॉंग्ज लावता ती ऐकून माझे कान दुखायला लागतात.

होय. मी कलेचा भोक्ता आहे. १४ विद्या आणि ६४ कला मला  अवगत आहेत. पण क्वार्टर मारून रस्त्यावर लोळून केलेला नाच, मावा खाऊन पिचकाऱ्या मारून केलेली लाल रांगोळी याना मी कला समजत नाही.

होय. तुम्ही प्रेमाने दिलेल्या भेटवस्तू मला आवडतात. पण पैश्यांचे ओंगळ प्रदर्शन करून मला तुम्ही जे सोन्या दागिन्याने मढवून टाकता ते काय मला पसंत नाही. अरे मी काही गुंठामंत्री नाही रे बाबानो. प्रेमाने दिलेली दुर्वांची जुडी सुद्धा मी अभिमानाने डोक्यावर मिरवतो. एखाद्या लहानग्याने भक्तिभावाने नमस्कार करून हळूच माझ्यासमोरचा खोबऱ्याचा तुकडा उचलला कि मला २१ मोदक खाल्ल्यागत वाटतं.

अमुक एक गणपती नवसाला पावतो. करा गर्दी असे काही नसतं रे बाबानो. मी मीच आहे. लालबागचा राजा असो की तुमच्या डेस्कवर ठेवलेला फोटो. आमच्या आमच्यात काही भेदभाव नाही.

मला जरूर भेटा. मला आवडतं  ते. पण तुम्ही तुमचे काम प्रामाणिकपणे करा, शिस्त पाळा, नियम पाळा. या सर्वातून मी तुमच्या आजूबाजूला असल्याचं तुम्हाला जाणवेल. कारण फक्त दहा दिवस विशिष्ट मंडपातच थांबायला मी म्हणजे काही लिमिटेड डेटा पॅक नाही. मी स्वतंत्र लीज लाईन आहे.
आणी यावेळी घरचं कढवलेलं तूप द्या रे मोदकावर. ते विकतचे नको. 😖

*.... आपला गणपती बाप्पा.*

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

भगत सिंह के अनमोल विचार ... Bhagat Singh Quotes in Hindi & English