देशातील शेळ्यांच्या काही प्रसिद्ध जाती
देशातील शेळ्यांच्या काही प्रसिद्ध जाती♥प्रगतशील शेतकरी♥
सिरोही
सोजत
पतिरा
मालवा
बारबेरी
बीटल
हैद्राबादी जमनापारी
हंसा जमनापारी
जमनापरी
♥सिरोही ( अजमेरी/राजस्थानी) : राजस्थानातील शेळी. रंग तांबडा किंवा तपकिरी. अंगावर गर्द ठिपके. भारतात सर्वात जलद वाढणारी जात. नर ४५ ते ६० किलो. मादी ३० ते ५० किलो. बंदिस्थला सर्वात उत्तम.
♥सोजत : राजस्थानातील शेळी. रंग पांढरा अंगावर,कानावर व डोळ्यावर डाग. गुलाबी कानाच्या शेळीला जास्त किंमत. बकरी ईदला बोकडांना जास्त किंमत. नराचे ५० ते ७० किलो. तर मादी ३५ ते ४५ किलो. बंदिस्थला सर्वात उत्तम.
♥पतिरा : गुजरात मधील जात. रंग पांढरा. तोंडावर गुलाबी छटा. व गुलाबी कान. डोळ्यावर सुरकुत्या. नर ५० ते ६० किलो. व मादी ३५ ते ५० किलो. पतिरा दुर्मिळ जात असून महागडे व सुंदर म्हणून प्रसिद्ध आहे.
♥मालवा : मध्यप्रदेशातील जात. भोपाळ येथे प्रसिद्ध. रंगाने पांढरी. शिंगे असतात. नर ५० ते ८० किलो. व मादी ४० ते ५० किलो. मालवा बोकड कुर्बानीसाठी सर्वाधिक प्रसिद्ध. नर १०० किलो पेक्षा जास्तीत जास्त वजनाचे तयार होतात.
♥बारबेरी : उत्तर प्रदेशमधील अलीगड आग्रा मथुरा इ. ठिकाणी आढळते पांढरी किंवा लालसर ठिपके हरणासारखी दिसते बंदिस्तसाठी योग्य. बोकड ५०-६० किलो व शेळी ३५-४५ किलो आखूड पायांमुळे बुटकी वर्षात दोन वेते देते १.५ ते २ लिटर दुध दोन किंवा तीन करडांना जन्म देते
♥बीटल : ठराविक रंग नाही पंजाबमध्ये आढळते काळा व लालसर रंग जास्त आढळतो लांब कान मादी ४० ते ५० किलो व नर ५० ते ८० किलो दुध ३ ते ५ लिटर बंदिस्तला योग्य
पडतात -
♥हैद्राबादी जमनापारी : शुभ्र पांढरी व गुलाबी त्वचा. गुलाबी १ फुटापर्यंत असलेले कान. या शेळ्या कमी प्रमाणात असल्याने शौकीन लोक जास्तीत जास्त किमतीला खरेदी करतात.
♥हंसा जमनापारी : पांढरी शुभ्र व नाजूक शेळी. अत्यंत नजाकतदार व डाग विरहीत असल्याने महाग विकली जाते.
♥जमनापरी : उत्तर प्रदेशातील यमुनेच्या खोऱ्यातील शेळी. दुध व मांस दोन्हीसाठी उत्तम. पांढरा, पिवळसर रंग, मान व मागील पायांवार केस किंवा दुमडलेले लांब कान, बोकडाचे वजन ६० ते ९० किलो. शेळी ५० ते ६० किलो. दुध देण्याची क्षमता २ ते ४ लिटर. शेळीला बंदिस्त पेक्षा फिरणे आवडते.
संकलित!
Comments
Post a Comment