श्री गोंदवलेकर महाराजांनी आपल्या साधकांसाठी चार अनमोल रत्ने

श्री गोंदवलेकर महाराजांनी आपल्या साधकांसाठी चार अनमोल रत्ने दिली आहेत.

*१) पहिले रत्न आहे...माफी*

*तुमच्यासाठी कोणीही काहीही बोलू द्या, ते कितीही क्लेशदायक असले तरीही आपल्या मनावर घेऊ नका आणि त्यासाठी प्रतिकार ही करु नका व ती भावनाही मनात ठेवू नका. उलट त्यांना माफ करा.*

*२) दुसरे रत्न..विसरून जाणे*

*आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा. कधीही त्या केलेल्या उपकाराचा पुनर्उच्चार, प्रतिलाभ, लोभ ठेवू नका.*

*३) तिसरे रत्न...विश्वास*

*नेहमी आपल्या मेहनतीवर आणि श्री रामरायांवर अतुट विश्वास ठेवा. हेच खरे सफलतेचे सूत्र आहे.*

*४) चौथे रत्न...वैराग्य*

*हे नेहमी लक्षात ठेवा की जसा आपला जन्म झाला आहे, तसाच एक दिवस आपला मृत्यू ही आहेच म्हणून लीन होऊन आनंद घ्या व वर्तमानात जगा.*

ll जय श्रीराम ll

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

ओशो के अनमोल विचार ... Osho great thought in Hindi & English ...