श्रीगुरूकृपा I

श्रीगुरूकृपा I

ज्यासी होय श्रीगुरूकृपा I त्यासी कैचें दैन्य पाप I

कल्पवृक्ष आश्रय करितां बापा I दैन्य कैंचें तया घरीं II

दैवें उणा असेल जो नरु I त्याणें आश्रयावा श्रीगुरू I

तोचि उतरेल पैलपारु I पूज्य होय सकळिकांसी II

जो कोण भजेल श्रीगुरू I त्यासी लाधेल इह परू I

अखंड लक्ष्मी त्याचे घरीं I अष्ट ऐश्वर्ये नांदती II

सिद्ध म्हणे नामधारकासी I श्रीगुरूमहिमा असे ऐसी I

भजावें तुम्हीं मनोमानसीं I कामधेनु तुझ्या घरीं I।

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!