चुनखडीयुक्त जमीन

चुनखडीयुक्त जमीन♥प्रगतशील शेतकरी♥

भारतामध्ये जवळपास 228.8 दशलक्ष हेक्टर जमीन चुनखडीयुक्त असून हे क्षेत्र एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 69. 4 टक्के आहे.

समशीतोष्ण आणि कोरडया हवामानामध्ये अशा जमिनी हमखास आढळतात.

या जमिनीत चुन्याचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा ( ५ टक्क्यापेक्षा) जास्त झाल्यास अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेचे प्रश्न निर्माण होऊन अन्नद्रव्यांचे संतुलन बिघडते.

जमीन जेव्हा चुनखडीयुक्त असते तेव्हा नत्र, स्फुरद, पालाशचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी विशेष काळजी घेऊन अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करायला हवे.

चुनखडीयुक्त जमिनीतील पिकांच्या अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी सविस्तर तांत्रिक आणि शास्त्रीय माहिती असणे आवश्यक आहे.

पिकांना योग्य अन्नद्रव्यांचा, योग्य वेळेनुसार आणि वाढीनुसार पुरवठा करून पिकांची उत्पादन  क्षमता वाढविणे सहज शक्य आहे. त्यासाठी पिकांना आवश्यक असणाऱ्या 16 ते 18 अन्नद्रव्यांच्या पुरवठ्यामध्ये जमिनीत भौतिक स्थिती योग्य असली पाहिजे.

जमिनीचा सामू (pH), क्षारता (EC), सेंद्रिय कर्ब (C) आणि चुनखडी (CaCO3) प्रमाण योग्य असेल तर पिकाची योग्य वाढ होऊ शकते.

परंतु चुनखडीचे प्रमाण जमिनीमध्ये जास्त असेल तर पिकांना अन्नद्रव्यांचा पुरवठा कमी होइन उत्पादनात लक्षणीय घट येते.

♥चुनखडीयुक्त ( कॅल्शियम कार्बोनेट युक्त ) जमीन
म्हणजे काय ? ♥प्रगतशील शेतकरी ग्रुप♥
(शेतकरी करिता जमिनच्या प्रतविषयक अतिआवश्यक माहिती..)

♥ज्या जमिनीमध्ये मुक्त चुन्याचे ( कॅल्शियम कार्बोनेट ) प्रमाण जास्त असते त्या जमिनीस चुनखडीयुक्त जमीन म्हणतात.

♥जमिनीमध्ये मुक्त चुन्याचे प्रमाण 5 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर अशी जमीन चुनखडीयुक्त समजावी.

♥या जमिनी ओळखण्यासाठी दुसरी सोपी पद्धत जमिनीचा उभा छेद घेऊन त्यावर सौम्य हायड्रोक्लोरिक आम्ल शिंपडावे. जर आम्ल शिंपडल्यानंतर जमिनीवर बुडबुड्यासारख्या फेस दिसला तर जमीन चुनखडीयुक्त आहे असे समजावे.

♥जगाच्या पाठीवर या जमिनीचे प्रमाण 30 टक्क्यांपेक्षा जास्त असून मुक्त चुन्याचे प्रमाण जास्तीत जास्त 95 टक्क्यापर्यंत आढळले आहे.

♥ज्या जमिनीमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण, जमिनीच्या विनिमय क्षमतेपेक्षा जास्त असते, अशा जमिनी चुनखडीयुक्त वर्गामध्ये समाविष्ट होतात.

♥जमिनीची विनियम क्षमता एकुण धन आयन धारण करण्याच्या क्षमतेच जमिनीची विनियम क्षमता म्हणतात. यामध्ये Ca++, Mg++, Na+, K+, Al+++, H++, fe++ अशा धन आयनांचा समावेश होतो.

♥चिकण आणि पोयट्याच्या जमिनीची विनिमय क्षमता इतर जमिनीपेक्षा जास्त असते. या उलट वालुकामय जमिनीची विनिमय क्षमता अत्यंत कमी असते.

संकलित!

♥चुनखडीयुक्त जमीन तयार होण्याची कारणे 

चुनखडीयुक्त जमिनी नैसर्गिकरित्या उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधात आणि आणि वाळवंटी भागात आढळतात.

महाराष्ट्रामध्ये कोकणपट्टी, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर येथील काही जमिनीचे क्षेत्र वगळता चुनखडीयुक्त जमिनी सर्वदूर आहेत.

मराठवाडा आणि विदर्भामध्ये अशा जमिनीचे प्रमाण अत्यंत जास्त आहे.

या जमिनी तयार होण्याचे प्रमुख कारण म्हणजे जमिनीतील क्षारांचा निचरा होण्यासाठी लागणारा पाऊस अपुरा पडतो आणि मुक्त चुन्याचा निचरा जमिनीतून न होता तापमान वाढल्यानंतर खालच्या थरातील चुनाही वरच्या थरात येतो.

महाराष्ट्रातील जमिनी काळ्या बेसाल्ट खडकापासून तयार झालेल्या आहेत. या खडकामध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशिअम, पोटॅश आणि सोडियमयुक्त खनिजांचे प्रमाण अधिक असते. या खनिजांचे विदारण होऊन मुक्त चुन्याचे प्रमाण वाढते, अशा जमिनीमध्ये वरच्या थरापासून खालच्या थरापर्यंत मुक्त चुन्याचे प्रमाण वाढते आणि मशागतीमुळे ( खोल नांगरणी ), खालच्या थरातील चुना वरच्या थरात येतो.

♥जमिनीमध्ये चुनखडी दोन प्रकारची आढळते.

१ . चुनखडी खडे व
२ . चुनखडी पावडर.

चुनखडी पावडर हि चुनखडी खड्यापेक्षा जास्त क्रियाशील असल्यामुळे जास्त दाहत असते.
बऱ्याचवेळा चुन्याचे प्रमाण खालच्या थरात वाढत जाऊन तेथे अत्यंत कठीन चुन्याचा पातळ थर तयार होतो, अशा थरामुळे पाण्याच्या निचरा होत नाही आणि पाणी साठून राहते.

पाण्यामध्ये जर विद्राव्य चुन्याचे प्रमाण जास्त असेल ( उदा. बोअरच्या पाण्यामध्ये जास्त चुना असल्याची शक्यता असते) आणि ओलितासाठी या पाण्याचा उपयोग केला तर जमिनी चुनखडीयुक्त होतात.

जमिनीमध्ये चुन्याचे प्रमाण जर 3 ते 4 टक्क्यांपर्यंत असेल तर अशा जमिनी उत्पादनक्षम असतात आणि या जमिनीमध्ये अन्नद्रव्याच्या उपलब्धतेचे प्रश्न निर्माण होत नाहीत.

जमिनीतील चुन्याचे प्रमाण ५ टक्क्यापेक्षा जास्त झाल्यानंतर अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होते.

♥पिकांच्या अन्नद्रव्ये व्यवस्थापनामध्ये मुक्त चुन्याचा सहभाग

चुनखडीयुक्त जमिनीची सामू अल्कलीधर्मी असतो. यामध्ये विद्राव्य स्वरूपातील कार्बोनेट आणि बायकार्बोनेटचे प्रमाण जास्त असते. यामुळे सामू सर्वसाधारण ७.५ ते ८.५ असतो. सामू ८.५ च्या वर शक्यतो जात नाही.

जर सोडियमचे प्रमाण जास्त झाले तर सामू ८.५ च्या वर जाण्याची शक्यता असते. या जमिनी १०० टक्के अल्कलीधर्मी संयुगाने युक्त असतात आणि कॅल्शियम मातीमध्ये विद्राव्य स्वरूपात आणि पोयट्यावर विनिमयक्षम स्वरूपात आढळते.

चुनखडीयुक्त जमिनीमध्ये अन्नद्रव्याची उपलब्धता कमी होते. त्यामुळे पिकाची हरितद्रव्याचे प्रमाण अत्यंत कमी होऊन वाढ खुंटते. काही वेळा बायकार्बोनेटचे प्रमाण मातीच्या द्रावणात वाढल्याने पिकांना अपाय होऊ शकतो.

या सर्व बाबींचा विचार करून चुनखडीयुक्त जमिनीमध्ये अन्नद्रव्याचे व्यवस्थापन करावे लागते. कारण चुनखडीयुक्त सामू वाढल्यामुळे काही अन्नद्रव्यांचा जमिनीतून नायनाट होतो तर काही अन्नद्रव्य इतर संयुगांना बांधले जाऊन पिकाना उपलब्ध होत नाहीत.

चुन्यामुळे प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षरीत्या नत्र, स्फुरद, मॅग्नेशियम, पालाश, मॅगनीज, जस्त, तांबे आणि लोह यांच्या उपलब्धेवर विपरित परिणाम होतो.

नत्रयुक्त खते जमिनीमध्ये ताबडतोब मिसळली जातील याची खात्री करून घेणे अत्यावश्यक आहे. अन्यथा नत्राचे स्वरूप बदलून त्याचा अमोनिया वायू तयार होऊन हवेत निघून जातो.

कार्बोनेटचे प्रमाण चुनखडीयुक्त जमिनीत जास्त असल्याने स्फुरद आणि मॉंलिब्डेनमची उपलब्धता कमी होते.

याचबरोबर लोह, बोरॉन, जस्त आणि मॅगेनीजची कमतरताही अशा जमिनीमध्ये ठळकपणे जाणवते. कारण जास्त चुन्यामुळे सामू वाढतो आणि सामू वाढल्यामुळे वरील अन्नद्रव्ये अविद्राव्य स्वरूपात जातात. तसेच कार्बोनेटमुळे नत्राचे वायूमध्ये रूपांतर होण्याची क्रियेची गती वाढते.

सर्वसाधारणपणे पिकांच्या मुळाच्या भोवती आम्लधर्मी वातावरण असते तसेच द्विदल धान्य मुळाद्वारे हायड्रोजन सोडून मुळाभोवती वातावरण आम्लधर्मी ठेवतात.

चुनखडीयुक्त जमिनीत या क्रियेत बदल होऊन पिकांच्या मुळांची वाढ योग्य प्रकारे होत नाही. यामुळे लोहासारखा अन्नद्रव्याची कमतरता प्रकर्षाने जाणवायला लागते. कारण लोह आम्लधर्मी वातावरणात जास्त उपलब्ध असते आणि अल्कलीधर्मी वातावरणात लोहाची उपलब्धता कमी होते. या क्रियेमध्ये कार्बोनेटचे सहभाग जास्त होऊन लोह पिकास उपलब्ध होत नाही.

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!