आले लागवड अशी कराल

आले
पेरणीचे तंत्र

पीक नियोजन

चुनखडक युक्त जमिनीत पीक चांगले येते पण त्यावर पिवळसर छटा कायम दिसते. निचरा होणारी, कसदार जमीन उपयुक्त. गाळमिश्रित नदीकाठची जमीन उत्तम. एकाच जमिनीत वारंवार पीक घेतल्यास मर रोगाच्या प्रादुर्भावाची शक्यता.

जमीन निवडताना लव्हाळा, हराळी, कुंडा ई. तंणाचा प्रादुर्भाव नसावा.

लागवडीसाठी जमिनीची खोली कमीत कमी 30 cm असावी, आम्लधर्मी, खारवट, चोपन जमीन टाळा, किंचित आम्लयुक्त सामू असलेली जमीन (सामू 6.5-7) मानवते.
बेणे रोगमुक्त भागातून निवडा. वाफे तयार करताना सूर्यप्रकाशात जमीन तापु दिल्याने बुरशीला अटकाव होतो. 

आंतरपीक म्हणून कोथिंबीर, झेंडू, मिरची, तूर, गवार यासारखी पिके घेता येतात. 

टोमॅटो, बटाटा, मिरची, वांगे आणि मटार या पिकानंतर आले हे पिक घेऊ नये. ही रोपे कूज करणा-या जीवाणूचे वाहक असतात.

हंगामी कडधान्याची आल्यासोबत उगवण केल्यास तणांची वाढ तसेच, मातीचे प्रदूषण कमी होते आणि जमिनीचा पोत सुधारतो.

25 % सावलीमध्ये चांगल्या प्रमाणात वाढते. नारळ, सुपारी, कॉफी मध्ये आंतरपिक म्हणून घेतल्यास उत्पादन वाढते.

5-10 m चा प्रतिरोधक पट्टा शेताभोवती लावा. आले-केळी- व्दिदल धान्य सारखी पिके फेररचनेसाठी वापरु शकतात.

20-30 ग्रॅम वजनाचे, कमीत कमी 1 डोळा असलेले बेणे जमिनीत 5 cm खोलीवर लावा. नंतर मतिने झाकून घ्या व हाताने हलके दाबा.

बीजदर 1800 kg / ha जास्त उंचीच्या प्रदेशासाठी. लागवडीनंतर लगेच पाणी द्या. उन, पावसापासून रक्षण होण्यासाठी सेंद्रिय आच्छादन पसरा. 

बेण्याची पंधरा दिवसात रुजवण होते. रुजवण होण्याआधी पाणी देऊ नये.

साधारणपणे पाण्याची सोय असल्यास लागवड अक्षय तृतीयेपासून सुरु करून जून पहिल्या आठवड्यापर्यंत संपवा. चांगल्या गुणवत्तेचे बेणे निवडा.

जमीन तयार करणे

1 फूट खोल उभी-आडवी नांगरट व 1-2 कुळवाच्या पाळ्या द्या व जमीन भुसभूसीत करा. स्फुरद, पालाशचा संपूर्ण हफ्ता द्या. शेवटच्या कुळवाच्या पाळी आधी 35 - 40 टन / हे चांगले कुजलेले शेणखत टाका. 

गादीवाफा. काळी जमिन, आधुनिक सिंचनाचा वापर अश्या ठिकाणी फायदेशीर, 15-20 % अधिक उत्पन्न मिळते. जमिनीच्या उतारानुसार वाफ्याची लांबी ठेवा.

जाती

लोकप्रिय जाती पुढीलप्रमाणे
जातकालावधीउत्पादनवैशिष्टेमाहीम210 दिवसात तयार होते23.2 टन/हे.तंतूचे प्रमाण 3.26 % असते. फुटवे 12 - 13 . सूत्रकृमीस प्रतीकारक. सुंठ प्रमाण 19 % आढळते.वरदा200 दिवसात तयार होते22.3 टन/हे.सरासरी 9-10 फुटवे, रोग व किडीस प्रतिकारक, सुंठेचे प्रमाण 20 % आढळते.रिजाथा200 दिवसात तयार होते22.4 टन/ हे.तंतू व सुगंधी द्रव्याचे प्रमाण जास्त 2.36%. 200 दिवसात तयार होते, 8-9 फुटवे. सुंठ प्रमाण 23 %.

काही अन्य जाती. सुप्रभा, सुरुची, सुरभी, हिमगिरी

बीजप्रक्रिया

प्रथम रसायनांची प्रक्रिया करुन नंतर ते सावलित सुकवुन त्यावर जैविक खताची प्रक्रिया करावी.
कंदाची 25 % क्विनालफोस 20 ml किंवा 30 % डायमेथोएट 10 ml पैकी एक + 50% कार्बेन्डाझिम 25 gm किंवा डायथेन एम 45, 30 ग्रॅम / 10 Ltr पाण्यात मिसळून प्रक्रिया करा. कंद 10-15 मिनटे द्रावणात बुडवा. 
10 लिटरचे द्रावण 100-120 किलो बियाणाला पुरते. त्यानंतर पाणी ओतुन त्यात दिलेल्या प्रमाणात औषधे मिसळा व बियाणे सावलीत सुकवा.नंतर अझोस्पाइरिलियम 25 ग्रॅम तसेच पी.एस.बी 25 ग्रॅम प्रति लि. पाण्यात घेवुन त्यात 10-15 min बुडवा व लागण करा.

लागवड पद्धत

लागवड करताना कंदावरील डोळा वरती आणि बाहेरच्या बाजूस असावा. त्यातुन निपजणारा कोंब मजबूत असतो व वाढ चांगली होते. 
15 cm उंची, 1 m रुंद व आवश्यक लांबीचे गादीवाफे तयार करा, दोन वाफ्यातील अंतर 50 cm ठेवा.गादीवाफा.135 cm वर सरी घ्या त्यामुळे मधील वरंबा 90 cm रुंदीचा होतो, दोन वरंब्यातील पाटाची रुंदी 45 cm व वरंब्याची उंची 20- 25 cm ठेवा. त्याच्यावरती 22.5 cm x 22.5 cm वरती लागवड करा. 

सपाट वाफा. पोयटा किंवा वाळूमिश्रित जमिनीत योग्य. उतारानुसार 2 x 6 m किंवा 2 x 3 m चे वाफे तयार करा. 2 लाख / हे. रोपांसाठी 20 x 22 cm किंवा 22.5 x 22.5 cm अंतर ठेवा. सपाट वाफे 3 x 2 m आकाराचे, 2 वरंब्यात 60 cm अंतर ठेवा. दोन वाफ्यामध्ये 30 cm चे पाण्याचा निचरा होण्यासाठी पाट बनवा. 

सरीवरंबा. मध्यम भारी जमिनीसाठी उपयुक्त. 45 cm वर नांगराच्या सहाय्याने सर्‍या पाडून घ्या. वरंब्याच्या दोन्ही बाजूस 1/3 भाग सोडून 2 इंच खोल आल्याची लागवड करा. दोन रोपातील अंतर 22.5 cm ठेवा.
सेंद्रिय शेती. खुरपणीच्या सहयाने उथळ खडडा करून त्यात बेणे पुरा व चांगले कुजलेले शेणखत टाका किंवा ट्रायकोडर्मा मिश्रित 10 ग्रॅम कंपोस्ट टाका .

तण व्यवस्थापन

लागवडीनंतर 15-20 दिवसात खुरपणी करावी. 

लागवडीनंतर 2 ते 3 दिवसांत जमीन ओलसर असताना अ‍ॅट्राझीन 4 - 5 ग्रॅम/ 1 Ltr पाण्यातुन फवारा.

लागवडीनंतर 12-15 दिवसांनी ग्लायफोसेट 1 लि. पाण्यात 4 - 5 मिली घेऊन केवळ तणांवर फवारा. पहिली फवारणी नंतर उगवलेल्या तणांचा नायनाट होतो.

आले उगवण्यास सुरवात झाली की तणनाशकाचा वापर टाळावा.

आंतरमशागत

वेळच्या वेळी तणांची खुरपणी करा. पिकात उटाळनि करणे गरजेचे. लांब दांड्याच्या खुरपण्याने माती हलवा.

उटाळनि केल्याने मुळ्या तुटून त्या ठिकाणी नवीन तंतुमय मुळे फुटतात. उटाळनि 2.5 ते 3 महिन्याचे असताना करा.

उटाळनि नंतर पाण्याचा हलका ताण द्यावा म्हणजे फुटवे चांगले येतात.
6 ते 7 व्या महिन्यात फुले येतात. त्यांना हुरडेबांड म्हणतात. उशिरात उशिरा उटाळनि हुरडेबांड येण्यापुर्वी करा. 

हुरडेबांड फुटल्यानंतर पानांची वाढ थांबून फण्याचि वाढ होण्यास सुरवात होते. उटाळनि केली नाही तर उत्पादनामध्ये 10-15 % घट होते.

पिकाचे पोषण

जैविक खते

चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट @ 5-6 t/ha  पेरणीच्या वेळी देणे. निंबोळी केक @ 2 t/ha चा वापर करणे फायद्याचे ठरते.
लागवडीच्या वेळी 2 टन/ha निंबोळी पेंड जमिनीत घातल्यास कंद कूज, सूत्रकृमी यांच्यापासून पिकाचे संरक्षण होते.

रासायनिक खते

170 kg युरीया, 300 kg SSP व 80 Kg MoP प्रती हेक्टर द्यावे. संपूर्ण SSP व अर्ध्ये MoP पेरणीच्या वेळी द्यावे. 

भर खते kg/ha. पेरणी नंतर 30,60,90 व120 दिवसांनी 25:25:18 ( 55 kg/ ha युरीया, 120 kg/ha सिंगल सुपर फोस्फेट, 30 kg/ha पालाश)
द्यावे.

संप्रेरके

उत्पादन वाढण्यासाठी व तंतूचे प्रमाण कमी करण्यासाठी युरीया@20gm/Ltr+ प्लॅनोफिक्स@0.4gm/Ltr 60व 70व्या दिवशी लागवडीनंतर फवारा
फुटव्याची संख्या वाढवण्यासाठी 200 ppm इथ्रेलची 75 व्या दिवसापासून 15 दिवसांच्या अंतराने 3 फवारण्या कराव्यात. 

सुक्ष्म अन्नद्रव्ये

लागवडीच्या वेळी 6 kg झिंक (30 kg झिंक सल्फेट ) दिल्यास पिकाच्या उत्पादनास फायदा होतो.
कंद वाढीच्या काळात बोरॉन, लोह आणि झिंक कमतरता भरून काढण्यासाठी 375 gm फेरस सल्फेट, 375 gm झिंक सल्फेट, 375 gm बोराॅक्स, 375 gm युरीया 250 Ltr / ha पाण्यामध्ये मिसळून फवारा. दोन वेळा फवारणी करा. 
किंवा
लागवडीनंतर 10-15 दिवसांनी 19:19:19 2.5 -3 ग्रॅम+सुक्ष्म अन्नद्रव्ये 2.5 -3 ग्रॅम+चिलेटेड झिंक 1 ग्रॅम प्रती लिटर पाण्यातून फवारा.

लागवडीनंतर 40-45 दिवसांनी चिलेटेड फेरस 1 ग्रॅम+सुक्ष्म अन्नद्रव्ये 2.5 -3 ग्रॅम प्रती लिटर पाण्यातून फवारा.

लागवडीनंतर 4 महिन्यांनी 0:52:34 4-5 ग्रॅम+मायक्रोन्युट्रीएंटस् 2.5 -3 ग्रॅम प्रती लिटर पाण्यातून फवारा.

लागवडीनंतर 6 महिन्यांनी 2-3 वेळेस 0:52:34 4-5 ग्रॅम+बोरॉन 1 ग्रॅम प्रती लिटर पाण्यातून फवारा.

लागवडीनंतर 8 महिन्यांनी 0:0:50 4-5 ग्रॅम+कॅल्शियम नायट्रेट 2-2.5 ग्रॅम प्रती लिटर पाण्यातून फवारा.

सिंचन

सिंचनाच्या पाळ्या

सिंचन सुविधा उपलब्ध असल्यास, हवामान व मातीच्या प्रकारानुसार, 15-40 वेळा 7 - 10 दिवसांच्या अंतराने पाणी देणे. 

पेरणी पुर्वी किंवा पेरणी नंतर पहिले हलके पाणी द्यावे. दुसरे पाणी पेरणी नंतर 3-4 दिवसांनी देणे. त्यानंतर 8 ते 10 दिवसाच्या अंतराने देणे.

गरज असल्यास रुजवण होण्याच्या काळात 8-10 दिवसाच्या अंतराने व हलक्या जमिनीत 7-8 दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या देणे.

हिवाळ्यामध्ये पाण्याच्या पाळ्या 12-15 दिवसानी दिल्या जातात. काढणीच्या अगोदर 15 दिवस पाणी देऊ नये.

मध्यम वाढीच्या काळात भारी जमिनीत 4 वेळा सिंचन 10-12 दिवसाच्या अंतराने व हलक्या जमिनीत 6 वेळा सिंचन 7-8 दिवसाच्या अंतराने देणे.

सक्रिय वाढीच्या काळात भारी जमिनी मध्ये 6 वेळा 10-15 दिवसाच्या अंतराने पाणी देणे व हलक्या जमिनीत 10 वेळा, 7-8 दिवसाच्या अंतराने पाणी देणे. 

शिथिल वाढीच्या काळात भारी जमिनीत 4 वेळा, 10-15 दिवसाच्या अंतराने तर हलक्या जमिनीत 8 वेळा, 7 ते 8 दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या देणे. 

तयार होण्याच्या काळात भारी जमिनिसाठी 4 वेळा, 10-12 दिवसाच्या अंतराने तर हलक्या जमिनीत 8 वेळा, 7-8 दिवसाच्या अंतराने पाणी देणे.

कीड नियंत्रण

कंद माशी

कंद माशीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास, पाण्याचा निचरा होईल याची काळजी घ्या. नियंत्रणासाठी 4kg/acre दाणेदार फोरेट(थिमेट, अ‍ॅग्रिमेट) चा वापर करा
क्विनौलफोस 5% किंवा दाणेदार फॉरेट 10% 25 किलो हप्ते 1 महिन्याच्या अंतराने ऑगस्ट-सप्टेंबरमधे द्यावेत.
अँसिफेट १५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसाचे अंतराने २-३दा फवारा.

अंकुर पोखरणारी अळी

प्रादुर्भावित भागातील अळ्या नष्ट करा. 15 दिवसांच्या अंतराने नीमतेल (0.5%) गरज असल्यास फवारा. प्रकाशसापळे वापरा.

अळीमुळे 30%पर्यत नुकसान होते.प्रोफेनोफोस40%EC+ सायपरमेथ्रीन(सूपर, सायपरकील)@250ml/एकर/150Ltr फवारा

रसशोषककिडी

रसशोषककिडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास थायामेथोक्सॅम@10gm/15Ltr फवारा

हुमणी

जनावरांचा वावर असतो त्या जागेत लागवड टाळा.याठिकाणी हुमणीचा प्रादुर्भाव होतो.जवळपास ताजे शेण पडणार नाही याची काळजी घ्या.
हूमनी नियंत्रणासाठी क्लोरपाइरीफोस @5मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून मुळांजवळ भिजवनि करावी.त्यानंतर 10 दिवसांनी एकरी बेवेरिया बॅस्सीना 2.5 किलो + मेटॅडेज़िन 2.5 किलो + 200 किलो कुजलेले शेणखत एकत्र करून ते मिश्रण 1-2 दिवसांनी आल्याच्या बुडाखाजवळ टाकावे

रोग नियंत्रण

करपा

हेक्साकोनॅझोल (कॉंन्टाफ)@10ml किंवा मॅन्कोझेब(डायथेन M-45)75WP@25gm/10Ltr पाण्यात,10mlस्टिकर मिसळून फवारा.

मुळ/कंदकुज

कॉपरयुक्त बुरशींनाशक@10gm/Ltr/मॅनकोजेब@3gm/Ltr किंवा मेटालाक्सील@1.25gm/Ltrने लागवडीनंतर 30,60,90दिवसांनी भिजवणी करा

लीप ब्लौच

लीप ब्लौच  म्हणजे पानावरील ठिपके या रोगात पानावर तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात. ते वाढून पान पूर्ण पिवळे होते किंवा रोगट भाग पूर्णत: वाळतो.
लीप ब्लौच रोगाच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात बाविस्टिन 10-15g किंवा कॉपर ओक्सी क्लोराईड (ब्लायटोक्स, फायटालोन, ब्लू कौपर) 25g मिसळून फवारावे.

पानावरील डाग

कोवळ्या पानावर विविध आकाराचे तपकिरी ठिपके दिसतात. मधील भागात डाग अनियमीत स्वरूपाचे, पांढरट किंवा राखाडी रंगाचे असतात, नंतर ते एकत्रित होऊन पूर्ण पानभर पसरतात.

प्रादुर्भावित पाने सुकून जातात. कंद व्यवस्थित निपजत नाहीत. 0.3% झायनेब 3gm/Ltr किंवा 1% बोर्डोमिश्रणची (10gm/Ltr) फवारणी करा. 

पाने पिवळी पडणे

19:19:19@5gm/Ltr + 1ml हेक्साकोनॅझोल (कॉंन्टाफ, सितारा)ची फवारणी करा. पिकातील सुधारणा पाहून 8 दिवसानी पुन्हा फवारा.

काढणी आणि नंतरचे तंत्र

योग्य वेळ आणि तंत्र

मसाल्यासाठी आल्याची काढणी 6महिन्यांपासून  सुरू करता येते. आल्यापासून प्रक्रियायुक्त पदार्थ करायचे  असल्यास त्याची काढणी 8 महिन्यानंतर करा.
पाने वाळू लागली की कंद तयार झाले असे  मानतात. बियाण्यासाठीची  झाडे  वेगळी  ठेवून  त्यांची  काढणी शेवटी करावी.
विक्रीच्या मालासाठीची काढणी कंद तयार झाल्यावर सुरू करावी.
सुंठ बनविण्यासाठी काढणी नंतर कंद नीट धुवावे. बांबू च्या काड्यानी बाहेरील साल काढावी.
उत्तम निच-याची जमीन असेल तर आले 14-16 महिने ठेवून जास्त उत्पादन मिळविता येते. आले बाजारात कमी प्रमाणात येत असल्यास चांगला भाव मिळतो.

बियाणे साठवणूक

निवड्लेल्या गडड्यांवर क्विनॉलफोस 25EC, 20ml + 50WP कार्बाडॅझीम (बाविस्टिन,सहारा) 15gm/10Ltr द्रावणात गड्डे 10-15min बुडवून सावलीत सुकवा.

प्रक्रिया केलेल्या बियाण्याची साठवण चर खोदून  किंवा खड्ड्यात करा. बियाण्याच्या गरजेनुसार  आवश्यक तेवढ्याच लांबी रुंदीचा आणि 1m खोलीचा खडडा खणावा.
 
बियाणे साठवणीच्या ख़ड्ड्याच्या तळाला 1 इंच जाडीचा वाळूचा थर, एका कडेला लाकडाचा भुसा किंवा पाला पाचोळा/ वाळलेले गवत टाका.

सिमेंट, पत्रा अथवा कौलारू बंद खोलीत बियाणे साठवू नये

प्रक्रिया व मूल्यवर्धन

सुंठ बनवण्याची मलबार पद्धत यामध्ये आले स्वच्छ निवडून 8-10 तास पाण्यात भिजत ठेवून,त्याची साल काढून 2% चुण्याच्या द्रावणात 6-7 तास भिजत ठेवावे..त्यानंतर छोट्याशा बंद खोलीत पसरवून आल्याच्या कंदाला 12 तास गंधकाची धुरी द्यावी.,त्यानंतर कंद बाहेर काढून 2 % चुण्याच्या द्रावणात 6-7 तास भिजत ठेवावे,परत 12 तास गंधाकची धुरी द्यावी.अशाप्रकारे 3 वेळा ही प्रक्रिया करा.त्यामुळे आल्याच्या कंदास पांढराशुभ्र रंग येतो व प्रक्रिया केलेले आले सूर्यप्रकाशामधे वाळवुन व गोणपाटामध्ये घालून स्वच्छ करा,नंतर ते सुंठ म्हणून बाजारात विक्रीसाठी पाठवा.

सुंठ बनवण्याच्या सोडा व खास मिश्रण पद्धतीत सुंठ तयार करण्यासाठी स्वच्छ आले निवडावे,त्यानंतर 8-10 तास पाण्यात भिजत ठेवून त्याची साल काढून घ्या.त्यानंतर 1.5 X 2 फूट आकारच्या हाताने उचलेल इतक्या क्षमतेच्या गॅल्व्हनाइज्ड जाळीच्या पिंजर्‍यामध्ये भरून घ्या.3 वेगवेगळ्या भांड्यांमध्ये सोडीयम हायड्रॉक्साइड (कॉस्टिक सोडा) ची 20%,25%, आणि 50% तीव्रतेची द्रावणे तयार करून उकळून घ्या.या द्रावणात कंदाने भरलेला पिंजरा 20% द्रावणात 5 मिनिटे,25 % द्रावणात 1 मिनिट वा 50 % द्रावणात 1/2 मिनिट धरा,त्यानंतर 4% सायट्रिक अॅसिडच्या द्रावणात 2 तास बुडवून चांगले नितळून घ्या.,स्वच्छ सूर्यप्रकाशात वाळवल्यानंतर थोडीफार राहिलेली साल चोळून काढा.अशा पद्धतीने चांगली सुंठ तयार होते.

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

ओशो के अनमोल विचार ... Osho great thought in Hindi & English ...