बुरशीनाशक, व्यापारी नाव,उपयोगिता व नियंत्रण
बुरशीनाशक, व्यापारी नाव,उपयोगिता व नियंत्रण♥प्रगतशील शेतकरी♥
♥बुरशीनाशकांची नावे-
कार्बोक्सिन
कार्बेन्डाझिम
फोसेटील
थियोफिनेट मिथाईल
क्लोरोथालोनिल
कॉपर ऑक्सीक्लोराईड
डायफेनकोनॅझोल
डिनोकॅप
हेक्साकॉनझोल
प्रॉपीनेब
मॅन्कोझेब
मेटॅलॅक्झिल
प्राॅपीकोनॅझोल
स्ट्रेप्टोसायक्लिन
टेट्रासायक्लीन
♥बुरशीनाशक कार्बोक्सिन (Carboxin 75% WP )*
💢व्यापारी नाव :-
विटाव्याक्स (Vitavax),
कडान (Cadan),
प्याडान ((Padan),
संवेक्स (Sanvex)
थिओबेल ( Thiobel)
वेगेटॉक्स (Vegetox)
कार्बोक्सिन हे एक आंतरप्रवाही बुरशीनाशक असून ते अनिलीड या वर्गात मोडते. या बुरशीनाशकांचा उपयोग मुख्यत्वे बीजप्रक्रिया म्हणून केला जातो.
बीजप्रक्रिया केले असता काणी रोग (smut),
रोपे कुजने (rot), तसेच करपा (blight) या सारख्या विविध रोगांचा नायनाट होतो....
पिके: सातू, जव, भात, कापूस, भाजीपाला पिके, गहू .
गहू रोगावरील smut रोगासाठी या बुरशीनाशकाचा वापर केल्यास smut रोगावर पूर्णपणे नियंत्रण करता येते.
प्रमाण: बीजप्रक्रिया साठी 2 ग्रॅम/ किलो बियाण्यास
--------------------------------------------------------------------------------
♥बुरशीनाशक कार्बेन्डाझिम (Carbendazim 50 % WP)*
💢व्यापारी नाव :-
एमकोझीम (Aimcozim)
बॅटल (Battal)
बविस्टीन (Bavistin)
बेंडझिम ( Bendazim)
कार्बट (Carbate)
कॅरबंदोर ( Carbendor )
सेकुडझिम (Cekudazim)
कॉर्बेल (Corbel)
कस्टस ( Custos)
डिफेंसोर ( Defensor)
डेल्सने ( Delsen)
सटेम्पोर (Stempor)
सुपर्कारब ( Supercarb)
ट्रेटिकोल (Triticol)
पिके:
1: भात: ब्लास्ट रोग (Blast)- 250 ते 500 ग्रॅम/ 750 लिट पाण्यात.
पानांवरील करपा (Sheath blight)- 2 ग्रॅम / किलो बियाण्यास प्रक्रिया करावी
2 : गहू- काणी ( loose smut) - 2 ग्रॅम / किलो बियाण्यास प्रक्रिया करावी
3: सातू: काणी ( loose smut) - 2 ग्रॅम / किलो बियाण्यास प्रक्रिया करावी
4: कापूस: पानांवरील ठिपके: 250 ते 500 ग्रॅम/ 750 लिट पाण्यात.
5: भुईमूग: टिक्का (tikka) 225 ग्रॅम/ 700 लिट पाण्यात.
6: शेगवर्गीय पिके, गुलाब, वांगी, बोर, सफरचंद- भूरी (powdery mildew)- 350 त ग्रॅम/700 लिट पाण्यात.
कार्बेन्डाझिम एक आंतरप्रवाही बुरशीनाशक असून ते benzimidazole या गटात मोडते.
कार्बेन्डाझिम जिरायती पिके (कडधान्ये, तेल बी बलात्कार), फळे, भाजीपाला आणि, ornamentals ई. पिकांवर येणाऱ्या विविध बुरशीजन्य रोगांना नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते. बिजप्रक्रियेमध्ये या बुरशीनाशकाचा वापर केल्यास जमिनीमार्फत होणाऱ्या विविध बुरशीजन्य रोगांचा नायनाट होऊन पिकाची वाढ जोमदार होते.
--------------------------------------------------------------------------
♥बुरशीनाशक फोसेटील (Fosetyl-AL 80% WP)_*
💢व्यापारी नाव :-
Alliete (ऑलिएट)
वैशिष्ट्य:
फोसेटील अल्युमिनीम हे एक आंतरप्रवाही बुरशीनाशक असून ते फॉस्फोनेट (phosphonate)
या वर्गात मोडते.....
ऑलिएट हे सरळ बुरशीवर कार्य न करता वेलीच्या पेशींवर कार्य करते. वेलीच्या पेशी स्वतः भोवती अशा रसायनाची निर्मिती करतात कि ज्याची प्रत्येक पेशीभोवती भक्कम अशी भिंत तयार होऊन रोगास अटकाव बसतो. यामुळे वेलीची नैसर्गिक संरक्षण संस्था जागृत होऊन वेल प्रबळ होते. यामुळे वेलच बुरशीचा नियंत्रण करते.
महत्वाचे: मुळाकडून शेंड्याकडे आणि शेंड्याकडून मुळाकडे असा दुहेरी संचार करणारे सर्वांपेक्षा निराळे खरेखुरे असे आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे.
प्रमाण: 2- 3 ग्रॅम/ लिट पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पिके: द्राक्ष, फळवर्गीय पिके......
रोग: downy mildew (भूरी रोग)
--------------------------------
♥बुरशीनाशक थियोफिनेट मिथाईल (Thiophanate Methyl 70% WP)*
💢व्यापारी नाव :-
रोको (Roko)
वैशिष्ट्य:
## थियोफिनेट मिथाईल (Thiophanate Methyl 70% WP) हे एक अत्यंत महत्वाचे बुरशीनाशक असून ते बेन्झीमिडझोल ( benzimidazole) या गटात मोडते.....
## थियोफिनेट मिथाईल (Thiophanate Methyl 70% WP) हे बहुगुणधर्मीय आंतरप्रवाही बुरशीनाशक असून ते रोग प्रतिबंधात्मक तसेच उपचारात्मक असे दोन्ही प्रकारचे कार्य करते.बहुगुणधर्मीय कामगिरीमुळे एकाच वेळी विविध रोगांपासून उत्कृष्ट संरक्षण मिळते. अनेक रोपांवर वाढणारा करपा, फांदीमर, फळकुज, पानावरील ठिपके, भूरी रोग, खवड्या या बुरशीजन्य रोगांवर खात्रीशीर नियंत्रण.....
## अधिक काळ परिणाम दाखवीत असल्यामुळे पिकांना दीर्घकाळ सुरक्षा मिळते. रोपांच्या वाढीवर चांगले परिणाम दर्शवते व उत्पादनात वाढ करते. सुचविलेल्या मात्रेनुसार वप्रारल्यास कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.
## द्राक्ष, तृणधान्य, फळपिके, भाजीपाला पिके, मसाल्याची पिके तसेच काकडीवर्गीय पिकांवरील बुरशीजन्य रोगांसाठी अत्यंत उपयुक्त.....
वापरण्याचे प्रमाण:
1 ग्रॅम/ लिट पाण्यात मिसळून फावरणी करावी...
-------------------------------
♥बुरशीनाशक क्लोरोथालोनिल (Chlorothalonil 75% WP)*
💢व्यापारी नाव :-
जटायू (Jatayu)
ब्रावो (Bravo)
डकोनील 2787 ( Daconil 2787)
एक्झोथेरम (Exotherm )
टर्मिळ (Termil)
फोरतुर्फ ( Forturf)
रेपल्स ( Repulse)
वैशिष्ट्य:
## क्लोरोथालोनिल (Chlorothalonil 75% WP) हे एक स्पर्शजन्य बुरशीनाशक असून ते Chlorinated Benzonitrile गटात मोडते.
## क्लोरोथालोनिल (Chlorothalonil 75% WP) हे प्रतिबंधक तसेच उपचारात्मक बुरशीनाशक आहे. यामध्ये कमी बाष्प उत्पन्न होण्यामुळे याचे अवशेष दीर्घकाळ परिणामकारक असतात.
## क्लोरोथालोनिल (Chlorothalonil 75% WP) हे ऊर्जा निर्माणास प्रभावित करणाऱ्या कोषांना तोडते.त्यामुळे बुरशीच्या कोशिकेचा नाश होतो.
## क्लोरोथालोनिल (Chlorothalonil 75% WP) हे बुरशीच्या झुस्पोर (zoospores) चे अंकुरण थांबवते. बुरशीच्या झुस्पोर ची रचना थांबवते. बुरशीच्या झुस्पोर ची मुक्तता बंद होते तसेच बुरशीच्या झुस्पोर चे संचालन थांबवते......
## सर्व पिकांवर उपयुक्त: करपा, पानावरील ठिपके, डाऊनी सारख्या रोगांवर परिणामकारक.....
पिके:
1 Groundnut (भुईमूग): टिक्का (Tikka), तांबेरा (rust) - 0.875-1.50 ग्रॅम/ 600 ते 800 लिट पाण्यात,,,,,
2. Potato (बटाटे): लवकर येणारा तसेच उशिरा येणारा करपा( early and late blight)-0.875-1.50 ग्रॅम/ 600 ते 800 लिट पाण्यात,,,,,
3. (apple) सफरचंद : खपली रोग( scab)- 0.2 % or 200 ग्रॅम/100 लिट पाण्यात असे 10लिट पाणी प्रति झाडास वापरावे.
4. Grapes (द्राक्ष)- anthracnose तसेच डोवन्य mildew ( केवडा)- 0.2 % or 200 ग्रॅम/100 लिट पाण्यात
5 chilli (मिरची) - फळ सड ( fruit rot)- 800 ग्रॅम प्रति 750 लिट पाण्यात.....या प्रमाणे
-------------------------------------------------------------'---
♥कॉपर ऑक्सीक्लोराईड (Copper oxychloride 50% WP)*
💢व्यापारी नाव :-
ब्लिटॉक्स (Blitox)
कॉपृस (Coprus)
ब्लु कॉपर (Blue copper)
केमोसिन (Chemocin)
*वैशिष्ट्य:*
## कॉपर ऑक्सीक्लोराईड (Copper oxychloride 50% WP) हे एक अत्यंत महत्वाचे स्पर्शजन्य व सौरक्षक अशी दुहेरी भूमिका बजावणारे
बुरशीनाशक असून ते inorganic copper compound या गटात मोडते....
## कॉपर ऑक्सीक्लोराईड (Copper oxychloride 50% WP) हे बुरशीनाशक विविध बुरशीजन्य तसेच जिवाणू जन्य रोगांवर अत्यंत परिणामकारक असल्याचे सिद्ध झाले आहे....
## कॉपर ऑक्सीक्लोराईड (Copper oxychloride 50% WP) चे molecule वनस्पतीच्या आत मध्ये प्रभावीपणे शिरकाव करून निर्जंतुकीकरनाचे काम करतात....
## कॉपर ऑक्सीक्लोराईड (Copper oxychloride 50% WP) हे विविध रोगांवर परीमकरक आहे: खपली रोग ( scab), अंथरकनोस ( Anthracnose), केवडा रोग (Downy mildew), करपा (Early blight, and Late blight diseases of various crops)
पिके:
1. Citrus( लिम्बु वर्गीय पिके,,,, संत्रा, मोसंबी,,लिम्बु ई.) - leaf spot ( पानावरील ठिपके), canker(कॅनकर)- 2.5 ग्रॅम प्रति 750-1000 लिट पाण्यात.....
2. वेलदोडे (cardamom) सारखी मसाल्याची पिके,,,,मिरची (chilli) सारखी भाजीपाला पिके,,,,तसेच डाळिंब, द्राक्षे, केली, संत्रा, चिकू सारख्या सर्वच फळपिके- पानावरील ठिपके ( leaf spot), फळ सड (fruit rot), बुरशीजन्य तसेच हिवणु जन्य करपा ( blight), केवडा रोग ( downy mildew), भूरी ( powdery mildew)- 2 ते 2.5 ग्रॅम प्रति 750-1000 लिट पाण्यात........
------------------------------------
*बुरशीनाशक नं. 11 :-*
डायफेनकोनॅझोल (Difenoconazole 25% EC)
💢व्यापारी नाव :-
स्कोर ( score)
*वैशिष्ट्य:*
## डायफेनकोनॅझोल (Difenoconazole 25% EC) हे एक बहुगुणधर्मीय आंतरप्रवाही असे बुरशीनाशक आहे.
## डायफेनकोनॅझोल (Difenoconazole 25% EC) हे वनस्पती च्या पानाद्वारे जलद गतीने ओढले जाते, पाऊसात धुतले जात नाही, पानाचे वरील व खालील बाजूनी सौंरक्षण करते, रोगाचा पुढील प्रसार होऊ देत नाही.
*पिके:*
1. सफरचंद ( Apple)- खपली रोग (scab)- 0.015% or 15 मि. ली /100 लिट पाण्यात
2. भुईमूग ( Groundnut)- टिक्का ( Tikka), तांबेरा (Rust) - 0.1 % किंवा 100 मि. ली/ 100 लिट पाण्यात.
3.भात (Rice): करपा (Sheath blight)- 0.05% किंवा 50 मि. लि/ 100 लिट पाण्यात
4. मिरची (chilli): मर (Die-back), फळ सड (Fruit rot) 0.05% किंवा 50 मि. लि/ 100 लिट पाण्यात
5 मसाल्याची पिके : करपा ( blight) आणि भूरी
( powdery mildew)- 0.05 % or 50 मि. लि /100 लिट पाण्यात.
6 कांदा (onion) जांभळा करपा (purple blotch)- 0.1 % किंवा 100 मि. ली/ 100 लिट पाण्यात.
7. द्राक्ष (Grapes)- anthracnose (अंथरकनोस), powdery mildew(भूरी)- 0.03% किंवा 30 मि. लि / 100 लिटर पाण्यात
-----------------------------------------------------------------
♥बुरशीनाशक डिनोकॅप (Dinocap 48% EC)*
💢व्यापारी नाव :-
काराथेन (Carathen)
वैशिष्य:
## डिनोकॅप (Dinocap 48% EC) हे एक स्पर्श जन्य बुरशीनाशक असून ते भूरी (Powdery mildew) रोगासाठी अत्यंत परिणामकारक असल्याचे सिद्ध झाले आहे.
## डिनोकॅप (Dinocap 48% EC) हे आंबा पिकासाठी अतुलनीय कार्य करणारे बुरशीनाशक आहे.
पिके:
1. भेंडी (okra), मिरची (chilli), द्राक्ष( Grapes), तृणधान्य पिके- भूरी रोग ( powdery mildew) 225 ग्रॅम/ 750 लिट पाण्यात
2. पिच (Peach), सफरचंद (apple), बोर (ber)- भूरी रोग- 3 ग्रॅम/ 10 लिट पाण्यात
3.आंबा (mango), वाटाणा (peas), मसाल्याचे पिके: भूरी रोग- 300 ग्रॅम/ 750 लिट पाण्यात
----------------------------------------
♥बुरशीनाशक हेक्साकॉनझोल Hexaconazole 5% EC*
💢व्यापारी नाव :-
Trigger
🌾पिके:
1. सफरचंद- खपली रोग ( Apple scab)
(0.05%) - 50 ml/100 lit पाण्यात
2. भात- करपा (sheath Blight) तसेच ब्लास्ट (Blast)- 1000 ml/500 lit पाण्यात
3. भुईमूग - Tikka ( leaf Spot or Tikka)- 1500 ml/ 500 lit पाण्यात
4. आंबा- भूरी ( Powdery mildew)- (0.1% )100 ml/100 lit पाण्यात
5. सोयाबीन: तांबेरा ( Rust)- (0.1% )100 ml/100 lit पाण्यात
6. द्राक्ष: भूरी (powdery mildew)- 500 ml/ 500 lit पाण्यात
याप्रमाणे फवारणी करावी
*वैशिष्ट्ये:*
हेक्साकॉनझोल (Hexaconazole) हे ट्रायझोल (triazoles) या वर्गातील बुरशीनाशक असून संरक्षक आणि गुणकारी क्रिया असणारे एक आंतरप्रवाही (systemic) बुर्शीनाशक म्हणून काम करते. हेक्साकॉनझोल (Hexaconazole) हे बुरशीनाशक रोगकारक बुरशीच्या बीज उगवण तसेच तंतुमय वाढीवर नियंत्रण करते. खपली व भुरी रोगासाठी हे बुरशीनाशक अत्यंत उपयक्त आहे तसेच विविध पिकांवरील तांबेरा रोगावर सुद्धा गुणकारी असल्याचे सिद्ध झाले आहे.
------------------------------------------------------
♥प्रॉपीनेब Propineb 70 WP(70% w/w)*
💢व्यापारी नाव :-
Antracol
Aaroosh
Dazel
🌾पिके:
द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला वर्गीय पिकांवरील भूरी (powdery mildew) तसेच केवडा ( downy mildew) रोगांवर अत्यंत उपयुक्त.....
प्रमाण: 2 gm/ lit पाण्यात....
प्रॉपीनेब (Propineb 70 WP) हे डायथिओकार्बमेत (Dithiocarbamate) या वर्गातील बुरशीनाशक असून संरक्षक आणि गुणकारी क्रिया असणारे एक स्पर्शजन्य (contact) बुर्शीनाशक म्हणून काम करते.
- प्रॉपीनेब (Propineb 70 WP) या बुरशीनाशकामध्ये zinc आल्यामुळे पिकाची वाढ जोमदार होऊन फळांची गुणवत्ता सुधारते. प्रॉपीनेब (Propineb 70 WP)
- प्रॉपीनेब (Propineb 70 WP) चे कण सुक्ष्म आल्यामुळे ते पाण्यात लवकर एकजीव होतात. व फवारणी केली असता पानावर एकसारखे पसरतात यामुळे रोगकारक बुरशीचे बीज रुजू शकत नाही व रोगास अटकाव होतो.
---------------------------------------------------------
♥मॅन्कोझेब (Mancozeb) 75% WP*
💢व्यापारी नाव :-
Penncozeb,
Trimanoc,
Vondozeb,
Dithane M 45
Manzeb,
Nemispot,
Manzane.
Indofil M 45
🌾पिके:
सर्व पिकांसाठी उपयुक्त.....
मुख्यत्वे- द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला वर्गीय पिकांवरील भूरी (powdery mildew), करपा ( Blight) तसेच केवडा ( downy mildew) रोगांवर अत्यंत उपयुक्त.....
प्रमाण: 2 ते 2.5 gm/ lit पाण्यात....
वैशिष्ट्य:
मॅन्कोझेब ( Mancozeb) हे डायथिओकार्बमेत (Dithiocarbamate) या वर्गातील बुरशीनाशक असून बहुउपयोगी, संरक्षक आणि गुणकारी क्रिया असणारे एक स्पर्शजन्य (contact) बुर्शीनाशक म्हणून काम करते.
- मॅन्कोझेब ( Mancozeb) या बुरशीनाशकामध्ये 20% Manganese v 2.5 % zinc असल्यामुळे झाडांना अन्नद्रव्यांचा पुरवठा देखील होतो....
- रोगप्रतिकार शक्ती निर्माण होण्याची भीति नसल्याने एका हंगामात पुन्हा पुन्हा फवारणी करता येते. आंतरप्रवाही बुरशीनाशकात मिश्रित करण्यासाठी उपयुक्त....
--------------------------------------
♥बुरशीनाशक मेटॅलॅक्झिल Metalaxyl 35% WS*
💢व्यापारी नाव :-
Ridomil gold ( Metalaxyl 8% + Mancozeb 60 % wp)
🌾 *पिके:*
सर्व पिकांसाठी उपयुक्त.....
मुख्यत्वे- द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला वर्गीय पिकांवरील केवडा (downy mildew) रोगांवर अत्यंत उपयुक्त तसेच इतर भूरी सारख्या बुरशींवर हि परिणामकारक....
प्रमाण: 2 ते 2.5 gm/ lit पाण्यात....
*वैशिष्ट्य:*
Metalaxyl हे aclananine या वर्गातील बुरशीनाशक असून बहुउपयोगी, संरक्षक आणि गुणकारी क्रिया असणारे एक। आंतरप्रवाही तसेच स्पर्शजन्य (contact) बुर्शीनाशक म्हणून काम करते.
- आंतरप्रवाही व स्पर्शजन्य
- रोपे वाढीच्या काळात सुरुवातीला जास्तीत जास्त सौरक्षण
- पुनर्वितरणाद्वारे जास्तीत जास्त परिणामकारकता
- पानावर उत्तम रित्या चिकटून राहण्याची क्षमता
------------''''------------------------
♥बुरशीनाशक प्राॅपीकोनॅझोल
Propiconazole 25% EC*
💢व्यापारी नाव :-
Tilt
🌾पिके:
1. गहू (Wheat):
- karnal bunt (कर्नल बंट) 500 ग्रँम/750 lit पाण्यात
- पानावरील तांबेरा (leaf rust): 500 ग्रँम/750 lit पाण्यात
- खोडावरील करपा (stem rust): 500 ग्रँम/750 lit पाण्यात
- पिवळा करपा ( yellow rust): 500 ग्रँम/750 lit पाण्यात
2. भात ( Rice): करपा (Sheath blight): 500 ग्रँम/750 lit पाण्यात
3. भुईमूग (groundnut):
- तांबेरा ( Rust): 500 ग्रँम/750 lit पाण्यात
सर्व पिकांसाठी उपयुक्त.....
- टिक्का ( Tikka): 500 ग्रँम/750 lit पाण्यात
4. चहा (tea)
- करपा ( blister blight)- 125-250 ग्रॅम/ 175-250 lit पाण्यात
5. सोयाबीन (Soybean): 125 ग्रॅम/ 500 lit पाण्यात
6. केळी (banana): sigatoka (करपा):
0.10% or 1ml/lit पाण्यात..
7. Coffee (कॉफी): पानावरील तांबेरा (leaf rust): 0.10% or 1ml/lit पाण्यात..
प्राॅपीकोनॅझोल Propiconazole 25% EC हे एक आंतरप्रवाही बुरशीनाशक असून ते Triazole या गटात मोडते. हे बुरशीनाशक गहू, भुईमूग, तंबाखू, द्राक्षे, भाजीपाला वर्गीय तसेच वेलवर्गीय पिकांवर येणाऱ्या विविध बुरशीजन्य रोगांवर उपयुक्त आहे.
मुख्यत्वे sigatoka disease साठी अत्यंत उपयुक्त........
-----------------------------------------------------------
♥बुरशीनाशक स्ट्रेप्टोसायक्लिन, टेट्रासायक्लीन
Streptomycin Sulphate 9% + Tetracylin Hydrocloride 1%) SP*
💢व्यापारी नाव :-
Plantomycin
Bacterimycin
🌾पिके:
1. Apple( सफरचंद) Fire blight: 20 to 30% फुलोऱ्याची अवस्था- 20 to 50 ppm....अशाप्रकारे प्रति 4 दिवसाच्या अंतरानी फवारणी केली असता erwinia या जिवाणूंचा नायनाट होतो...
2. Beans (कडधान्य पिके): 100 ते 150 ppm....अशाप्रकारे प्रति 7 दिवसाच्या अंतरानी....परंतु बी उगवल्यानंतर 15 दिवसांनी...
3. Citrus (संत्रावर्गीय पिके)- 100 ते 150 ppm....अशाप्रकारे प्रति 7 दिवसाच्या अंतरानी.... यामुळे xanthomonas या जिवाणूंचा नायनाट होतो....
4. Cotton (कापूस): Angular leaf spot (पानावरील ठिपके) या साठी बियाण्यास 40 ppm ची treatment दयावी अथवा 50 ppm अशाप्रकारे प्रति 4 दिवसाच्या अंतरानी फवारणी करावी....
5. Potato (बटाटे): बटाटे 50 ppm द्रावणात बुडवून लावल्यास मर तसेच जीवणूजन्य करपा या रोगास प्रतिबंध करता येतो.. 50 ppm अशाप्रकारे प्रति 4 दिवसाच्या अंतरानी फवारणी करावी....
6. Tomato (टोमॅटो): bacterial leaf spot(जीवणूजन्य करपा): रोपे अवस्था- 50 ppm अशाप्रकारे फवारणी करावी....
7. भात (rice): bacterial leaf spot(जीवणूजन्य करपा): 50 ppm च्या द्रावणात रोपे बुडवून लावावीत.....
8 डाळिंब तेल्या रोग नियंत्रणासाठी अत्यंत उपयुक्त असे 4 स्प्रे 8 दिवसाच्या अंतराने केले असता तेल्या रोगास ताबडतोप नियंत्रण होऊ शकते.....
*Spray 1:* Copper hydroxide (2.0g/ l) + Streptocycline (0.2g/l) + 2-bromo, 2-nitro propane-1, 3-diol (Bronopol) @ 0.5g / l + spreader and sticker (0.5ml/l)
*Spray 2:* carbendazim (1g/l) + Streptocycline (0.2g/l) + 2-bromo, 2-nitro propane-1, 3-diol (Bronopol) @ 0.5g/ l + spreader and sticker (0.5ml/l)
*Spray 3:* copper oxychloride (2.0g/ l) + Streptocycline (0.2g/l) + 2-bromo, 2-nitro propane-1, 3-diol (Bronopol) @ 0.5g / l + spreader and sticker (0.5ml/l)
*Spray 4:* Mancozeb 2g/l) + Streptocycline (0.2g/l) + 2-bromo, 2-nitro propane-1, 3-diol (Bronopol) @ 0.5g / l + spreader and sticker (0.5ml/l)
संकलित!
Hedline kay aahe
ReplyDeleteखूप छान उपयुक्त माहिती
ReplyDeleteखूप छान माहिती
ReplyDeleteखुप छान माहिती
ReplyDeleteअतिशय महत्त्वाचे आहे
ReplyDeleteDalim
ReplyDeleteछान माहिती
ReplyDeleteGood information
ReplyDeleteखूप छान माहिती दिली
ReplyDeleteखुप छान
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteखूप छान माहिती मिळाली
ReplyDeleteजास्त अॅटिबायोटि फवारणी केल्यास थाडाला विकणेस पणा येतो हे खर आहे का
ReplyDeleteखूप चांगली माहिती आहे
ReplyDeleteखूप भारी माहिती भेटली मला
ReplyDeleteखूप चांगली माहिती मिळाली. समाधान झाले
ReplyDeleteSir कुप्रोफिक्स बद्दल माहिती कळेल का
ReplyDeleteमहत्वाची माहिती मिळाली आणि सुटसुटीत, लगेच समजेल अशी माहिती आहे
ReplyDeleteChan mahiti milali
ReplyDeleteसुपर माहिती मिळाली
ReplyDeleteमी भाऊराव कटारे
Deleteअतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
छान
ReplyDelete