शेडनेटमध्ये घ्यावराची पिके

शेडनेटमध्ये घ्यावराची पिके♥प्रगतशील शेतकरी♥

♥ ज्या पिकांना योग्य वातावरण लागेल, अशीच पिके (फुले व भाजीपाला) घ्यावीत, म्हणजे आपणास चांगले उत्पादन व नफा अधिक मिळेल.

♥कोणत्या पिकाला बाजारात चांगली मागणी आहे, तसेच मागील वर्षी कोणत्या पिकाला मागणी होती व पुढील वर्षी कशी मागणी राहील, याचा विचार करून पिकाची निवड करण्यात यावी. 

♥फुले व भाजीपाला उत्पादन घेण्यासाठी पॉलिहाऊस सोईस्कर ठरते. 

♥भाजीपाला पिकासाठी शेडहाऊसचा वापर योग्य होतो.

♥50 टक्के हिरव्या जाळीच्या शेडनेटमध्ये ढोबळी मिरची, टोमॅटो, वांगी, भेंडी, पालक, कोथिंबीर आदी  भाजीपाला पिके; तर काकडी, दोडका, कारली, भोपळा यांसारखी वेलवर्गीय पिके घेता येतात. 

♥पांढ-या जाळीच्या शेडनेटमध्ये भाजीपाला बीजोत्पादन आणि रोपवाटिका व्यवस्थापन करता येते.

♥ खालील पिकांचे व्यापारी तत्त्वावर उत्पादन घेतले जाते. 

♥फुलपिके:

हरितगृहामध्ये प्रामुख्याने लांब दांड्याच्या फुलांचे उत्पादन घेतले जाते.

त्यात
गुलाब,

जरबेरा,

कार्नेशन,

ऑर्किड,

लिलीनियम,

शेवंती यांसारख्या फुलांचा समावेश असतो. 

♥भाजीपाला:

रंगीत ढोबळी मिरची,

हिरवी ढोबळी मिरची,

टोमॅटो,

काकडी,

कारली,

घोसावळी इ.

♥पालेभाज्या:

कोथिंबीर,

मेथी,

पालक,

फुलकोबी,

कोबी इ. 

♥परदेशी भाजीपाला:

ब्रोकोली,

झुकेनि,

लेट्युस, इ. 

♥औषधी पिके:

हळद,

आले, इ. 

♥फळे:

स्ट्रॉबेरी,

टरबूज इ

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!