रब्बीतील बटाटा लागवडीचे व्यवस्थापण
रब्बीतील बटाटा लागवडीचे व्यवस्थापण♥प्रगतशील शेतकरी♥
♥रब्बीतील बटाटा लागवडीची योग्य वेळ-
रब्बी हंगामात १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान लागवड करावी.
त्यामुळे डिसेंबर व जानेवारीच्या थंडीचा बटाटे पोसण्यास चांगला उपयोग होतो व अधिक उत्पादन मिळते.
१५ नोव्हेंबरनंतर बटाटा लागवड केल्यास पीकवाढीच्या काळात तापमान वाढते व त्याचा उत्पादनावर विपरीत परिमाण होतो.
♥रब्बीतील बटाटा लागवडीसाठी योग्य बेण्याची निवड-
बेणे हे कीड व रोगमुक्त असावे.
पूर्ण वाढलेले व त्यावर अंकुर फुटलेले, ठेंगणे, जाड व चांगले पोसलेले कोंब असावेत.
बेणे हे २५ ते ३० ग्रॅम वजनाचे,
5 सें.मी. व्यासाचे,
संपूर्ण (न कापलेले) साधारणतः अंड्याच्या आकाराचे असावे.
बटाटे कापून फोडी करताना विळा व तेथील जागा जंतू विरहित करावी.
♥रब्बीतील बटाटा लागवडीसाठी योग्य बेण्याची प्रक्रिया -
त्यासाठी विळा/चाकू मॅन्कोझेबच्या ०.२ टक्का द्रावणात बुडवून वापरावा.
कापलेल्या फोडी कमीत कमी १० ते १२ तास सावलीत सुकवून घ्याव्यात व
नंतरच लागवडीस वापराव्यात.
एक हेक्टरसाठी १५-२० क्विंटल बेणे लागते.
♥बटाटा पिकाचे उत्पादन रब्बी हंगामात अधिक येते असे संशोधनात दिसून आले आहे.
♥ बटाटा पोसण्यास २० अंश से. तापमान आदर्श असते.
तसेच जमिनीत योग्य ओलावा व पोषक अन्नघटक असावे.
जमिनीचे तापमान १७ ते २० अंश से. दरम्यान असल्यास बटाटे चांगले पोसतात.
♥लागवडीसाठी फक्त प्रमाणित अथवा सत्यप्रत व निरोगी बियाणे वापरावे.
खरीप हंगामातील बटाटा ताबडतोब रब्बी हंगामातील लागवडीसाठी वापरू नये.
♥बटाट्याकरिता योग्य जमिनीची निवड-
मध्यम प्रतीची, मिश्रित पोयट्याची व उत्तम पाण्याचा निचरा होणारी जमीन या पिकासाठी जास्त चांगली असते.
भारी, चिकण वा पाणथळ जमिनीची निवड करू नये.
कारण या जमिनी पाणी धरून ठेवतात.
परिणामी, लागवड केलेला बटाटा किंवा बटाट्याच्या फोडी (बियाणे) लागवडीनंतर ताबडतोब कुजण्याची किंवा सडण्याची शक्यता असते.
♥बटाटा लागवडीपुर्वी पुर्वमशागत-
खरिपातील पिकांची काढणी होताच जमिनीची उभी-आडवी नांगरणी करावी.
शेवटच्या कुळवाच्या पाळीअगोदर हेक्टरी २५ ते ३० गाड्या चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे किंवा खरिपात हिरवळीचे खत म्हणून ताग किंवा धैंचा जमिनीत गाडावा.
यामुळे अधिक उत्पादन मिळते असे आढळले आले.
♥सोयाबीन, मूग, उडीद किंवा बाजरी या पिकानंतर बटाट्याचे पीक घेतल्यास उत्पादन चांगले मिळते, जमिनीचा पोत टिकून राहतो.
♥ बटाटा लागवडीसाठी सुधारित जाती
१) कुफरी चंद्रमुखी,
२) कुफरी ज्योती,
३) कुफरी जवाहर,
४) कुफरी लवकर,
५) कुफरी चिप्सोना-१,
६) कुफरी चिप्सोना-२
♥ बटाट्याची अशी करा लागवड
६० सें.मी. (दोन फूट) अंतरावर सरी वरंबा पाडून त्यात
४५ ते ३० सें.मी. अंतरावर लागवड करावी.
लागवडीसाठी जमीन ओलावून घ्यावी.
जमीन वाफशावर आल्यावर लागवड करावी म्हणजे उगवण चांगली होऊन अधिक उत्पादन मिळते.
प्रथम दोन फूट अंतरावर सलग सऱ्या पाडाव्यात.
त्यात ४५ ते ३० सें.मी. अंतरावर लागवड करावी आणि लगेच सरी फोडून घ्यावी.
♥ बटाट्यात खत व्यवस्थापण असे करावे
पिकास माती परीक्षणानुसार
१०० किलो नत्र,
६० किलो स्फुरद,
१२० किलो पालाश प्रति हेक्टरी खतांची मात्रा द्यावी.
यापैकी नत्राची अर्धी मात्रा, संपूर्ण स्फुरद व पालाश लावणीच्या वेळी द्यावा व
उरलेली नत्राची ५० किलो मात्रा पीक एक महिन्याचे झाल्यानंतर प्रति हेक्टरी द्यावी.
♥ बटाटा लागवडीसाठी अधिकृत संपर्क
०२४२६-२४३८६१
संकलित!
Comments
Post a Comment