भारतात किती अर्थसाक्षरता किती आहे यावर एक सर्वे

*अर्थसाक्षरता :*

नुकत्याच एका आंतरराष्ट्रीय संस्थेंने भारतात किती अर्थसाक्षरता किती आहे यावर एक सर्वे केला. खालील निष्कर्ष  अतिशय धक्कादायक आहेत.

👉 ६७% भारतीय हे *इंशुरंन्सला* गुंतवणुक समजतात.

👉सोने हा गुंतवणुकीचा नाही तर हेंजिगचा अॅसेट क्लास आहे हे ९३% भारतीयांना माहीतच नाही.

👉 *रिटर्न्स हे महागाईवर मात करणारे हवेत म्हणजे नेमके काय? हे सांगणारे फक्त २%* भारतीय निघाले.

👉म्युचल फंङ मध्ये गुंतवणुक करणारे *२२% भारतीय SIP हे एका योजनेच नाव आहे* अस समजतात.

👉अॅसेट अलोकेशन म्हणजे काय हे ८८% भारतीयांना ठाऊक नाही.

👉६३% लोक हे म्युचल फंङमध्ये गुंतवणुक केल्यावर *म्युचअल फंडाची पॉलीसी घेतली* अस म्हणतात. ते म्युचअल फंङ म्हणजे इंशुरंन्स मधीलच एक पॉलीसीसारखा प्रकार आहे अस समजतात.

👉 *टॅक्स फ्री हा बॉण्ड ८० C प्रमाणे सवलत देतो अस माननारे ७६%* भारतीय आढळुन आले.

👉 *९२% लोक हे निवृत्तीजीवन आपल्या मुलांच्या भरवशावर सोङतात. जे ८% लोक निवृत्ती जीवनासाठी तरतुद करतात त्यातील ६१% लोकांनी निवृत्तीसाठी इंशुरंन्स पॉलीसीची निवङ केली आहे ज्यात परतावा ४.५% पेक्षाही कमी असतो.*

👉संपुर्ण *फायनान्शियल प्लॅनिंग करणाऱ्या व्यक्तीची संख्या ०.०४२% इतकी कमी* आढळुन आली.

👉फक्त *भारतात फक्त ५% लोक आरोग्य विमा घेतात*. जपान मध्ये ९२% लोकांकङे आरोग्य विमा असुन तेथिल हॉस्पीटल्स मध्ये हा विमा नसेल तर उपचारच करता येत नाही. इतर प्रगतराष्ट्रात हेच प्रमाण ७९% आहे.

👉भारतात *साधारण विमा घेणाऱ्यांची संख्या ३६% असुन त्यात मुदतीचा विमा घेणारे केवळ ७% लोक आढळुन आले*. एलआयसी ही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी असुन ती ८५ लाख करोङ इतक्या मोठ्या निधीचे व्यवस्थापन पाहते. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष २४ लाख लोकांना एलआयसी कङुन रोजगार मिळतो. *आपल्या गुंतवणुकदारांना ४-५% परतावा देणारी एलआयसी ही भारतातील शेअरबाजारात गुंतवणुक करणारी सर्वात मोठी संस्थागत गुंतवणुकदार आहे* .
पोस्टल लाईफ घेणाऱ्यांची संख्या त्या खालोखाल आहे. तिचा परतावा जवळपास ६% इतका आहे.

👉भारतातील *म्युचअल फंङ इंङस्ट्री ही चागंली पारदर्शक असुन व सेबी ही उत्तम नियंत्रक असली तरी भारतातील फक्त ३% लोकच यात गुंतवणुक करतात*.म्युचअल फंङ *वितरकांचा प्रचंङ अभाव याच प्रमुख कारण असुन त्यांची संख्या संपुर्ण भारतभरात फक्त १.१० लाख इतकीच आहे. त्यातील फक्त २४००० प्रत्यक्ष काम करताना आढळतात.* त्यांची वाढ व्हावी यासाठी बाजाराची नियंत्रक सेबी कुठलही पाऊल उचलत नाही. शिवाय त्यांना मोकळेपणाने काम करण्याच स्वातंत्र नाही. म्युचअल फंङ मध्ये एकुण गुंतवणुक ही १४.५ लाख करोङ रु. इतकी आहे.

👉५४ ईसी बॉण्ड, इंफ्रा बॉण्ड, पीएमएस, कार्पोरेट एफङी इ. फायनान्शियल प्रॉङक्टबद्दल फक्त ९% भारतीयांना माहिती आहेत.

👉 *भारतीय शेअरबाजार हा जगातील जुन्या शेअरबाजारा पैकी एक असुनही फक्त ४% लोकच शेअरबाजारात गुंतवणुक करतात. गेल्या ३७ वर्षात तब्बल १५.६८% इतका परतावा सातत्याने देवुनही बहुतांश भारतीय लोक याला सट्टा किंवा जुगार मानतात* . भारतातील लोकांपेक्षा परदेशी गुंतवणुकदार येथे जास्त प्रमाणात गुंतवणुक करताना आढळतात. शेअरबाजारात गुंतवणुक ही संस्कृती रुजवण्यात सरकार व नियंत्रक सेबी सपशेल अपयशी ठरले आहेत अस मत सर्व्हे करणाऱ्या तज्ञांनी मांडले.

*आर्थिक साक्षर व्हा*

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!