बुरशीनाशके - ​​​​बुरशीनाशकाच्या कार्यपद्धतीनुसार व रासायनिक घटकानुसार

बुरशीनाशके - ​​​​बुरशीनाशकाच्या कार्यपद्धतीनुसार व रासायनिक घटकानुसार

♥बुरशीनाशकाच्या कार्यपद्धतीनुसार

(1) प्रतिबंधक /संरक्षक बुरशीनाशके

संरक्षण बुरशीनाशक फवारणी केलेल्या झाडाच्या पृष्ठभागाचे बुरशीच्या प्रादुर्भावापासून संरक्षण करते अशा प्रकारची बुरशीनाशके शक्यतो रोग होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून रोग येण्यापूर्वी वापरली जातात. उदा. काॅपर ऑक्सीक्लोराईड, झायरम, सल्फर, मॅन्कोझेब.

(2)नायनाट करणारी  ( Eradicant ) उपायात्मक ( Curative  )बुरशीनाशके

रोगाची लागण झाल्यावर उपायात्मक  ( Curative ) बुरशीनाशकची फवारणी केली आसता ते बुरशीच्या धाग्याचा /बीजाणुंचा बंदोबस्त करते आणी रोगाचा पुढील प्रसार व त्यापासून होणारे नुकसान टाळण्यास मदत करते. उदा. कॅप्टन. .

(3)आतंरप्रवाही  (Systemic) बुरशीनाशके...

आतंरप्रवाही ओषधी फवारणी केल्यावर पेशींव्दारे झाडाच्या सर्व भागामध्ये पसरले जाते. अशाप्रकारच्या बुरशीनाशकाची फवारणी केल्यावर संपुर्ण झाड विषारी बनते व उत्तम नियंत्रण होते उदा. काब॔न्डाझिम. हेक्झाकोनॅझोल, थायोफेनेट, मिथाईल, ईत्यादी.
बुरशीनाशकामध्ये असलेल्या

♥रासायनिक घटकानुसार_

(1)ताम्रयुक्त बुरशीनाशके :
उदा. 
काॅपर ऑक्सीक्लोराईड, बोडोॅ मिश्रण

(2) गंधकयुक्त बुरशीनाशके :
उदा.
गंधक, कॅराथेन, डिनोकॅप

(3)डायथिओकाबाॅमेट बुरशीनाशके :
उदा.
झायरम, थायरम, मॅन्कोझेब.

(4)हिट्रोसायक्झिमाईड, नायट्रोजिन्स बुरशीनाशके :
उदा . कॅप्टन

(5)काबोक्झिमाईड बुरशीनाशके:
उदा. कारबोक्झिन , ऑक्झिकारबोक्झिन. .

(6)बेन्झिमिडाझोल बुरशीनाशके :
उदा . काब॔न्डाझिम, बेनोमिल.

(7)अॅसिलॅलॅनिन बुरशीनाशके :
उदा . मेटालॅक्झिल.

(8)मारफोलिन बुरशीनाशके :
उदा . ट्रायडेमाफ॔.

(9) फाॅस्फोनेट बुरशीनाशके :
उदा. फाॅसेटिल ए. एल

(10) पायरीमिडीन बुरशीनाशके :
उदा. फेनारिमाॅल.

(11)ट्रायझोल बुरशीनाशके:
उदा . बिटरटॅनाॅल, हेक्झाकोनॅझोल, पेनकोनॅझोल, प्राॅपिकोनॅझोल. . . .

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!