कपाशीतील पिक उंबळत किंवा मरत असल्यास करावयाचे नियंत्रण
कपाशीतील पिक उंबळत
किंवा मरत असल्यास करावयाचे नियंत्रण♥प्रगतशील शेतकरी♥
♥पाउसामुळे कपाशीतील पिक उंबळत किंवा मरत असल्यामुळे पिकात आकस्मित मर होते.
♥कपाशीचे पिक जास्त पाण्यास संवेदनशील आहे.
♥काळया व कमी निचर्याच्या जमिनीमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणावर आढळुन येते.
♥त्यामुळे शेतकरयांनी प्रथम शेतातील पाण्यचा निचरा करावा.
♥कपाशीतील पिक उंबळत किंवा मरत असल्यास
10 लिटर पाण्यामध्ये 200 ग्रॅम युरीया
सोबत 25 ग्रॅम काॅपर ऑक्सिक्लोराईड
किंवा
10 ग्रॅम कार्बनडेन्झिम मिसळुन
झाडाभोवती बांगडी पद्धतीने झाडाच्या घेर्यानुसार आळवणी करावी.
तसेच झाडाच्या बुंध्याजवळ किंवा खोडाजवळ माती पायाने दाबुन घ्यावी.
(शिफारस स्वजबाबदारीवर वापरावी)
संकलित!
Comments
Post a Comment