केळी लागवड व्यवस्थापण
केळी लागवड व्यवस्थापण ♥प्रगतशील शेतकरी♥
♥केळीच्या पिकासाठी प्रथम आपण आपल्या शेतातील माती नमुना घेऊन माती परिक्षण करावे.
♥केळीच्या लागवडीसाठी बसराई, श्रीमंती, ग्रँड-९ या प्रचलीत जातींचा वापर करावा. टिश्यू कल्चरची रोपे घेऊन लागवड करावी.
♥केळीच्या लागवडीसाठी उन्हाळ्यात जमिन नांगरून वखराच्या पाळ्या देऊन भुसभुशीत करावी. हेक्टरी १०० गाड्या कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळून द्यावे.
♥केळीची लागवड जून-जूलै महिन्यात जेव्हा हवामान उबदार असते तेव्हा करावी.
♥दोन झाडातील आणि दोन ओळीतील अंतर हे लागवड करायचा केळीचा जातीनुसार व जमिनीचा प्रतीनुसार १.२५ X १.२५ मीटर ते २.५ X २.५ पर्यंत ठेवावे. बसराई जातीची लागवड २ X २ मीटर अंतरावर केल्यास झाडांची वाढ चांगली होऊन घड मोठा होतो व फळांची प्रत सुधारते.
♥लागवडीचे वेळी ११० ग्रँम युरीया, ५०० ग्रँम सुपर फॉस्फेट, व १७० ग्रँम म्युरेट ऑफ पोटँश द्यावा. लागवडीनंतर २,४, व ६ महिन्यांनी ११० ग्रँम युरीया तसेच लागवडीनंतर दोन महिन्यांनी ५०० ग्रँम सुपर फॉस्फेट ही खते द्यावीत.
♥प्रत्येक झाडास लागवडीचे वेळी ५०० ते ७०० ग्रँम एरंडीची पेंड द्यावी.
♥केळीची मुळे जमिनीच्या वरच्या थरातूनच अन्नद्रव्य घेत असल्यामुळे वरखते नेहमी वर्तुळाकार पध्दतीने बुंध्याजवळ १० ते २० सेंटीमीटर अंतरावर ८ ते १० सेंटीमीटर खोलीचे आळे करून द्यावीत व नंतर मातीने खते झाकून पाणी द्यावे.
♥केळीच्या पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचनाच्या वापर केल्यास उत्पादन चांगले येते. असे दिसून आले आहे.
♥केळीच्या रोपासाठी आपण जैन इरीगेशन यांच्या जिल्हा कार्यालयात संपर्क साधावा किंवा तालुक्याच्या ठिकाणी डीलरशी संपर्क साधून रोपांविषयी चौकशी करावी.
संकलित!
Comments
Post a Comment