स्लरी व्यवस्थापण

स्लरी व्यवस्थापण

* स्लरीचे महत्व:
- सध्या कोणत्याही पिकाला स्लरी हि नवीन पद्धत खूप फायदेशीर ठरत आहे, परंतु याचा वापर शेतकरी अजूनही पाहिजे तितका करत नाही, कारण ती दुकानात मिळत नाही ती स्वतः  घरी बनवावी लागते.
- स्लरी शेतात वापरल्याने जमिनीमधील सूक्ष्म जिवाणू एक्टिव होतात कारण त्यांना ऊर्जा मिळते व त्या जिवाणूंमुळे जमिनीमधील अन्नद्रव्य पिकास उपलब्ध होतात. उदा. जर आपण जमिनीमध्ये यूरिया टाकला तर तो अमोनिकल स्वरूपात असतो व तो पीक घेऊ शकत नाही त्या अमोनिकल स्वरूपाचे रूपांतर nitrite मध्ये करण्याचे काम Nitrosomonas बॅक्टेरिया व nitrite चे रूपांतर nitrat मदे nitrobactor करत असतात व nitrat स्वरूपातील नत्र पीक घेत असते, म्हणून असे जीवाणू उतेजित करण्याचे काम स्लरी करत असते.
- स्लरी जमिनीचे भौतिक रासायनिक व जैविक गुणधर्म वाढवते.
- स्लरी जमिनीची पोकळी वाढवते व हवा खेळती ठेवते.
- स्लरी मुळे mineralisation (organic चे inorganic मदे रुपान्तर होणे) क्रिया लवकर होते, कारण हेच inorganic स्वरूपातील अन्नद्रव्य पीक घेत असते.
- स्लरी मुळे जमिनीचा कर्ब:नत्र गुणोत्तर टिकून राहते.
- महाराष्ट्रातील बहुताऊस जमिणींमदे कॅल्सीम कार्बोनेट चे प्रमाण जास्त आहे त्यामुळे पिकांच्या मुळ्या ब्लॉक होतात व झाड वाळते, स्लरी दिल्यास हा प्रॉब्लेम येत नाही व मूळ सर्व अन्नद्रव्य व्यवस्तीत घेते.

* स्लरी कशी बनवावी :-
- स्लरी साठी आपल्या जनावरांच्या गोठ्यात मलमूत्र साठवण्याची सोया असावी.
- जनावरांचे ताजे शेण उन्हात न ठेवता सावलीत ठेवावे.
- स्लरी साठी सिमेंटची 300 ते 400 लिटर ची टाकी असावी.
- स्लरी बनवताना 20 किलो शेण, 10 लिटर गोमूत्र, 200 ते 250 लिटर पाणी सिमेंटच्या टाकीत टाकून चांगले हलून घ्यावे.

स्लरी चे मुख्य प्रकार♥प्रगतशील शेतकरी♥

♥ मुख्य अन्नद्रवयाची स्लरी

♥ सूक्ष्म अन्नद्रवयाची स्लरी

♥ जिवाणूंची स्लरी

♥  कडधान्य स्लरी

संकलित!

1. मुख्य अन्नद्रव्याची स्लरी
@ स्लरीचे महत्व
        या स्लरी मुळे रासायनिक खते पिकास लवकर लागू होतात व त्यांची कार्यक्षमता वाढवते, पांढऱ्या मुळींची भरपूर वाढ होते, मुख्य अन्नद्रव्यातील स्फुरद चे स्थिरीकरण कमी करण्यास मदत करते व नत्राचे बाष्पीभवन होत नाही.
@ स्लरू कशी बनवावी
       साधारण 300 ते 350 फळझाडानसाठी ताजे शेण 20 kg, जनावरांचे मूत्र 10 lit, निंबोळी पेंड 15 kg, युरिया 5 kg, सिंगल सुपर फॉस्फेट 10 kg, पोटॅश 5 kg आणि 200 ते 250 lit पाणी या पद्धतीने मुख्य अन्नद्रव्याची स्लरी बनवावी व साधारणपणे महिन्यातून एकदा तरी प्रति झाड 1 lit या प्रमाणात वापरावी.

2. सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्य स्लरी
@ सूक्ष्म अन्नद्रव्य मुख्यतो झिंक व फेरस हे जमिनीमद्दे असेच दिल्यास ते पिकाला पूर्णतः न लागता जमिनीत दुसऱ्या फॉम मदे स्थिर होतात, म्हणून शक्यतो सूक्ष्म अन्नद्रव्य जमिनीतून देत असताना स्लरीच्या स्वरूपात द्यावे.
@ त्यासाठी ताजे शेण 20 kg, जनावरांचे मूत्र 10 lit, निंबोळी पेंड 15 kg, झिंक सुल्फेट 5 kg, फेरस सुल्फेट 3 kg, म्यॅग्नीस 2 kg, कॉपर सुल्फेट 100 gm व बोरॉन 30 gm.
@ दुय्यम अन्नद्रव्य स्लरी बनवताना ताजे शेण 20 kg, जनावरांचे मूत्र 10 lit, निंबोळी पेंड 15 kg, कॅल्सीम 15 kg, म्यॅगनेशिअम 15 kg, गंधक 10 kg, 200 ते 250 पाणी द्यावे
@ स्लरी दिवसातून दोन वेळेस चांगले हलवावे.
@ सूक्ष्म आणि दुय्यम अन्नद्रव्य स्लरी मध्ये 10 ते 12 दिवसांचे आंतर ठेवावे.

3. जिवाणू स्लरी
@ जिवाणू स्लरीचे फायदे
- नत्र युक्त जिवाणू स्लरी मुळे हवेतील नत्र शोषले जाऊन ते पिकांना उपलब्ध करून दिले जाते.
- अविद्राव्य स्वरूपातील स्फुरद विरघळून पिकांना उपलब्ध करून दिले जाते.
- सेंद्रिय पदार्थाचे जलद विघटन होते.
- बियाणांच्या उगवण क्षमतेत वाद होते.
- पिकांची जोमदार वाफ व रिगप्रतिकर शक्तीत वाढ होते.
जमिनीचा पोत सुधारतो.
- रासायनिक खतावरील खर्चात कपात होते.
- हे जिवाणू नायसर्गिक आहेत म्हणून त्यांचा जमिनीवर व पिकावर जास्त मात्रेने देखील दुष्परिणाम होत नाही.

@ जिवाणू स्लरी कशी बनवावी
- ताजे शेण 20 kg, जनावरांचे मूत्र 10 lit, काळा गूळ 2 kg, ऍझोटोबॅक्टर 500 gm, फॉस्फेट सोलुब्लिसिन्ग मायक्रो ऑर्गॅनिसम 500 gm, पोटॅश मोबिलिझर 500 gm, इ एम द्रावण 1 lit व इतर जैविक बुरशीनाशके 1 kg, 200 ते 250 लिट पाणी.
- शक्यतो जैविक खते व बुरशीनाशके एकत्र वापरू नाही.

4. कडधान्य स्लरी
@ एक एकर क्षेत्रासाठी कडधान्य स्लरी
- ताजे शेण 20 kg, जनावरांचे मूत्र 10 lit, हुमिक ऍसिड व व्हर्मीवॉश 2 lit, भरडा कडधान्य प्रत्येकी 1 kg मूग, मठ, चवळी, हरभरा, मसूर, वाटाणा, उडीद, इ एम द्रावण 2 lit व 200 ते 250 लि. पाणी.

टीप.. वरील सर्व स्लरी द्रावण 5 ते 6 दिवस ठेवायचे, दररोज सकाळी 2 मिनिट हालवायचे व 7 व्या दिवशी वापशावर जमिनीतून पिकाला आळवणी (ड्रेंचिंग) करावी.
- हि स्लरी एक एकर क्षेत्रासाठी वापरावी.

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!