भुईमुगाचे नियोजन तक्ता(schedule/शेड्यूल)

भुईमुगाचे नियोजन तक्ता(schedule/शेड्यूल)♥प्रगतशील शेतकरी♥

♥भुईमुग पिकाला पहिल्या पावसाचा फायदा होतो.
जमिनीत ओल असताना 2.5 किलो रायझोबियम जिवाणू संवर्धन अधिक 2.5 किलो स्फुरद विरघळविणारे जिवाणू चांगल्या मुरलेल्या 25 किलो शेणखतात मिसळून एक हेक्‍टर क्षेत्रावर सर्वदूर पसरवावे.

♥ नत्रयुक्त खत धूळपेरणी करताना देऊ नये, स्फुरदयुक्त व पालाशयुक्त खत पेरणीपूर्वी शेत तयार करताना पेरून द्यावीत.
पाऊस येऊन भुईमुग बियाण्याची उगवण झाल्यानंतर नत्रयुक्त खताची मात्रा द्यावी.

♥ भुईमुग धूळपेरणीनंतर एक महिना जरी पाऊस आला नाही तरी बियाणास काहीच धोका नसतो.
मुंग्या लागत नाही.
मात्र बियाण्यास पेरणीपूर्वी तीन ग्रॅम थायरम किंवा दोन ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा पाच ग्रॅम मॅन्कोझेबची बीजप्रक्रिया करावी.

♥ पेरणीलायक पाऊस झाल्यावर पेरणीच्या दिवशी प्रति किलो भुईमुग बियाण्यास 25 ग्रॅम रायझोबियम जिवाणूसंवर्धन आणि 25 ग्रॅम पीएसबी अधिक 4 ग्रॅम ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया करून लगेचच पेरणी करावी.

♥ भुईमुग पिकाला माती परीक्षणानुसार खते द्यावीत.

शिफारशीनुसार 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद अधिक 25 किलो पालाश प्रति हेक्‍टरी द्यावे.
यासाठी साधारणतः भुईमुगला एकरी 20 किलो युरिया, दोन पोते सिंगल सुपर फॉस्फेट आणि 20 किलो म्युरेट ऑफ पोटॅश लागेल.

भुईमुग पिकाला संपूर्ण रासायनिक खत पेरणीच्या वेळेसच द्यावे.

♥भुईमुगाची उगवण झाल्यानंतर फुले येण्यापूर्वी 20 ते 25 दिवस ताण जर बसला तर उत्पादनात वाढ होते, म्हणून अशावेळी संरक्षक ओलित देऊ नये. योग्य वेळी डवऱ्याचे निंदण करावे. पन्नास दिवसांचे पीक झाल्यानंतर भुईमुगास भर द्यावी.

♥ भुईमुग पन्नास टक्के फुलोरा अवस्थेत एकरी 100 ते 150 जिप्सम पिकाच्या बुडाशी द्यावे.

♥ भुईमुग पिकाला वर्षातून एकदा चार किलो झिंक सल्फेट आणि तीन वर्षांतून एकदा दोन किलो बोरॅक्‍स प्रति एकरी द्यावे.

♥ पन्नास दिवसांचे भुईमुग पीक झाल्यानंतर भुईमुगास भर द्यावी.

वाढ जास्त झाली असल्यास लिहोसीन न फवारता 60 व्या दिवशी 200 लिटरचा मोकळा ड्रम पिकावर फिरवावा, त्यामुळे झाडे जमिनीवर लोळतात.

भुईमुगास कोणत्याही प्रकारचे टॉनिक पिकास देण्याची गरज नाही.

♥ भुईमुग पीक परिपक्व झाल्यानंतर योग्य वेळी काढणी करावी.

मजुरांचा तुटवडा असल्यास शेत टणक होण्यापूर्वी झाड उपटून शेंगासहित वाळू द्यावी,

म्हणजे भुईमुग शेंगा जमिनीत खुडण्याचे प्रमाण कमी होईल.

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!