बीटी कपाशीवर फवारणी क्रम(40 ते 60 दिवस)
बीटी कपाशीवर फवारणी क्रम(40 ते 60 दिवस)♥प्रगतशील शेतकरी
♥1. व्हर्टिसिलीयम लिकॅनी 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
किंवा
थायामेथोक्झाम (25 टक्के) 2.5 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
किंवा
ऍसिटामिप्रीड (20 टक्के) दोन ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
♥2. नोमूरिया रिलाई 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावा.
♥3.
युरीया 13 किलो
डिएपी18:46:00 22 किलो
पोटॅश 17 किलो
(वरिल खताची मात्रेत माती परिक्षणानुसार बदल करावे, उपरोक्त कपाशीकरता लागणारी एकुण मात्रेपैकी खताची दुसरी मात्रा आहे.
खताची दुसरी मात्रा शिफारस
12 किलो नत्र 10 किलो स्फुरद 10 किलो पालाश प्रती एकर)
♥मॅग्नेशिअम ची कमतरता असल्यास
पेरणीपासुन 45 ते 75 दिवसांनी मॅग्नेशिअम सल्फेट ची फवारणी करावी.
♥झिंक ची कमतरता असल्यास
कमतरतेची लक्षणे दिसुन आल्यास 5 ते 6 दिवसांच्या अंतराने
झिंक सल्फेट ची फवारणी त्वरित करावी.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
वरिल फवारणी करण्यापुर्वी खाली दिलेली माहितीचा आधार घ्यावा!
♥बीटी कपाशीवरील किडींच्या व्यवस्थापनासाठी केवळ रासायनिक कीटकनाशकांचाच वापर न करता इतर मशागतीय, यांत्रिक, जैविक पद्धतींचासुद्धा वापर करावा.
♥पिक 40 ते 60 दिवसाचे असताना आर्थिक नुकसानीच्या पातळीनुसार रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करावी.
♥पिकाचा कालावधी - 40-60 दिवस
संभाव्य प्रमुख किडी - तुडतुडे, फुलकिडे, पिठ्या ढेकूण, पांढरी माशी, तंबाखूवरील पाने खाणारी अळी (स्पोडोप्टेरा).
* व्हर्टिसिलीयम लिकॅनी या बुरशीवर आधारित कीटकनाशकाची 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किंवा
* थायामेथोक्झाम (25 टक्के) 2.5 ग्रॅम किंवा ऍसिटामिप्रीड (20 टक्के) दोन ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
* तंबाखूवरील पाने खाणारी अळी (स्पोडोप्टेरा)च्या व्यवस्थापनासाठी नोमूरिया रिलाई हा बुरशीजन्य घटक 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावा. अंडीपुंज व लहान अळ्या हाताने वेचून नष्ट कराव्यात.
* सुरवातीच्या काळात दुय्यम किडी जसे करडे भुंगेरे, पाने पोखरणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी, उंटअळ्या, केसाळ अळ्या इत्यादी कमी प्रमाणात आढळून येतात, त्यांच्यासाठी कीटकनाशकाची फवारणी करू नये.
संकलित!
Comments
Post a Comment