निवडक व बिननिवडक तणनाशके
निवडक व बिननिवडक तणनाशके♥प्रगतशील शेतकरी ♥
♥निवडक तणनाशके
निवडक तणनाशके यातील निवडक तणनाशके म्हणजे त्यांच्या वापरामुळे तणांचा बंदोबस्त होतो.
मात्र, पिकास इजा होत नाही किंवा पिकांवर वाईट परिणाम होत नाही.
उदाहरणार्थ
ऍल्कोर,
बीटाक्लोर,
ऍट्राझिन,
पॅडी मिथॅलीन,
फ्लू क्लोरॅलीन,
2-4 डी इत्यादी तणनाशके उभ्या पिकात अथवा पीक पेरणीनंतर फवारली जातात.
त्यांचा मुख्य पिकांवर अनिष्ट परिणाम होत नाही.
♥बिननिवडक तणनाशके
बिननिवडक तणनाशके म्हणजे सर्व वनस्पतींचा (पीक आणि तण) नाश किंवा बंदोबस्त होतो.
अशा तणनाशकांचा वापर प्रामुख्याने पडीक जमिनीवरील किंवा बांधावरील तण नियंत्रणासाठी केला जातो.
उदाहरणार्थ पॅरापॉट, क्लायफोसेट इत्यादी.
स्पर्शजन्य तणनाशके म्हणजे ती फवारली जातात तेथील पेशी मरतात आणि तणांचा बंदोबस्त होतो.
अशा प्रकारची तणनाशके लव्हाळा, हरळी, कुंदा इत्यादी बहुवार्षिक तण नियंत्रणाकरता योग्य आहेत.
(सुचना- वरिल शिफारस वापरकर्त्याने स्वत:च्या जबाबदारीवर वापरावीत!)
संकलित!
Comments
Post a Comment