पिक आणि रासायनिक खतांचे गणित असे कराल

पिक आणि रासायनिक खतांचे गणित असे कराल♥प्रगतशील शेतकरी♥

♥प्रथम पिकाला लागणारी मुख्य अन्नद्रव्य शिफारस घ्यावी

उदाहरण - संकरित टमाट्याला लागणारी मात्रा 300 किलो नत्र :150 किलो स्फुरद:150 किलो पालाश प्रती हेक्टर

♥कृषि केंद्रामध्ये उपलब्ध असलेले किंवा आपल्या अनुभवातील संयुक्त वा मिश्र खत (नत्र, स्फुरद,  पालाश असलेले) निवडावे.

उदाहरण युरिया, डीएपी, म्युरेट ऑफ पोटॅश

★युरिया

100 किलो युरीयामध्ये

46 किलो नत्र आहे,
00 किलो स्फुरद आहे,
00 किलो पालाश आहे

★डीएपी

100 किलो डीएपी मध्ये

18 किलो नत्र आहे,
46 किलो स्फुरद आहे,
00 किलो पालाश आहे

★म्युरेट ऑफ पोटॅश

100 किलो पोटॅश मध्ये

00 किलो नत्र आहे,
00 किलो स्फुरद आहे,
60 किलो पालाश आहे

♥आता वरील पिकांना लागणारी मात्रा (टमाटा-300:150:150 व आपण आणणारे खत जसे युरिया, डीएपी, म्युरेट ऑफ पोटॅश) यांचे गणित करावे.

गणित करताना प्रथम संमिश्र खतातील मोठी संख्या निवडा
जसे 18:46:00 डिएपी मधील 46 ही . नत्र:स्फुरद :पालाश ही अनुक्रमणिकेनुसार 46 ही स्फुरद चे स्थान आहे व 

त्यानुसार त्या संख्येला खालील दिलेल्या गुणांकाच्या मदतीने गुणाकार करा.
जसे 2.17 X 150 = 325.5 किलो डिएपी

त्याच बरोबर डिएपी चे नत्र याचे गणित करा
जसे 100 किलो मध्ये 18 किलो नत्र
तर 325.5 किलो मध्ये 58.59 किलो नत्र
(325.5 X 18 = 5859 / 100 = 58.59)

टमाट्याला नत्र मात्रा 300 किलो आहे व डिएपी मधुन 58.59 किलो मात्रा मिळते आता उरलेली मात्रा म्हणजे 300 - 58.59 = 241.41 मात्रा युरीयाव्दारे द्यावी.
2.17 X 241.41 = 523.85 किलो युरीया

आता टमाट्यातील पोटॅश शिफारशीनुसार  150 किलो पालाश करीता
150 X 1.67 = 250.5 किलो म्युरेट आॅफ पोटॅश

वरील शिफारस  माती परीक्षण नुसार व खत देण्याच्या टप्यानुसार बदलेल परंतु गणिताची पद्धत तीच राहील!.

♥सारांश
गणित केल्यानंतर टमाटा पीकासाठी लागणारा नत्र, स्फुरद,  पालाश ( NPK ) 300:150:150 किलोकरीता खतांचा साठा खालील प्रमाणे

हेक्टरी प्रमाण                                     एकरी प्रमाण  

डिएपी 325.5 किलो                          डिएपी 130.2 किलो
युरीया 523.85 किलो                       युरीया 209.54 किलो
म्युरेट आॅफ पोटॅश 250.5 किलो       म्युरेट आॅफ पोटॅश 100.2 किलो

(सुचना-वर दिलेली उदाहरण फक्त उदाहरण आहे, संशोधन शिफारस बदलत राहते!)

♥गुणांक व खत तालिका

एक किलोतील विविध अन्नद्रव्ये देण्यासाठी लागणाऱ्या रासायनिक खतांचे गुणांक माहिती असतील तर माती परीक्षण अहवालाच्या शिफारशीनुसार रासायनिक खतांचा वापर करणे सोपे जाते.

एक किलो नत्र देण्यासाठी रासायनिक खतांचे प्रमाण -
* 2.17 किलो युरिया
* 4.85 किलो अमोनिअम सल्फेट
* 4.76 किलो कॅल्शिअम अमोनिअम नायट्रेट
* 5.55 किलो डीएपी 18-46
* पाच किलो 20-20-0
* 10 किलो 10-10-26
* 4.35 किलो 23-23-0
* 5.26 किलो 19-19-19
* 6.66 किलो 15-15-15

एक किलो स्फुरद पेंटॉक्‍साईड देण्यासाठी रसायनिक खते -
* 6.25 किलो सिंगल सुपर फॉस्फेट
* 2.17 किलो डीएपी (18-46)
* 5.55 किलो 18-18-0 (नत्रः स्फुरदः पालाश)
* 3.85 किलो 10-26-26
* पाच किलो 20-20-0
* 4.35 किलो 23-23-0
* 5.26 किलो 19-19-19
* 6.66 किलो 15-15-15

एक किलो पालाश ऑक्‍साईड देण्यासाठी रासायनिक खते
* 1.67 किलो म्युरेट ऑफ पोटॅश
* 2.08 किलो सल्फेट ऑफ पोटॅश
* 3.85 किलो 10-26-26
* 5.26 किलो 19-19-19
* 10 किलो 18-18-10

एक किलो कॅल्शिअम देण्यासाठी रासायनिक खते
* पाच किलो सिंगल सुपर फॉस्फेट
* 4.35 किलो जिप्सम
* 2.5 किलो लाईमस्टोन
* पाच किलो डोलोमाईट

एक किलो मॅग्नेशिअम देण्यासाठी
* 10.4 किलो मॅग्नेशिअम सल्फेट
* आठ किलो डोलोमाईट

एक किलो गंधक देण्यासाठी
* 4.2 किलो अमोनिअम सल्फेट
* 8.3 सिंगल सुपर फॉस्फेट
* 5.55 किलो जिप्सम
* 6.70 अमोनिअम फॉस्फेट
* एक किलो लोह देण्यासाठी 5.0 किलो फेरस सल्फेट
* एक किलो जस्त देण्यासाठी 4.5 किलो झिंक सल्फेट
* एक किलो मॅंगेनिज देण्यासाठी 4.12 किलो मॅंगेनिज सल्फेट
* एक किलो बोरॉन देण्यासाठी 9.1 किलो बोरॅक्‍स
* एक किलो बोरॉन देण्यासाठी 5.88 किलो बोरीक ऍसिड
* एक किलो मॉलिप्टेनम देण्यासाठी 1.85 किलो अमोनिअम मॉलिप्टेनम
* एक किलो तांबे देण्यासाठी 4.0 किलो कॉपर सल्फेट

टीप -
100 किलो रासायनिक खतातील अन्नद्रव्यांच्या टक्केवारीचे प्रमाण काढण्यासाठी 100 ला रासायनिक खतांच्या आकडेवारीने भाग द्यावा .

संकलित!

Comments

  1. एका ऐकरासाठी नत्र पालाश स्फुरदचे प्रमाण किती

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!