सततच्या पावसामुळे पिकात पाणी साचले तर काय कराल
सततच्या पावसामुळे पिकात
पाणी साचले तर काय कराल♥प्रगतशील शेतकरी♥
♥अतिवृष्टिग्रस्त भागातील पिकांच्या संरक्षणाचे उपाय आणि पिकात साचलेल्या पाण्याच्या निचराचे नियोजन पाउस येण्याआधी पेरणीपुर्वी शेत तयार करतानाच करायला हवे. परंतु काही कारणाने ते नियोजन झाले नसेल व अति वा सतत पाउसामुळे आता पिक अडचणीत आले असेल तर खाली दिलेले उपाय वाचावे.
♥या वर्षी पावसाने संपूर्ण बहुतेक ठिकाणी आतापर्यंतची सरासरी ओलांडली आहे.
♥जर पाऊस काही दिवस सतत पडत असेल तर अतिवृष्टीमुळे व सततच्या ढगाळ हवामानामुळे बहुतेक शेतांतील पिकांमध्ये पाणी साचून राहिले आहे.
♥त्यामुळे कापूस, सोयाबीन, मिरची, ज्वारी, पानमळा इत्यादी पिकांसोबत इतरही पिकांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
♥त्या दृष्टीने जागरूक राहून वेळीच उपाय योजना करणे आवश्यक आहे.
♥अतिवृष्टीमुळे जमिनीत पाणी साचून मातीमधील ओलावा वाजवीपेक्षा जास्त टिकून राहते.
♥सततच्या पावसामुळे जमिनीचा वरचा थर दाबला जाऊन खेळत्या हवेचे प्रमाण कमी होते.
♥परिणामी झाडास अपुरा प्राणवायूचा पुरवठा आणि जिवाणूंच्या व मुळांच्या श्वसन प्रक्रियेस झालेली बाधा ही झाडे मलूल होण्याची संभाव्य कारणे ठरू शकतात.
♥शेतात पाणी जास्त दिवस साचून राहिल्यामुळे झाडे सडतात, कोलमडतात प्रसंगी मरतात व त्यामुळे शेतकर्याचे नुकसान होते.
♥मूळ सडण्याचे प्रमाण भारी जमिनीत तसेच खोलगट भागात अधिक असते.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
♥पाणी साचुन राहील्यास काय उपाय करावे?
१) जमिनीतील पाण्याचा निचरा योग्य तऱ्हेने करावा,
त्यामुळे जमिनीतील खेळत्या हवेचे प्रमाण वाढेल.
त्यातून पिकाची मलूल झालेली स्थिती सुधारू शकते.
२) शेतात योग्य ठिकाणी ठरावीक अंतरावर चर खोदून शेतातील साचलेले पाणी शेताबाहेर काढावे.
मलूल झालेल्या झाडाभोवतीची माती उकरून मोकळी करावी
व
त्यामध्ये कॉपर ऑक्झिक्लोराईड (५० टक्के) २५ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून ते द्रावण खोडाभोवती, मुळांजवळ टाकावे.
३) वाफसा आल्यानंतर शेतातील उकरणी, डवरणी करावी व मलूल झालेल्या झाडांना एक टक्का युरियाची (१०० ग्रॅम युरिया दहा लिटर पाण्यात) फवारणी करावी
किंवा
अशा झाडांना बांगडी पद्धतीने युरिया देऊन जमिनीची उकरणी करावी.
४) पिकावर रस शोषण करणाऱ्या किडींचा (मावा, फुलकिडे, तुडतुडे आणि पांढरीमाशी) प्रादुर्भाव वाढू लागला असेल
व
या किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्यास (मावा, फुलकिडे व पांढरीमाशी दहा कीटक प्रति पान आणि दोन-तीन तुडतुडे प्रति पान)
व
मित्र कीटकांची (लेडीबर्ड बिटल, क्रायसोपा इ.) संख्या कमी असल्यास कीडनाशकाची फवारणी करावी.
त्यामध्ये डायमिथोएट (३० टक्के प्रवाही) दहा मि.लि.
किंवा
ऑक्सिडिमेटॉन मिथाईल ( २५ टक्के प्रवाही) आठ मि.लि.
किंवा ऍसिटामीप्रीड (२० टक्के) चार ग्रॅम,
किंवा
थायामेथोक्झाम (२५ टक्के) चार ग्रॅम
किंवा
फिप्रोनिल (पाच टक्के) २० मि.लि.
किंवा
ऍसिफेट (७५ टक्के) २० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
५) सततच्या पावसामुळे पिकाच्या प्रामुख्याने सोयाबीन पिकावर कायिक वाढीमुळे हिरवी उंट अळी व तंबाखूची पाने खाणाऱ्या अळीचा (स्पोडोप्टेरा) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊन पिकाचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही,
त्याकरिता अळ्यांच्या नियंत्रणासाठी स्पोडोप्टेरा अळ्यांचे अंडीपुंज व लहान अळ्यांचा समूह असलेली पाने गोळा करून अंडी, अळ्यांसह नष्ट करावीत.
स्पोडोप्टेरा व हिरवी उंट अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास
निंबोळी पाच टक्के अर्काची फवारणी करावी.
उपलब्धतेनुसार बिव्हेरिया बॅसीयाना, मेटारायझियम ऍनिसोप्ली या जैविक घटकांची फवारणी करणे योग्य ठरते.
६) पाने खाणाऱ्या अळ्या या पांढरी-हिरवी बुरशी (मस्कारडाईज फंगस)ने ग्रस्त झालेल्या आढळल्या तर पिकात बुरशीनाशकाची फवारणी टाळावी.
या अळ्यांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असेल व रासायनिक कीटकनाशकांच्या फवारणीची आवश्यकता असेल अशा परिस्थितीत
क्विनॉलफॉस (२५ टक्के) २० मि.लि.
किंवा
क्लोरपायरिफॉस (२० टक्के) २० मि.लि.
किंवा
इमामेक्टीन बेन्झोएट (५ एस.जी.) पाच ग्रॅम
किंवा
स्पिनोसॅड (४५ एस.जी.) चार मि.लि.
किंवा
थायोडीकार्ब (७५ टक्के) १५ ग्रॅम
किंवा
प्रोफेनोफॉस (५० टक्के) २५ मि.लि. दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
७) शेताची वा फळबागेची पाहणी करून पाणी साचले असल्यास शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी, तसेच जास्त पावसामुळे फळगळ होऊ नये याकरिता काळजी घ्यावी.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
साल खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास वेळीच उपाय योजना करावी.
या किडीची मादी जून-जुलैमध्ये १५ ते २५ च्या पुंजक्यात अंडी घालते.
आठ ते दहा दिवसांत अंड्यांमधून अळ्या बाहेर पडतात, त्या साल कुरतडून खातात.
कुरतडलेली साल व जाळे दिसून आल्यास या किडीचा प्रादुर्भाव झाला असे समजावे.
या किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असेल, तर कीडग्रस्त फांद्यांवरील अळीच्या विष्टेची जाळी काढून साल पोखरणाऱ्या अळीचे छिद्र मोकळे करावे.
नंतर त्यामध्ये शिफारस केलेल्या कीटकनाशकाचे द्रावण छिद्रामध्ये टाकून ते ओल्या मातीने बंद करावे.
संकलित!
Comments
Post a Comment