बाजी प्रभु...यमालाही वाट पहायला लावणारा योद्धा

बाजी प्रभु - यमालाही वाट बघायला लावणारी माणसे

7 जुन - आज फार मोठा ऐतिहासिक दिवस आहे मंडळी ..
🗣🗣🗣🗣🗣🗣
आजच्याच दिवशी तो पावनखिंडीतील चित्त थरारक दिवस घडला.

🗣६ हजार विरुध्द ३०० जण लढलेच कसे असतील?
🗣काय माणसे असतील ती ?
काय ती मंतरलेली रात्र असेल ?
🗣खरंच! शब्दानाही कोडं पडावं अशी काही माणसं असतात...
🗣पन्हाळ गडाहून अंधाऱ्या रात्रीत पळत त्या पावनखिंडीत यायचे तेही आडवाटेने.
🗣अंतर सहज ४०-५० कि.मी. असेलच की. रात्रभर धावायचे आणि पुन्हा हातात हत्यारे घेऊन शत्रूशी दोन हात करायचे ३०० विरुध्द ६ हजार....
कसा मेळ बसायचा?
🗣लढाईचे परिणाम काय होणार हे त्या ३०० जणांना माहित असणारच की....
🗣आपण कापले जाणार , मरणार. पण तरीही लढणार ....
कसली माणसे होती ती..

🗣या असल्या नरवीरांच्या मुळे मंडळी आज आपण ''मराठा '' म्हणवून घेत आहोत.
🗣६ तास अखंड झुंज द्यायची...
त्या आधी रात्रभर धावायचे ....
अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी येते विचार करता करता...
"🗣 तोफांचे आवाज कानावर पडत नाहीत तोवर आमच्या बाजींनी जीव सोडला नव्हता...
"🗣 प्रत्यक्ष यमदेव त्या पावन खिंडीत तोफांचे आवाज होईपर्यंत थांबला होता...
"🗣 त्या यमालाही वाट बघायला लावणारी माणसे या महाराष्ट्राच्यामातीने जन्माला घातली ....

" 🗣मंडळी हे स्वराज्य सुखाने नाही मिळाले .. हजारो प्राणांचे बलिदान आहे यामागे.

नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांना मानाचा मुजरा ||

आपला इतिहास हाच महाराष्ट्राचा खरा दागिना आहे !!

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!