लाल कोळी (Mites) प्रभावी एकात्मिक कीड नियंत्रण
लाल कोळी (Mites) प्रभावी एकात्मिक कीड नियंत्रण♥प्रगतशील शेतकरी♥
♥ ही कीड पानांच्या खालील बाजूस जमावाने आढळते.
पानांतील रस शोषून घेते.
त्यामुळे पाने पिवळी पडतात.
या किडीचे अस्तित्व समजते.
कधीकधी झाडावरील पिकणार्या फळांच्या पृष्टभागावर ही कीड आढळते.
त्यामुळे फळाची साल खडबडीत व अनैसर्गिक तपकिरी रंगाची दिसते.
कीड इतकी लहान असते की, ती केवळ भिंगातून दिसते.
♥किडींची संख्या ठराविक मर्यादेत असतानाच
कीडनाशकाचा वापर झाल्यास फवारण्याची संख्या कमी करता येते.
त्यांचे अंश कमी होतात.
पर्यावरणीय हानी कमी होते.
मजुरी खर्चात बचत होते.
♥पाऊस व कीड नियंत्रण संबंध
मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस कमीत कमी अर्धा तास झाल्यास फुलकिड्यांची (थ्रिप्स), लालकोळी संख्या मोठ्या प्रमाणात कमी होते.
परिणामी रसशोषक किडींची संख्या वाढू लागली आहे म्हणून एकात्मिक कीड नियंत्रणाचे उपाय अंमलात आणण्याची गरज वाढली आहे.
पाऊस पडल्यानंतर द्राक्षात पुढील चार-पाच दिवस फुलकिड्यांकरिता तसेच लाल कोळ्यांच्या नियंत्रणासाठीही 15 ते 20 दिवस फवारणी करावी लागत नाही.
टोमॅटो, मिरची (ढोबळीसह), सोयाबीन आदी पिकांतही फुलकिड्यांसाठी फवारणी 4 ते 6 दिवस उशिरा करावी लागते.
♥पिकांमध्ये डब्ल्यूडीजी सल्फरचा वापर
पिकांवर बुरशी येण्याच्या अवस्थेमध्ये सल्फरचा (गंधक) वापर फवारणीकरिता केल्याने भुरी रोग तसेच लाल कोळीचेही नियंत्रण चांगले होते.
रसशोषक किडींच्या व अळीच्या वेगवेगळ्या अवस्था नियंत्रित करण्यात सल्फरचा उपयोग काही प्रमाणात होतो.
विशेषतः सर्व किडींच्या सुरवातीच्या अवस्थांचे सल्फरमुळे 30 ते 40 टक्क्यापर्यंत नियंत्रण मिळते.
द्राक्षपिकात खरड छाटणीनंतर भुरी नियंत्रणाकरिता सल्फरचा वापर करीत राहिल्यास त्यासोबत काही प्रमाणात रसशोषक किडीचे नियंत्रण होते.
पाने कुरतडणाऱ्या भुंग्याचे, अळीचेही प्रभावी नियंत्रण मिळते हे तुलनात्मकरीत्या लक्षात आले आहे.
♥जनावरांचे मूत्र(विशेषत: गोमुत्र) फवारून नियंत्रण!
भाजीपाला व फळपिकांत फवारणीची संख्या जास्त असते याचा विचार करून वेगवेगळ्या जनावरांचे मूत्र फवारून कीड नियंत्रणाचे प्रयोग झाले.
या पद्धतीद्वारा फुलकिडीचे नियंत्रण झाल्याचे आढळले.
मात्र साधारणपणे एक दिवसाआड सलग 4 ते 5 वेळा फवारणी केली, तरच किडीचे प्रमाण कमी होते.
जनावरांच्या मूत्रामुळे किडी मरत नाहीत, फक्त शेतापासून दूर जातात.
शक्य असलेल्यांनी हा प्रयोग जरूर करावा.
फवारणीकरिता प्रमाण प्रति 1 लिटर पाण्यास 20 मि.लि. वापरावे.
♥पाणी फवारणीतून लाल कोळीचे नियंत्रण
लाल कोळी ही कीड द्राक्ष, गुलाब, टोमॅटो, ढोबळी मिरची, वांगी यासारख्या पिकांवर येते.
विशेषतः थंड हवामानात या किडीची संख्या जास्त वाढते.
ही कीड तिच्या वसाहतीभोवती जाळे तयार करते.
त्यामुळे एकरी 400 ते 500 लिटर कीडनाशकाचे द्रावण फवारूनही किडीपर्यंत ते पोचत नाही व प्रभावी नियंत्रण मिळत नाही.
त्यासाठी हे जाळे तुटणे गरजेचे असते.
♥एकरी एक हजार ते दोन हजार लिटर पाणी जोरदार प्रेशरने फवारले तर वसाहती भोवतालचे जाळे फाटते.
काही प्रमाणात अंडी पाण्याने धुऊन जमिनीवर पडतात व किडीची संख्या कमी होते.
♥पाणी फवारणी प्रयोगानंतर दुसऱ्या दिवशी लाल कोळी नियंत्रकाची फवारणी केल्यास कमीत कमी फवारण्यांमध्ये किडीचे यशस्वी नियंत्रण होण्यास मदत होते.
♥ लाल कोळीच्या नियंत्रणासाठी उपाय :
लाल कोळीच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्क 4 टक्के (4 किलो निंबोळी पावडर प्रति 100 लिटर पाणी) प्रति 10 लिटर पाण्यातून
लाल कोळीच्या नियंत्रणासाठी गंधकाची कोरडी भुकटी पानांच्या खालच्या बाजूवर धुरळावी. 300 मेश गंधक भुकटी एकरी 8 किलो धुरळावी.
किंवा
लाल कोळीच्या नियंत्रणासाठी अबामेक्टीन (1.9 ईसी) 4 मिलि प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे.
किंवा
लाल कोळीच्या नियंत्रणासाठी 20 ग्रॅम पाण्यात मिसळणारे गंधक 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
किंवा
लाल कोळीच्या नियंत्रणासाठी केलथेन 10 मिली
किंवा
लाल कोळीच्या नियंत्रणासाठी वर्टीमेक 5 मिली
किंवा
लाल कोळीच्या नियंत्रणासाठी ओमाईट 5 मिली प्रती 10 लिटर पाण्यातून आलटून पालटून फवारावे.
संकलित!
Comments
Post a Comment