फळभाज्यांमधील अळी नियंत्रण

फळभाज्यांमधील एकात्मिक अळी नियंत्रण असे कराल♥प्रगतशील शेतकरी♥

♥टोमॅटो, वांगी, मिरची, दुधी यांसारख्या फळभाज्या प्रादुर्भावीत झाल्यानंतर माल काढणी करताना प्रादुर्भावीत फळे शेतातच त्या-त्या वेलाखाली, झुडपाखाली टाकली जातात.

त्यामधील अळी बाहेर निघून दुसऱ्या फळात जाते.

अशा चक्रामुळे अळीमुळे खराब होणाऱ्या फळांची संख्या वाढते व फळाच्या आतील भागात अळी असल्याने फवारलेले कीटकनाशक तिथेपर्यंत पोचण्याचे प्रमाण कमी राहते, त्यामुळे अळीचे नियंत्रण लवकर मिळत नाही.

यावर उपाय म्हणून कीडग्रस्त फळे वेचून बाहेर काढून जमिनीत पुरून टाकल्यास कीड नियंत्रण लवकर मिळते व फवारणीची संख्या कमी होते.

♥1) अळी बंदोबस्त व लहान पानाच्या रोगाचे नियंत्रणासाठी

रोगार 15 मिली + एन्डोसल्फान 15 मिली प्रती 10 लीटर पाणी,

मोनोक्रोटोफॉस 8 मिली + नुवान 7 मिली प्रती 10 लीटर पाणी या प्रमाणे फवारणी घ्यावी

तसेच

एन्डोसल्फान 10 मिली + मोनोक्रोटोफॉस 20 मिली प्रती 10 लीटर पाणी या प्रमाणे फवारणी घ्यावी.

गरज पडल्यास नंतर
एन्डोसल्फान 10 मिली + अँसीफेट 20 ग्रॅम प्रती 10 लीटर पाणी या प्रमाणे फवारणी घ्यावी.

जास्त रोगट झालेली झाडे काढुन टाकावीत.

♥2) अळी हीरवी असेल तर एन.पी.व्ही वापरावे.

♥3) मिरची पानावरील ठीपक्यांच्या नियंत्रणासाठी

एम-45, 20 ग्रॅम

किंवा

डायथेन झेड 78, 20 ग्रॅम

किंवा

बावीस्टीन 20 ग्रॅम किंवा बोर्डोमिश्रण 0.5%
वरीलपैकी एक प्रती 10 लीटर पाणी या प्रमाणे आलटुन पालटुन फवारणी घ्यावी.

♥5) आळीच्या नियंत्रणाकरीता  प्रकाश सापळे लावु शकता!

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!