विड्याचे पानाची लागवड Betel Leaf cultivation
विड्याचे पान (Betel Leaf)
1 Comment Posted by ayurgarden on February 6, 2012
विड्याचा वेल
माहिती
बारीक नाजूक छान दिसणारा वेल
पाने गुळगुळीत, चमकदार, लांब देठची, हृदयाच्या आकाराची एक टोक असणारी
एका आड एक पाने येतात
पेराला मुळे फुटतात. वेल पुढे वाढत जातो
खाण्यासाठी जी पाने पिकलेली मधूर स्वादाची लहान पातळ असतात ती उत्तम
औषधी गुणधर्म
रुची वाढवणारे
कांतीदायक
कफनाशक
सारक
शक्तीवर्धक
वायूनाशक
पोटसाफ ठेवणारे
पाचक
पित्तकारक
शरीरशुध्दी करणारे
सर्वसामान्य उपाय
सारखे नाक गळत असल्यास पानाचा एक चमचा रस घेउन थोडा कोमट करुन मधाबरोबर खाल्यास बरे वाटते
विड्याची पाने
सारखा कफ पडतो व छाती भरलेली असते. अशा वेळी विड्याच्या पानांचा रस व अडूळसा रस असे मधामधून घेतले तर उतार पडतो
गोडाधोडाचे जेवण झाल्यावर विडा खाल्यास पचन व्यवस्थित होते
नियमितपणे साधा घरगुती विडा खाण्यास ठेवला तर शौचास साफ होते
विड्याची पाने वाटून जखमेवर पोटीस लावले तर दोन दिवसात जखम भरते
पान खाल्याने तोंडाची अरुची चिकटपणा व दुर्गंधी जाते
पानात असणारा तिखटपणा जंतुनाशक असतो. त्यामुळे पान नुसते चावून खाल्ले तरी दात व तोंडासाठी ते उत्तम असते. शिवाय असे करणे दात किडिला प्रतिबंध करते
पानात चुना, कात घातल्यास ते त्रिदोषाहारक होते मन प्रसन्न करते
लहान मुलांच्या पोटफुगीवर नागवेलीच्या पानाचा रस व मध यांचे मिश्रण चाटवले तर मुलांचे अपचन दुर होते
पानातील कॅल्शिअम शरीरामध्ये सहजतेने शोषले जात असल्याने विड्याचे पान जरुर खावे
लागवड आणि काळजी
सुपीक भुसभुसशीत जमिनीत उत्तम येणारी वेल
नेहेमी सावली, ओली जमीन असलेली मानवते
दोन मुख्य जाती – कपूरीः लहान सौम्य मृदु, मलबरीः ( मोठ्या आकाराची) व तिखट
वेल मोठ्या झाडांच्या आधाराने किंवा कुंपणावर अतिशय सुबक दिसतो
फार उष्ण नाही व फार थंड नाही अशा ठिकाणी भरपूर पाने येत राहतात
अधिक माहिती
Botanical name : Piper betle L.
Family : Piperaceae
Common name : Betel pepper
Sanskrit name : तांबूल
RET Status : N/A
Parts Used : Leaf
Manuring
Apply 150 kg N/ha/year through Neem cake (75 kg N) and Urea (75 kg N) and 100 kg P2O5 through Super phosphate and 30 kg Muriate of potash in three split doses first at 15 days after lifting the vines and second and third dose at 40 - 45 days intervals. Apply on beds shade dried neem leaf or Calotropis leaves at 2 t/ha and cover it with mud (2 t in 2 split doses).
Time of application
N
P
K
(kg/ha)
Basal dressing
37.5
100
50
Top dressing @ 3 split doses
112.5
0
पानवेल किड व रोग नियंत्रण असे कराल♥प्रगतशील शेतकरी♥
♥कीड आणि रोग -
पानवेली ही अतिशय नाजूक वनस्पती आहे. खालील काही किटकांचा पानवेलीला उपद्रव होतो.
♥पानवेलीवरील किड
♥ ढेकण्या (Mealy Bug) - 'टिंब्या' किटकांप्रमाणेच ही उपद्रवकारी कीड आहे. वेळीच उपाययोजना केली नाही तर पानवेलीच्या उत्पादनावर अनिष्ट परिणाम दिसून येतो.
(टिंब्या (Betelvine Bug) - पानवेलीच्या अगदी शेवटच्या अवस्थेत ह्या किडींचा उप्रद्र्व दिसून येतो.)
या किडीच्या बंदोबस्तासाठी
क्लोरोपायरीफाॅस 20 ई.सी.
किंवा
डायमेथाॅएट 30 ई.सी.
२ मिली प्रती लीटर पाण्यात मिसळून पानवेली वर फवारावे.
♥ नाग अळी -
ही अळी पिकांवरील पानांच्या आत राहून आतील भाग खाते, त्यामुळे पानांवर नागमोडी रेषा तयार होतात.
उपाय -
ट्रायझोफॉस 15 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यातून नॅपसॅक पंपाने फवारावे.
♥पानवेलीवर वरील किडींशिवाय खालील काही रोगांचाही प्रादुर्भाव दिसून येतो.
♥पानवेलीवरील मर रोग (Foot Rot) -
या रोगात 'फायटोप्थोरा' नावाच्या बुरशीमुळे पानवेलीच्या शेंड्याकडील पाने पिवळी पडतात.
२ - २ - ५० च्या बोर्डो मिश्रणाची
किंवा
५०% ताम्रयुक्त बुरशीनाशके ५०० ग्रॅम २०० लिटर पाण्यात मिसळून त्या मिश्रणाने जमीन निर्जंतुक करावी.
♥ पानवेलीवरील पानकुजव्या (Leaf Rot) -
हा रोग 'फायरोप्थोरा' ह्या वनस्पतीजन्य बुरशीमुळे होतो. पानवेलीवर हा रोग पावसाळ्यात दिसून येतो. या रोगामुळे वेलीची जमिनीलगतची पाने वर्तुळाकार ठिपके पडून कुजतात व गळून पडतात.
रोगट पाने वेचून जाळून टाकावीत. लागवडीपूर्वी बेणे एक तास अगोदर २ - २ - ५० च्या बोर्डो मिश्रणात बुडवावे व नंतर लागवड करावी.
तसेच पानवेलीवर ह्या मिश्रणाची फवारणी करावी.
♥ पानवेलीवरील भुरी (Powry mildew) -
हा रोग वेलींच्या पानावर ओआडीयम नावाच्या बुरशीमुळे होतो.
या रोगामुळे पानाच्या दोन्ही बाजूस पांढरट करड्या रंगाचे ठिपके पडतात.
ते सर्व पानांवर पसरतात. कालांतराने पाने गळून पडतात.
उपाय -
भुरी रोगाची लक्षणे दिसताच
डिनोकॅप
किंवा
ट्रायडेमॉर्फ
किंवा
पेनकोनॅझोल 10 मि.लि. किंवा कार्बेन्डाझिम 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून मिसळून नॅपसॅक पंपाने फवारणी करावी.
♥ पानवेलीवरील मूळकुजव्या (Sclerocium Root Rot) -
वेलीच्या बुंध्याजवळ स्क्लेरोशियम नावाची पांढरी बुरशी पसरते. त्यामुळे वेल कोमेजते, वेलीचा बुंधा आणि मुळे सडतात व वेल मरते.
हा रोग बुरशीमुळे होतो. बियाणे पेरल्यानंतर रोप उगवून जमिनीवर वाढत असताना या रोगाचा प्रादुर्भाव होतो.
- जमिनीलगतच या रोगाचे जिवाणू रोपात शिरतात व त्यामुळे खोड आणि मूळ सडते.
- रोगाचे प्रमाण वाढल्यास संपूर्ण रोपे जमिनीवर आडवी पडतात.
- जमिनीलगतच या रोगाचे जिवाणू रोपात शिरतात व त्यामुळे खोड आणि मूळ सडते.
- रोगाचे प्रमाण वाढल्यास संपूर्ण रोपे जमिनीवर आडवी पडतात.
नियंत्रणाचे उपाय -
- रोपांना कमी प्रमाणात, परंतु नियमित पाणी द्यावे.
- जास्त दाट पेरू नये.
- गादी वाफे तयार करताना चांगले कुजलेले शेणखत वापरावे.
- 2 ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा कॅप्टन किंवा थायरम प्रति किलो या प्रमाणात प्रक्रिया करावी.
- रोपांना कमी प्रमाणात, परंतु नियमित पाणी द्यावे.
- जास्त दाट पेरू नये.
- गादी वाफे तयार करताना चांगले कुजलेले शेणखत वापरावे.
- 2 ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा कॅप्टन किंवा थायरम प्रति किलो या प्रमाणात प्रक्रिया करावी.
♥ पानवेलीवरील पानावरील टिब्का आणि मुळे कुजणे -
पावसाळयाच्या दिवसात मोठ्या प्रमाणावर हे रोग आढळून येतात. उपाय झालेले वेल, पाटाचे पाणी, चिखल अगर भरखातांद्वारे ह्या रोगाचा प्रसार होतो. कोवळे धुमारे सुकणे, पानवेलीवरील पाने गळून पडणे आणि वेल कुजण्यास सुरुवात होणे, ही या रोगाची प्रमुख लक्षणे होत.
रोगांस प्रतिबंधात्मक अथवा नियंत्रणासाठी
स्ट्रेप्टोसायक्लीन फवारणी @ 400 ppm + बोर्डॅक्स मिश्रण @ 0.25% जेव्हा रोग प्रथम निदर्शनात येईल तेव्हा, त्यानंतर 20 दिवसाच्या अंतराने परत फवारणी करावी. पान तोड नंतर नेहमी फवारणी करावी!
♥ पानवेलीवरील पानावरील ठिपके - (Colletotrichum capsici) -
या रोगात पानांवर पिवळसर रंगाचे वलय भुरकट असणारे करड्या किंवा काळसर रंगाचे ठिपके पडतात. पानांवरील ठिपक्यांचा भाग जळून जातो.
बाविस्टीन ०.१०%
किंवा
ब्लायटॉंक्स २ मिली/लि. पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
संकलित!
रोप कसे तयार करायचे व लागवड कशी करायची?
ReplyDeleteपानाच्या मागे कापसासारखी पाबधरी बुरशी आणि काळे ठिपके (अंडी घातल्यासारखे) येतात.
ReplyDelete