काकडी, कारली, दोडका, दुधी भोपळा किड व रोग नियंत्रण असे कराल
काकडी, कारली, दोडका, दुधी भोपळा
किड व रोग नियंत्रण असे कराल♥प्रगतशील शेतकरी♥
♥ढगाळ व पावसाळी वातावरणामुळे भाजीपाला पिकांवर रसशोषक किडींचा, फळ पोखरणाऱ्या अळीचा व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
♥काकडी, कारली, दोडका, दुधी भोपळा या वेलवर्गीय भाजीपाला पिकांवर रसशोषक किडी, नागअळी, फळ माशी या किडी व केवडा, भुरी, फळसड/ फळकूज व डिंक्या रोग इत्यादी आढळून येतात.
त्यांच्या नियंत्रणासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात.
♥कारल्यावरील फळकूज/ फळसड
हा रोग काकडी, भोपळा, कारली, घोसाळी, पडवळ आणि इतर वेलवर्गीय पिकांवर येतो. पिथिअम, फायटोप्थोरा, फ्युजारिअम, रायझोक्टोनिया, स्केलोरिशयम नावाच्या बुरशीमुळे शेंडा पिवलसर होतो तदनंतर फळसड होते.
उपाय - रोगाची लक्षणे दिसताच
कॉपर ऑक्झिक्लोराइड
किंवा
मॅन्कोझेब
किंवा
कॅप्टन किंवा क्लोरोथॅलोनील 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
♥फळावर कापरासारखी पांढरी बुरशीची वाढ असेल तर
मेटॅलॅक्झिल अधिक मॅंकोझेब (संयुक्त बुरशीनाशक) 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे.
♥रसशोषक किडी
वेलवर्गीय पिकांवर फुलकिडे, मावा व पांढरी माशी या किडी पानांतील रस शोषून घेतात. पाने वाकडी होतात, तसेच या किडींमुळे विषाणूजन्य रोगांचा प्रसार होतो.
उपाय -
थायामेथोक्झाम (25 डब्ल्यूजी) 4 ग्रॅम
किंवा
कार्बोसल्फान 10 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यातून नॅपसॅक पंपाने फवारावे.
♥नाग अळी - ही अळी पिकांवरील पानांच्या आत राहून आतील भाग खाते, त्यामुळे पानांवर नागमोडी रेषा तयार होतात.
उपाय -
ट्रायझोफॉस 20 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यातून नॅपसॅक पंपाने फवारावे.
♥केवडा (डाऊनी मिल्ड्यू)
काकडी, कारली, दोडका, घोसाळी, दुधी भोपळा, तांबडा भोपळा या वेलवर्गीय पिकांवर केवडा रोग येतो.
सुडोपेरोनोस्पोरा कुबेन्सीस नावाच्या बुरशीमुळे हा रोग होतो.
सुरवातीला पानाच्या वरच्या बाजूला फिक्कट हिरवे पिवळसर रंगाचे ठिपके दिसतात.
ढगाळ हवामानात या ठिपक्यांच्या खालच्या बाजूला जांभळट रंगाची बुरशीची वाढ झालेली दिसते.
नंतर हेच जांभळट डाग पांढरे काळे किंवा राखाडी झालेले दिसतात.
उपाय -
रोगाची लक्षणे दिसताच रोगग्रस्त पाने काढून नष्ट करावीत.
प्रतिबंधक उपाय म्हणून बियाण्यांची उगवण झाल्यानंतर
20 दिवसांपासून 8 ते 10 दिवसांच्या अंतराने
क्लोरोथॅलोनील
किंवा
मॅन्कोझेब
किंवा
कॉपर ऑक्झिक्लोराइड 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात साध्या हातपंपाने फवारणी करावी.
♥भुरी
जवळजवळ सर्व वेलवर्गीय पिकांमध्ये ईरीसीफी सीकोरेसीआरम नावाच्या बुरशीमुळे हा रोग येतो.
रोगाची सुरवातच प्रथम जुन्या पानांपासून होते.
पानांच्या दोन्ही पृष्ठभागावरून पिठासारखी पांढरी बुरशी वाढते.
उपाय -
भुरी रोगाची लक्षणे दिसताच
डिनोकॅप
किंवा
ट्रायडेमॉर्फ
किंवा
पेनकोनॅझोल 10 मि.लि. किंवा कार्बेन्डाझिम 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून मिसळून नॅपसॅक पंपाने फवारणी करावी.
पुढील फवारणी गरजेनुसार तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावी.
♥डिंक्या रोग
डायडीमेला ब्रायोनिआ नावाच्या बुरशीमुळे हा रोग दुधी भोपळा, घोसाळी, काकडी या वेलवर्गीय पिकांवर येतो.
या रोगाच्या प्रादुर्भावामुळे वेलींच्या कांड्याच्या भागात पिवळसर तपकिरी रंगाचा डिंकासारखा द्रव पाझरतो व नंतर तो काळ्या रंगाचा होतो.
खोड आणि फळे यावर चिरा पडतात.
यामुळे वेल वाळतो आणि फळे सडतात.
रोगाचा प्रथम प्रादुर्भाव बियाणे आणि जमिनीतून होतो.
संकरित वाणावर रोगाचे प्रमाण जास्त आढळून येते.
उपाय -
रोगाची लक्षणे दिसताच
कार्बेन्डाझिम
किंवा
थायोफिनेट मिथाईल 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून - पालटून फवारण्या कराव्यात.
♥फळमाशी
अळ्या फळात राहून गर खातात, त्यामुळे फळे सडतात आणि अकाली पक्व होतात.
उपाय -
1) क्ल्यु-ल्युरचे एकरी 5 सापळे लावावेत.
2) मॅलॅथिऑन 20 मि.लि. + 100 ग्रॅम गूळ एकत्र करून 10 लिटर पाण्यातूम नॅपसॅक पंपाने फवारणी करावी.
संकलित!
क
ReplyDeleteकरपा रोगसाठी पावरफुल फवरनी सांगा....
ReplyDeleteकाकङी वरती अंङ्याची जाळी आहे त्या मुळे फळ किङत आहे ऊपाय सांगा..
ReplyDelete