पेरणी पर्यायी पिक नियोजन असे कराल
पेरणी पर्यायी पिक नियोजन असे कराल♥प्रगतशील शेतकरी♥
♥जून महिना जवळ आला कि आपल्या मान्सूनचे वेध लागतात आणि मग आपली खरीपातील लागवडीसाठी लगबग सुरु होते.
महाराष्ट्रात मान्सूनच्या पावसाला शेतीच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे.
महाराष्ट्रात साधारणपणे जून च्या पहिल्या आठवड्यात पावसाची सुरुवात होते.
परंतु हाच पाऊस अनिश्चित काळी, विखरून, विषम प्रमाणात पडल्यामुळे शेतकऱ्याच्या खारीपातीलच नव्हे तर संपूर्ण वार्षिक पिक नियोजनामध्ये अडचणी निर्माण होतात.
पाऊस नियोजित वेळेत पडला नाही तर खरिपातील पेरण्या वेळेवर होत नाहीत अशा परिस्थितीत पर्यायी पिक नियोजन फायाद्य्याचे ठरते.
अशा वेळेस कोणती पिके घ्यावीत व त्यांचे व्यवस्थापन कसे करावे यावर एक दृष्टीक्षेप टाकुया.
♥१६ जुलै ते ३१ जुलै पर्यंत पाऊस सुरु झाल्यास : सुर्यफुल बाजरी,तूर,तीळ, हुलगा, एरंडी इ. पिकांची लागवड करावी.
♥१ आगस्ट ते १५ आगस्ट : सुर्यफुल, तूर, एरंडी, तीळ, हुलगा यांची पेरणी करवी. कांदा (रांगडा ) (बसवंत ७८० वाण व फुले समर्थ वाण ) रोपवाटिका तयार करवी.
♥१६ आगस्ट ते ३१ आगस्ट : सुर्यफुल, तूर, एरंडी, तीळ यांची पेरणी करवी. कांदा (रांगडा ) रोपवाटिका तयार करवी.
(सुचना- वरिल शिफारस वापरकर्त्याने स्वत:च्या जबाबदारीवर वापरावीत!)
संकलित!
Comments
Post a Comment