पिकात अतिरिक्त पाणी साचल्याचे परिणाम व उपाय

पिकात पाणी साचल्याचे दुष्परिणाम व उपाय♥प्रगतशील शेतकरी♥

♥जर सतत पाऊस झाल्यास पाणी जास्त दिवस साचणार नाही, याची काळजी घ्यावी.

♥पाणी जास्त दिवस साचल्याने मुळांना ऑक्‍सिजनचा पुरवठा कमी पडतो, मुळसड, रोग वाढणे आणि अन्नद्रव्यांचे शोषण बंद झाल्याने पीक पिवळे पडायला लागते, म्हणजे अन्नद्रव्याची कमतरता दिसायला लागते.

♥खराब निचऱ्याचे दुष्परिणाम

1) हवा खेळती राहत नाही, प्राणवायूचे प्रमाण घटते, मुळाची वाढ होत नाही व सूक्ष्म जिवाणूच्या क्रिया मंदावतात. उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी होते.

2) तापमान घटते, जमिनी थंड होतात, बियाण्याच्या रुजण्यावर परिणाम होतो.

3) पिकाला हानिकारक असलेल्या पदार्थांचे प्रमाण वाढते.

4) नत्राचे प्रमाण घटते.

5) किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढतो.

6) मुळाची वाढ पूर्ण न झाल्यामुळे अन्नद्रव्याचा पुरवठा वनस्पतीला व्यवस्थित होत नाही. या सर्वांचा परिणाम म्हणजे पिकाचे उत्पादन घटते.

♥शेतातुन अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल अशी तात्पुरती वा दिर्घकालीन व्यवस्था करावी.

♥शास्त्रीय पद्धतीने करा पाण्याचा निचरा

निचरा पद्धतीची आखणी ही तांत्रिकदृष्ट्या व्यवस्थित होणे गरजेचे असते.

ही आखणी करताना क्षारपड क्षेत्राचे सर्व्हेक्षण, कंटुर नकाशा, निचऱ्याचे पाणी निर्गमित करण्याची व्यवस्था, भूमिगत जलाची पातळी, पाणी देण्याच्या पद्धती आणि पीक पद्धती आदी बाबींचा विचार करावा लागतो.

जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्याचे कारण म्हणजे पावसाचे जास्त प्रमाण, पाटातून, वितरिकेतून आणि शेत चाऱ्यातून सतत झिरपणारे पाणी, जरुरीपेक्षा पिकाला जास्त दिलेले पाणी हे आहे.

यापैकी दुसऱ्या आणि तिसऱ्या बाबींवर आपण नियंत्रण ठेवू शकतो.

सर्वसाधारणपणे कालवा व पाणी वितरिका यामधून 19-23 टक्के एवढे पाणी झिरपते.

शेतचाऱ्यातूनसुद्धा एवढेच पाणी जमिनीत झिरपते.

त्यामुळे सभोवतालच्या जमिनी खराब होतात.

शेतात पाणी आल्यानंतर पिकाला गरजेनुसार पाहिजे तेवढे पाणी दिले जात नाही.

उसासारख्या पिकालासुद्धा एका पाळीला चार ते सहा इंच (10 ते 15 सें.मी.) एवढे पाणी पुरे. परंतु शेतकरी जवळ जवळ 10 ते 12 इंच (25 ते 30 सें.मी.) पाणी देतात. त्यामुळे जास्त झालेले पाणी मुळाच्या खाली निघून जाते व शेवटी भूगर्भातील पाण्याला जाऊन मिळते. सरासरी 19 ते 25 टक्के पाणी गरजेपेक्षा जास्त देतो. एकूण हा पाण्याचा अपव्यय आहे. हा नुसताच अपव्यय नसून हे पाणी जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यास कारणीभूत ठरते.

♥काही ठिकाणी परिस्थिती अशी आहे, की पाणी जमिनीखाली 30 ते 40 सें.मी. खोलीवर आले आहे. त्यामुळे पिकाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो.
क्षारसंचय पाटातील पाण्यात किंवा विहिरीच्या पाण्यात क्षार असल्यास पाण्याच्या वाढीव पातळीबरोबरच वरील थरात क्षारसंचय होत राहतो.
त्याचबरोबर कोरड्या हवामानातील प्रदेशात जमिनीत असलेले क्षारसुद्धा वरच्या थरात येऊन येथे वाचतात, परिणामी, जमिनी क्षारमय होतात व नैसर्गिक निचऱ्याचे संतुलन बिघडते.

♥सिंचन प्रकल्पात कालव्याचे पाणी मिळाल्यामुळे बरेचसे शेतकरी त्यांच्या शेतात असलेल्या विहिरीतील पाणी उपसत नाहीत. यामुळे विहिरीसभोवतालची पाण्याची पातळी कमी होत नाही. विहिरीतील पाणी सतत उपसले तर सभोवतालच्या जमिनीतील पाणी विहिरीत येईल व पाण्याची पातळी एका विशिष्ट खोलीवर नियंत्रित करता येईल.
वास्तविक पाहता भूपृष्ठीय आणि भूगर्भातील पाण्याचा संयुक्त वापर व्हावयास पाहिजे. त्यामुळे पाटाचे पाणी उपलब्ध नसून व पिकाला पाणी लागत असेल तर सिंचन करता येईल व पाणी उपसल्यामुळे पाण्याचा निचरासुद्धा होईल.
जमिनीअंतर्गत चर योजना जमिनीतील पाणीपातळी नियंत्रित करण्याकरिता व क्षारांचे प्रमाण कमी करण्याकरिता अनेक ठिकाणी आडवे चर योजना कार्यान्वित झाल्या आहेत.

♥आडव्या चर योजनेत दोन प्रकार आहेत.

♥अ) भूपृष्ठ चर -

पाटाला समांतर खोदलेले छेद चरसुद्धा या प्रकारात मोडतात. या चरातून पाटाचे शेतात झिरपून येणारे पाणी शेताबाहेर काढता येते. यामुळे जवळ असलेल्या जमिनीतील निचरा समस्या पुष्कळ प्रमाणात कमी होतात.

ब) भूपृष्ठावरील चर -

भूपृष्ठावर साचणारे पाणी वा उघड्या चरातून शेताच्या बाहेर काढून देतात.
परिणामी, शेतात पाणी साचत नाही व पिकाच्या वाढीवर होणारा दुष्परिणाम टाळता येतो. या चरास पुरेशी खोली असल्यास जमिनीतील पाणी या चरात झिरपते.
त्यामुळे पाण्याची पातळी नियंत्रित राहते.
या चर योजनेला सुरवातीस खर्च कमी येतो.
देखभाल करण्यास सोपे असतात; परंतु लागवडीखालील क्षेत्र कमी होते.
त्यामुळे जमिनी किमती असल्यास जमिनीतील बंद चरास प्राधान्य द्यावे लागते.

या चरांकरिता मुख्यतः पाइप किंवा टाइल्स वापरतात.

पचिकण मातीचे भाजलेले पाइप :लांबी 12 ते 15 इंच, तीन ते चार इंच व्यास.

- सिमेंट टाइल्स - दोन टाइल्स एकमेकांवर ठेवून पाइप तयार होतो.
यात राहिलेल्या फटीतून पाणी झिरपते व शेवटी विमोचिकेत सोडले जाते.

- सिमेंट कॉंक्रिट पाइप - हे पाइप वेगवेगळ्या व्यासाचे असतात व लांबी सहा फूट असते. पाइप एकमेकाला जोडून चर तयार करतात.

- पीव्हीसीचे पाइप्स - बाजारात उपलब्ध कमी दाबाचे पीव्हीसीचे स्मूथ किंवा खाचा असलेले पाइप्स पाश्‍चिमात्य देशात मोठ्या प्रमाणावर निचरा योजनेकरिता वापरतात.
या पाइपवर तीन ते सहा मि.मी. व्यासाची छिद्रे असतात.
दोन छिद्रांतील अंतर दोन ते तीन सें.मी. एवढे ठेवतात.
या छिद्रातून जमिनीतील पाणी पाइप चरात शिरते व शेवटी हा पाइप चर मुख्य चराला जोडतात.

- दगड किंवा विटा - जर दगड पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्यास उपचराकरिता दगडाचा उपयोग करतात.

भूमिगत चरातील अंतर आणि खोली हे मातीची पाणी वाहक क्षमता, सच्छिद्रता आणि जलरोधक थर यावर अवलंबून असतात.

त्याचबरोबर पिकाला पोषक अशी पाण्याची पातळी खोली किती असावी हा निर्णय घ्यावा लागेल.

सर्वसाधारणपणे पाणी पातळी ही जमिनीखाली 1.5 मीटरपेक्षा जास्त असावी हे अनेक ठिकाणच्या अनुभवावरून स्पष्ट झाले आहे.

अर्थात, जमिनीच्या प्रकारावरसुद्धा पाण्याची पातळी अवलंबून असते.

अ) निचरा प्रणालीचा वापर जमिनीत निचऱ्याचे प्रमाण वाढणार नाही तोपर्यंत कोणतीही भूसुधारके वापरून क्षारपड जमिनी लागवडीखाली आणणे शक्‍य होणार नाही. म्हणून निचरा पद्धतीची आखणी ही तांत्रिकदृष्ट्या व्यवस्थित होणे गरजेचे असते.
ही आखणी करताना क्षारपड क्षेत्राचे सर्व्हेक्षण, कंटुर नकाशा, निचऱ्याचे पाणी निर्गमित करण्याची व्यवस्था, मातीतील क्षारांची संलग्न असणारे भौतिक व रासायनिक गुणधर्म, सच्छिद्रता, भूमिगत जलाची पातळी, पाण्याची क्षारता, जलीय संचालकता, पिकांना पाणी देण्याच्या पद्धती आणि पीक पद्धती आदी बाबींचा विचार करावा लागतो. कृत्रिम निचरा पद्धतीमध्ये उघड्या चरीची निचरा पद्धती आणि बंदिस्त प्रकारची निचरा पद्धती या दोन बाबींचा प्रामुख्याने समावेश होतो.

त्यापैकी उघड्या चरीची कार्यक्षमता आणि आयुर्मान कमी असते.

विशेष करून भारी काळ्या जमिनीत अशा चरीमध्ये बाजूची माती पडत असल्याने किंवा भिंती ढासळल्याने त्यांची सफाई वारंवार करावी लागते.

उघड्या चरी तयार करताना त्याची रचना, आवश्‍यक खोली आणि बाजूच्या भिंतीचा ढाळ याचे गुणोत्तर सर्वसाधारणपणे साधले जात नाही किंवा ते साधणे हे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही परिणामी त्यांची कार्यक्षमता दिवसेंदिवस कमी होऊन अपेक्षित परिणाम दिसून येत नाही.

♥त्यामुळे बंदिस्त चर योजनांकडे वळणे किंवा ती मोठ्या प्रमाणात स्वीकारणे हे अत्यंत गरजेचे आहे.

या निचरा पद्धतीची व्यवस्थित आखणी करून जमिनीखाली सच्छिद्र प्लॅस्टिकच्या विशिष्ट निचरा पाइप स्थापित कराव्या लागतात.

मुख्य नळी, उपमुख्य नळ्या, उपनळ्या याच्या जाळ्याची अशा प्रकारे रचना असते, की उपनळ्यांतून पाणी उपमुख्य नळ्यांमध्ये येऊन मुख्य नळीतून शेवटी हे पाणी नैसर्गिक निगस स्थान उदा. ओढा, ओघळी किंवा नदी इ. याच्यामध्ये येऊन सोडावे लागते.

ज्या ठिकाणी ही व्यवस्था नसेल त्या ठिकाणी मुख्य नळीतील पाणी संपवेल (विहीर) किंवा शेततळ्यामध्ये एकत्र करून नंतर उपसा करता येतो.

♥योजनेची वैशिष्ट्ये -

ही प्रणाली संपूर्णपणे जमिनी खाली असल्याने लागवडीखाली येणाऱ्या जमिनीचे क्षेत्र यामुळे कमी होत नाही.

- शेतामध्ये अवजड यंत्राने करण्यात येणाऱ्या नांगरटी, यंत्राद्वारे कापणी सपाटीकरण यासारख्या कामावर प्लॅस्टिकच्या निचरा प्रणालीवर मर्यादा पडत नाही.

- आपल्याकडील दर माणशी कमी असलेल्या क्षेत्रात आपल्या शेतातील निचऱ्याचे पाणी दुसऱ्याच्या शेतजमिनीखालून काढण्यास फार अडचण येत नाही.

- प्लॅस्टिक पाइपची विशिष्ट रचना आणि त्यात असलेल्या बारीक छिद्रातून बाहेरचे पाणी पाइपमध्ये प्रवेश करते व उपनळ्यांतून पाणी मुख्य नळीत आणून पाण्याचा निचरा करता येतो. सोबतच मातीमधील विद्राव्य क्षार किंवा रासायनिक प्रक्रियांतून मोकळे झालेले क्षार बाहेर घालविता येतात.

- उपनळ्यांमधील अंतर मुख्य व उपमुख्य नळी किंवा उपनळ्या यांची खोली ठरविताना जमिनीचा प्रकार, पीक पद्धती, जमिनीत आवश्‍यक असणारी पाण्याची पातळी, मातीचे अभियांत्रिकी गुणधर्म उदा. संचालकता जमिनीत असलेली पाणी पातळी इ. सच्छिद्रता, अभेद्य थराची खोली यासारख्या बाबींचा विचार करावा लागतो.

यावर निगमस्थानच्या (आउटलेट) खोलीमुळे मर्यादा येऊ शकतात.

यावरून दोन उपनळ्यांमधील अंतर ठरवावे हे अंतर दहा मीटरपासून 50 मीटरपर्यंत असू शकते.
सोबतच अर्थशास्त्राचा विचार करावा लागतो.
दोन उपनळ्यांमधील अंतर जेवढे कमी आणि पाइपची खोली जेवढी जास्त त्याप्रमाणे प्रणालीच्या किमतीत वाढ होईल.

निचरा पाइपची पीक पद्धतीप्रमाणे 1.50 मीटर चार मीटर ठेवता येते.

चरांची रुंदी पाइपच्या व्यासाच्या प्रमाणात म्हणजे 30 ते 60 सें.मी. ठेवण्यास हरकत नाही. उपनळ्यांना (80 ते 100 मि.मी. पाइपसाठी) 0.2 टक्का उतार व मुख्य नळ्यांना 0.2 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त उतार ठेवावा.

- चरीत पाइप अंथरण्यापूर्वी साधारणपणे 15 सें.मी. खडीची वाळू किंवा ग्रॅवल्स अंथरावे.

त्यावर पाइप ठेवून त्यावर परत खडीची वाळू, चाळ किंवा ग्रॅवल्स याचा थर द्यावा. त्यावर चरातून बाहेर काढलेली माती घालून चरी बुजवून घ्याव्यात.

निचरा प्रणालीच्या शेवटी निगम पाइप व धातूंचा, सिमेंटचा किंवा एसी पाइप वापरावा व त्यावर एक पटल बसवावे जेणेकरून त्यात उंदीर, बेडूक, साप यांसारखे प्राणी शिरून प्रणाली बंद पडणार नाही. - ज्या ठिकाणी दोनपेक्षा अधिक उपनळ्या किंवा उपमुख्य नळ्या एकत्र येतात.

त्या ठिकाणी विशिष्ट अंतरावर मेनहोल तयार करावे.

त्यामुळे निचऱ्याच्या पाण्याच्या बहिर्गमनावर देखरेख ठेवता येते.

♥निचरा पद्धतीचे फायदे -

♥विविध पद्धती पिकाच्या वाढीसाठी योग्य असे जमिनीत वातावरण तयार करते.

♥जमिनीत हवा खेळती राहण्यास मदत करते.

♥त्यामुळे जमिनीत असणाऱ्या पोषक जिवाणूंची वाढ होते. - पिकाच्या कार्यक्षम मुळांची वाढली जाऊन त्यामुळे पीक जोमदार वाढते.

♥- या पद्धतीने जमिनीचा पोत सुधारणा पाणी मुरण्याच्या प्रक्रियेमध्ये वाढ होते.

♥- प्रमाणशीर मशागत करण्यास सोईस्कर जाते. - जमिनीचे तापमान पिकास योग्य असे राखले जाते.

♥- जमिनीच्या भूपृष्ठावर क्षार साठवण्याची क्रिया मंदावते व जमीन लागवडीस योग्य होते.

♥- वाफसा लवकर आल्यामुळे लागवड लवकर करता येते व बीजांकुरण वाढण्यास मदत होते.

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!