घेवडा लागवड नियोजनाचा क्रम
घेवडा लागवड नियोजनाचा क्रम♥प्रगतशील शेतकरी♥
♥विवीध हंगामातील कमी कालावधीत, कमी खर्चात आणि कमी पाण्यात शेंगवर्गीय भाजीपाल्याचे पीक म्हणजे घेवडा.
♥द्विदल वर्गातलं पीक फेरपालटीला आणि बहुविध पीक पद्धतीला अनुकूल असल्यानं आर्थिकदृष्ट्या तर परवडतेच शिवाय
जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी जास्त उपयुक्त ठरते.
♥घेवड्याच्या कोवळ्या शेंगाची भाजी, पक्व दाण्याची उसळ, वाळलेल्या दाण्याचा भाजीसाठी आणि पीठ करून बेकरी पदार्थ बनवण्यासाठी उपयोग करता येतो.
♥शेंगामध्ये अ, ब ही जीवनसत्त्वे, खनिजे, लोह आणि चुना, तसेच प्रथिने भरपूर प्रमाणात आहेत.
♥याच्या झुडूपवर्गीय जातीत फुले सुयश, फुले सुरेखा, कंटेन्डर, पुसा पार्वती, अरका कोमल, पंत अनुपमा, जंपा, व्हीएलबोनी – १, फाल्गुनी, सेविल या शेंगासाठी आणि केंटुरी वंडर आणि पुसा हिमलता या वेलवर्गीय जाती आहेत.
♥ घेवड्याची लागवड उत्तम निचऱ्याच्या मध्यम खोल सेंद्रिययुक्त अशा जमिनीत ४० बाय २० सें. मी. अंतरावर करावी.
♥एकरी १५ ते २० किलो बियाणे पुरेसे होते.
♥या बियाण्याला रायझोबियम या जिवाणूंची प्रक्रिया करून टोकल्यास उगवण चांगली होउन उत्पादन वाढते.
♥पूर्वमशागतीच्या वेळी एकरी १० – १२ टन शेणखत टाकावे.
त्यानंतर पेरणीच्या वेळी एक गोणी युरिया + दोन गोण्या सुपर फॉस्फेट + १|| गोण्या पोटॅश वापरावे.
त्यानंतर महिन्याच्या आत एक गोणी युरिया वापरावा.
♥योग्य अवस्थेत म्हणजे – वाढीची, शेंगाची, फुलांची, शेंगा लागण्याच्या तसेच दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
घेवडामधील तण व्यवस्थापन ♥प्रगतशील शेतकरी♥
पेंडिमिथिलीन हे तणनाशक पीक पेरल्यानंतर उगवणीपूर्वी फवारावे.
तण व्यवस्थापनाच्या दृष्टीने पेरणीनंतर सुरूवातीचे ३० - ३५ दिवस महत्त्वाचे आहेत. यासाठी पेरणीनंतर १५ दिवसांनी एक खुरपणी आणि ३० दिवसांनी एक कोळपणी पुरेशी ठरते.
पीक तणविरहित ठेवावे.
(सुचना- वरिल शिफारस वापरकर्त्याने स्वत:च्या जबाबदारीवर वापरावीत!)
संकलित!
♥फुले लागताना आणि त्यानंतर ८ दिवसांनी १० पीपीएम तीव्रतेचे एन. डी. एम. या संजीवकाच्या दोन फवारण्या कराव्यात.
♥माव्यासाठी
मॅलॅथिआन
शेंगा पोखरणाऱ्या अळीसाठी ५ टक्के कार्बारील धुरळावी
खोडमाशीसाठी सायपरमेथ्रीन फवारावे.
♥बियाण्यास बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी म्हणजे मर रोग होत नाही.
♥मोझॅकच्या नियंत्रणासाठी फुलकीडीचं नियंत्रण करावे
त्यासाठी फॉस्फोमिडान फवारावे.
♥लागवडी नंतर १|| ते २ महिन्यांनी तयार झालेल्या कोवळ्या लुसलुशीत शेंगा तोडून विक्रीसाठी पाठवाव्यात.
♥३ – ४ तोडण्या मिळतात.
♥ओल्या शेंगाचे उत्पादन दरएकरी साधारणतः ६० ते ८० क्विंटल मिळते.
♥ बाजारभाव चांगला असल्यास एकरी ५० हजारांहून १ लाखापर्यंत उत्त्पन्न घेतल्याच्या काही यशोगाथा आहेत.
♥जमिनीची सुपीकता आणि आर्थिक लाभ या दोन्ही गोष्टी मिळत असल्याने घेवड्याचे पीक घ्यावे!
संकलित!
अतिशय चागली माहिती आहे
ReplyDelete