पर्णगुच्छ (बोकड्या) एकात्मिक नियंत्रण

पर्णगुच्छ (बोकड्या) एकात्मिक नियंत्रण♥प्रगतशील शेतकरी ♥
-------------------------------------------------------------------------------------------------------------
♥लक्षणे -

♥ या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव टोबॅको लीफकर्ल व्हायरस या घातक लसीमुळे होतो. या रोगामुळे पाने बारीक, वाकडी-तिकडी होऊन सुरकुत्या पडल्यासारखी दिसतात.
पानांचा रंग फिक्कट हिरवा-पिवळसर होतो. यामुळे झाडाची वाढ खुंटते.

♥ झाड/पान खुजे राहून पर्णगुच्छ किंवा बोकडल्यासारखे दिसते.
आलेली फळे/भाजी आकाराने लहान राहतात.
या रोगाचा प्रादुर्भाव सुरवातीला झाल्यास फलधारणा होत नाही.
या विषाणूजन्य रोगाचा प्रसार पांढरीमाशीमुळे होतो.

=======================================================

♥नियंत्रणाचे उपाय -

♥विषाणूजन्य रोगाचा प्रसार प्रामुख्याने फुलकिडे, पांढरी माशी, मावा, तुडतुडे या किडीमार्फत होतो. रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यावर नियंत्रण करणे अवघड जाते.

♥त्यामुळे किडीमार्फत होणारा प्रसार थांबविणे हाच एक उपाय आहे.

♥या रोगाची लागण रोपवाटिकेपासून किंवा पेरणीपासुन पिकाच्या वाढीपर्यंत केव्हाही होते.

♥म्हणून या रोगाच्या नियंत्रणासाठी रोपवाटिकेपासून किंवा बिजप्रक्रियापासुन काळजी घेणे फार जरुरीचे आहे.

♥ बियाणे पेरणीपूर्वी
इमिडाक्‍लोप्रीड
अधिक
ट्रायकोडर्मा (पाच ग्रॅम प्रति किलो) यांची बीजप्रक्रिया करून बियाणे पेरावे.

किंवा

कार्बोसल्फान (पाच ग्रॅम प्रति किलो) अधिक
ट्रायकोडर्मा (पाच ग्रॅम प्रति किलो) यांची बीजप्रक्रिया करून बियाणे पेरावे.

♥ पेरणीपूर्वी गादीवाफ्यावर कार्बोफ्युरान 30 ग्रॅम किंवा फोरेट 25 ग्रॅम प्रति 3 x 1 मीटर आकाराच्या गादीवाफ्यात मिसळावे.

♥ बियाण्याची पेरणी झाल्यानंतर  60 ते 100 मेश नायलॉन नेट किंवा मलमल कापड मच्छरदाणीसारखे टाकावे म्हणजे रोग प्रसार करणाऱ्या किडीपासून रोपांचे संरक्षण होईल.

♥ फिप्रोनील 15 मि.लि.

किंवा

थायोमेथोक्‍झाम चार ग्रॅम

किंवा

डायमेथोएट

किंवा

मिथिल डिमेटॉन 10 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून रोपावर फवारावे.

♥इमिडाक्‍लोप्रीड 10 मि.लि. किंवा कार्बोसल्फान 20 मि.लि.

अधिक +

ट्रायकोडर्मा पावडर 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून त्यात रोपांची मुळे 10 ते 15 मिनिटे बुडवून नंतर लागवड करावी.

♥ लागवडीपूर्वी 25-30 दिवस अगोदर लागवड क्षेत्राच्या सर्व बाजूने पाच ते सहा ओळी मका किंवा ज्वारी किंवा बाजरी पेरल्यास पांढरी माशीचे प्रमाण रोखण्यास मदत होते.

♥ रोगाची लक्षण दिसताच रोगग्रस्त झाडे उपटून जमिनीत गाडून टाकावी किंवा जाळून नष्ट करावीत.

♥ लागवडीनंतर 15 दिवसांच्या अंतराने

मिथिल डिमेटॉन 10 मि.लि.

किंवा /

थायोमेथोक्‍झाम चार ग्रॅम

किंवा /

कार्बोसल्फान 10 मि.लि.

किंवा /

ट्रायझोफॉस 20 मि.लि.

किंवा /

इमिडाक्‍लोप्रीड चार मि.लि.
प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून दर 10-15 दिवसांच्या अंतराने आलटून पालटून फवारण्या कराव्यात.

संकलन!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!