हिंग फेरुला फोइटिडा (Ferula assafaoetida) कसे तयार होते व हिंगाचे काही खास उपाय

हिंग फेरुला फोइटिडा (Ferula assafaoetida) कसे तयार होते व
हिंगाचे काही खास उपाय♥प्रगतशील शेतकरी♥

♥हिंग कसे तयार होते

हिंग हा फेरुला फोइटिडा (Ferula assafaoetida) या वनस्पतीच्या मुळाचा रस सुकवुन त्यापासुन बनविलेला एक पदार्थ आहे

हिंगाचा उपयोग भरतात अनेक वर्षांपासुन मसाल्याच्या रुपात केला जात आहे.

वरण असो किंवा भाजी थोडेसे हिंग टाकल्याने पदार्थाला चव येते.

हिंग फक्त स्वयंपाक घरातच उपयोग पडत नाही तर याचे अनेक औषधीय गुण आहेत.

हिंग फेरुला-फोइटिडा नावाच्या वनस्पतीचा रस आहे.

या वनस्पतीचा रस वाळवून हिंग तयार केले जाते.

याचे झाड 2-4 फूट उंच असते.

हे वनस्पती विशेषतः ईरान, अफगानिस्तान, तुर्केमिस्तान, बलूचिस्तान, काबुल आणि खुरासच्या डोंगराळ भागात आढळतात.
त्या ठिकाणावरुन पंजाब आणि मुंबईला हिंगाची आयात होते.

महर्षि चरकनुसार हिंग दम्याच्या रोग्यासाठी रामबाण औषधी आहे. हे कफ, गॅसची समस्या, लकवा रोग यांसाठी फायदेशीर असते. डोळ्यांनासुध्दा हिंगाने फायदा होतो.

फोडणीत आधी मोहरी घातली जाते आणि मग घातला जातो हिंग.
पदार्थाला उत्तम स्वाद देणारा, भूक प्रदीप्त करणारा, पचनाला उत्तम असा हिंग भारतीय स्वयंपाकात सगळीकडे आवर्जून वापरला जातो.

‘फेरूला अँसॅफोटिडा’ या शास्त्रीय नावानं ओळखल्या जाणार्‍या वनस्पतीपासून हिंग मिळवला जातो.

साधारण दोन मीटर उंचीच्या झाडाची मुळं टोकेरी होत गेलेली म्हणजे गाजरासारखी असतात.

पूर्ण वाढलेल्या झाडाला बहरामध्ये पांढरी आणि पिवळी फुलं येतात.

झाड साधारण चार वर्षांचं झालं की त्यापासून हिंग मिळवता येतो.

झाडाला फुलं येण्यापूर्वी साधारण मार्च-एप्रिलमध्ये मुळाचा वरचा भाग कापला जातो आणि खोडही कापलं जातं.
या कापलेल्या भागातून स्त्रवणारा दुधासारखा द्राव गोळा केला जातो.
काही दिवसांनी तो घट्ट झाल्यावर खरबडून काढला जातो.
मग पुन्हा मुळाचा भाग कापला की त्यातून द्राव स्त्रवू लागतो तो गोळा केला जातो.
ही प्रक्रिया पुन:पुन्हा केली जाते.
द्राव स्त्रवायचा बंद झाला की कापणं थांबवण्यात येतं.
मुळं पहिल्यांदा कापल्यावर साधारण तीन महिन्यांनी द्राव स्त्रवायचा बंद होतो.
कधी कधी खोड आणि मूळ यांच्या सांध्याशी कापलं जातं.
अशा तर्‍हेनं तीन वेळा कापलं की काही झाडांपासून एक किलोपर्यंत हिंग मिळू शकतो.
हिंगाची झाडं इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान येथे वाढतात.
भारतात काश्मीर आणि हिमाचल प्रदेशाच्या पहाडी भागातही हिंगाची लागवड केली जाते.

♥हिंगाचे प्रकार

हिंगाचे मुख्य दोन प्रकार आहेत.

पहिला हिंग आणि दुसरा हिंगरा किंवा हिंगडा.

हिंग हा शुद्ध आणि उच्च प्रतीचा समजला जातो.

हिंगडा हा खालच्या प्रतीचा समजतात.

♥हिंगामध्ये पुन्हा दोन प्रकार असतात.

पहिला इराणी हिंग

आणि दुसरा पठाणी हिंग.

या नावावरूनच कळतं की इराणी हिंग इराणमध्ये,

तर पठाणी हिंग अफगाणिस्तानात उत्पादित होतो.

यापैकी ‘हड्डा’ हिंग सगळ्यात उग्र वासाचा आणि महाग असतो.

♥इराणी हिंगामध्ये पुन्हा गोड आणि कडू हिंग असे दोन प्रकार असतात.

खोड आडवं कापल्यावर मिळणार्‍या हिंगाला गोड हिंग,

तर मुळापासून मिळविलेल्या हिंगाला कडू हिंग असं म्हणतात.

आपल्याकडे उच्चप्रतीच्या हिंगाला ‘हिरा हिंग’ असं म्हणतात.

हा हिंग चमकदार, तीव्र वासाचा आणि लालसर पिवळ्या रंगाचा असतो.

♥हिंगातली भेसळ

हिंगाची शुद्धता दोन पद्धतींनी तपासता येते.
शुद्ध हिंग जाळला की कापराप्रमाणे जळतो आणि त्यातून सुगंधित धूर बाहेर पडतो.
या हिंगाचा स्वाद तिखट, तुरट आणि कडवट लागतो.
शुद्ध हिंग पाण्यात विरघळून पाणी दुधासारखं पांढरंशुभ्र बनतं.
जर हिंगात भेसळ असेल तर तो भांड्यात खाली तळाशी चिकटून बसतो.
तसेच शुद्ध हिंग जाळल्यास तेजस्वी ज्वाला येतात.
भेसळ असल्यास येत नाहीत.

♥बाजारात हिंगाचे पांढरा आणि काळा असे दोन प्रकार विकले जातात.
पांढरा हिंग पाण्यात विरघळतो.
काळा हिंग पाण्यात विरघळत नाही. तो तेलात विरघळतो.
रासायनिकदृष्ट्या दोन्ही प्रकारच्या हिंगामध्ये तेच घटक असतात.
काळा हिंग हा पांढर्‍या हिरा हिंगापेक्षा खालच्या प्रतीचा असतो.
हा हिंग जंतुनाशक असल्यानं बागेतले जंतू मारण्यासाठी त्याचा उपयोग करतात. औषधासाठी मात्र हिरा हिंगाचा उपयोग करतात.
बांधणी हिंगामध्ये इराणी किंवा पठाणी हिंग, स्टार्च किंवा तांदळासारख्या तृणधान्याचं पीठ, गोंदाची पूड अशा गोष्टी मिसळलेल्या असतात.

♥हिंगामध्ये मोठय़ा प्रमाणात भेसळ असू शकते.
इराण, काश्मीर, हिमालयात हिंगाच्या वासाच्या वनस्पती उगवतात.
हिंगामध्ये त्यांची भेसळ केली जाते.
इतर अनेक वस्तूंची भेसळ असू शकते.
अस्सल हिंग उत्तम असतो पण खूप महाग असतो.
त्यामुळे त्यात अशा प्रकारे भेसळ करून परवडेल अशा किमतीला पूड विकली जाते.

♥हिंगाचा सुगंध

हिंगामध्ये ६८ टक्के काबरेहायड्रेटस्,
                १६ टक्के आद्र्रता,
                   ४ टक्के प्रथिने,
               १0 टक्के स्निग्धांश,
भरपूर कॅल्शिअम, काही प्रमाणात फॉस्फरस, लोह व जीवनसत्त्व अशा गोष्टी असतात.

हिंगाचा विशिष्ट सुगंध त्यामध्ये असलेल्या तेलामुळे येतो.
या तेलात फेरुलिक इस्टर आणि महत्त्वाची अशी गंधकाची वेगवेगळी संयुगं असतात जी या सुगंधाला कारणीभूत असतात.
स्टीम डिस्टिलेशन ही प्रक्रिया वापरून हिंगापासून तेल मिळविलं जातं.
तेलामधला महत्त्वाचा घटक ब्युटिल प्रॉपेनिल डायसल्फाईड असून, इतर डायसल्फाईडस्, ट्रायसल्फाईड्, पिनीन वगैरे संयुगं असतात.
या तेलाचा उपयोग पदार्थांच्या स्वादासाठी तसेच औषधं तयार करण्यासाठी केला जातो. हिंगातील तेलाच्या वासामुळे त्याला पश्‍चिमी देशांमध्ये डेव्हिल्स डंग असं म्हणतात. संस्कृतमध्ये वाघिका, अगुधगन्धु, वाल्हा रामठ अशी वेगवेगळी नावं आहेत.

♥पुरातन हिंग

हिंग स्वयंपाकघरात फोडणीमध्ये वापरला जातोच पण खास करून तो लोणची आणि पापड यामध्ये वापरला जातो.
जैन लोक आणि वैष्णव कांदा लसूण खात नाहीत.
त्यांच्या स्वयंपाकात हिंगाचा वापर केला जातो.
भारतातील हिंगाचा वापर खूप जुना आहे.
कश्यपसंहितेत त्याचा उल्लेख आलेला आहे.
बाराव्या शतकात राजा सोमेश्‍वरानं लिहिलेल्या अमिलषितार्थ चिंतामणी अर्थात मानसोल्लास या जगातील पहिल्या ज्ञानकोशात जे स्वयंपाकाचं वर्णन आहे.
त्यात काही पदार्थांमध्ये हिंगाचं पाणी किंवा तुपात तळलेला हिंग घालण्यास सांगितलं आहे. काही गोष्टींना हिंगाचा वास लागण्यासाठी पदार्थात जळता कोळसा ठेवून त्यावर हिंग शिंपडून हिंगाची धुरीही दिली जाते.
बोर्सेस्टरशायर सॉसमध्ये हिंग हा एक घटक असतो.
चायनीज, थायी पदार्थांमध्ये हे सॉस वापरलं जातं.
मध्यपूर्वेकडील देशांमध्ये मसालेदार भाज्यांच्या पदार्थांमध्ये हिंग वापरतात.
उसळींमुळे गॅस होऊ नये म्हणून त्यात हिंगाची फोडणी आपल्याकडेही घालतात.

♥आयुर्वेदातला हिंग

आयुर्वेदात चूर्ण आणि गोळ्यांमध्ये हिंग वापरला जातो.
तुपात भाजलेला हिंग, सुंठ, मिरे, पिंपळी, सैंधव, ओवा, जिरे आणि शहाजिरे या आठ वस्तू समप्रमाणात घेऊन बनवलेल्या चूर्णाला हिंगाष्टक चूर्ण असं म्हणतात.
एक चमचा चूर्ण जेवणापूर्वी ताकात किंवा तूप-भातातून दिल्यास पोटातील त्रास, वायू, अपचन वगैरे बरेच रोग बरे होतात.
मलावरोधावरही हिंगाच्या पाण्याचा उपयोग होतो.
हिंग हे नारुवर औषध आहे.
हिंग मूत्रावरोधातही उपयोगी पडतो.
अस्थमा, ब्रॉन्कायटिस वगैरे श्‍वासनलिका व फुफ्फुसांच्या आजारावर हिंग आणि इतर घटक वापरून केलेली औषधं परिणामकारक ठरतात, असं आढळलं आहे.
पोटाला खूप तडस लागली असेल, पोटात खूप दुखत असेल तर नाभीभोवती पोटावर हिंगाचा लेप दिल्यानं थोड्याच वेळात आराम वाटतो.
दातदुखी, कानदुखी अशा अनेक व्याधींवर हिंगमिश्रितऔषधं वापरतात.
एकोणिसाव्या शतकात हिंगमिश्रित औषधांचा वापर हिस्टेरिया, मूडस्विंग्ज, डिप्रेशन अशा आजारांवर केला जात होता.
एक लक्षात ठेवायला हवं की, हिंगाचा कोणताही औषधी उपयोग करताना आयुर्वेदाचार्यांचा सल्ला घ्यायलाच पाहिजे.

♥हिंगाचं पथ्य

हिंग उष्ण असल्यानं उष्ण आणि पित्तप्रकृतीच्या लोकांनी वापरू नये.
वापरल्यास प्रमाण अत्यंत कमी ठेवावं.
कच्चा हिंग वापरल्यास त्रास होऊ शकतो.
या कारणासाठी आणि मसाल्यांचा स्वाद उच्च तपमानाला बाहेर येतो यासाठीच हिंग फोडणीस घालण्याची कल्पना असावी.
आधुनिक विज्ञानाप्रमाणे हिंगामधील अँन्टिऑक्सिडंटस् तेलामध्ये विरघळतात हेही कारण असू शकतं.
हिंगाचे औषधी गुणधर्म लक्षात घेऊनच फोडणीची योजना केली गेली असावी.
हिंग हवाबंद डब्यात इतर गोष्टींपासून, हवा, सूर्यप्रकाश, पाणी, उष्णता यापासून दूर ठेवल्यास त्याचा स्वाद उत्तम टिकून रहातो आणि इतर पदार्थांना तो वास लागत नाही.

♥हिंगाचे काही खास उपाय...

♥ सुंट, मीरे, ओवा, पांढरे जीरे, शुध्द तुप, भुरके हिंग आणि सेंधा मीठ समान प्रमाणात घेऊन बारीक करा. जेवणानंतर नियमित 2-4 ग्राम चुर्ण पाण्यात टाकून सेवन करा. याच्या नियमित सेवनाने पोटात गॅस होण्याची समस्या दूर होईल.

♥हिंग पाण्यात मिसळून हे पाणी नाभीच्या आजुबाजूला लावा किंवा तुपात हिंग भाजून त्याचे सेवन करा, पोट दुखी दूह होईल.

♥हिंगाचा एक तुकडा पाण्यासोबत सेवन केल्याने पोट दूखी लवकर दूर होते.

♥पोट दुखी होत असल्यास 2 ग्राम हिंग अर्धा किलो पाण्यात उकळा, जेव्हा चतुर्थांश पाणी उरेल तेव्हा हे पाणी कोमट करुन सेवन करा.

♥ हिंग पाण्यात मिक्स करुन गुडघ्यांवर लावल्याने गुडघेदुखी दूर होते.

♥दात दुखत असेल तर त्या दाताखाली हिंगाचा तुकडा ठेवा, आराम मिळेल.

♥लहान मुलांना निमोनिया झाला असेल तर त्याला थोड्या-थोड्या प्रमाणात हिंगाचे पाणी देत राहा. आराम मिळतो.

♥भोजनामध्ये हिंगाचा नियमित वापर केल्याने गर्भाशय संकुचन होते आणि मासिक धर्माच्या समस्या दूर होतात.

♥जुन्या गुळामध्ये थोडेसे हिंग मिसळून सेवन केल्याने उचकी तात्काळ बंद होईल.

♥जर एखाद्याने विष घेतले तर त्याला तात्काळ हिंगाचे पाणी द्या. असे केल्याने उल्टीच्या माध्यमातून विष बाहेर पडते आणि विषाचा प्रभाव नष्ट होतो.

♥हिस्टीरियाच्या रोग्यांना हिंगाचा वास दिल्याने त्यांना तात्काळ शुध्द येते.

♥हिंगाचे नियमित सेवन केल्याने लो-ब्लड प्रेशर आणि हृदयासंबंधीत आजार होण्याची शक्यता कमी होते.

♥अंगावर पित्त येण्याची समस्या असेल तर, तुपात हिंग मिसळून याने सर्व शरीराची मालीश करा, खुप लवकर तुमची समस्या दूर होईल.

♥ हींग रुईच्या पाणात बारीक करुन याचे लहान-लहान गोळ्या बनवून ठेवा. ही गोळी गरम पाण्यासोबत घ्या, खोकल्याची समस्या दूर होईल.

♥ जर तुमचा घसा बसला असेल तर उकळत्या पाण्यात हिंग मिसळा. असे दिवसातून 2-3 वेळा करा. तुमचा गळा चांगला होईल.

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!