पिकांसाठी उपयुक्त दुय्यम अन्नद्रव्ये मॅग्नेशियम ,गंधक (सल्फर) ,कॅल्शियम

पिकांसाठी उपयुक्त दुय्यम अन्नद्रव्ये
मॅग्नेशियम Mg,गंधक (सल्फरातुन सल्फेट SO4),कॅल्शियम Ca♥प्रगतशील शेतकरी♥

♥पिकास परिपुर्ण वाढीसाठी गरजेच्या नत्र, स्फुरद व पालाश या मुख्य अन्नद्रव्यांनंतर मॅग्नेशियम ,कॅल्शियम व गंधक या दुय्यम अन्नद्रव्यांचा समावेश होतो.
पैकी गंधक व कॅल्शियम अन्नद्रव्यांसोबतच जमिनीची रासायनिक परिस्थिती बदलण्यासाठी देखिल उपयुक्त ठरतात.

}मॅग्नेशियम Mg
}गंधक (सल्फर) S > SO4
}कॅल्शियम Ca

♥मॅग्नेशियम
पिकाच्या चयापचयाच्या क्रियेत मॅग्नेशियम फार महत्वाची भुमिका पार पाडते. याठीकाणी पिकातील महत्वाच्या चयापचयाच्या क्रियांचा उल्लेख करित आहोत.

♥फोटोफॉस्पोरिलेशन - या क्रियेमध्ये सुर्याच्या उर्जेपासुन ए.टी.पी. (अडेनाइन ट्राय फॉस्फेट) या शक्तीशाली मुलद्रव्याची निर्मिती हरितलवकामध्ये होते.
ए.टी.पी. वर त्यानंतर प्रक्रिया करुन शर्करा व प्रथिनांची निर्मिती केली जाते.
हे ए.टी.पी. तयार होण्यासाठी व पर्यायाने पिकाच्या वाढीसाठी अत्यावश्यक अन्नद्रव्ये तयार होण्यात मॅग्नेशियम गरजेचे आहे.
प्रकाशसंश्लेषणासाठी उपयुक्त कार्बन-डाय-ऑक्साईड चे स्थिरीकरण - हवेतील कार्बन शोषुन घेवुन त्याचे कर्बामध्ये रुपांतर करणे. (सेंद्रिय कर्ब)
प्रथिनांची निर्मिती
हरितलवक निर्मिती
पिकाच्या अन्नवाहीन्या अन्नद्रव्ये लोड करणे. (अन्नवहनामध्ये सहभाग)
प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे निर्मित घटकांचा वापर अन्ननिर्मितीसाठी करणे.
मॅग्नेशियम पिकातील प्रकाश संश्लेषण क्रियेत अत्यंत महत्वाच्या अशा रिब्युलोझ १,५-बीसफॉस्फेट कार्बोक्झिलेज च्या अक्टिव्हेशनसाठी गरजेचे आहे.
पिक संगोपनासाठी ज्याठिकाणी केवळ नत्र,स्फुरद व पालाश युक्त खतांचा वापर केला जातो आहे अशा सर्वच जमिनींमध्ये मॅग्नेशियमची कमतरता प्रकर्षाने जाणवते आहे.

आपणास माहीत आहे काय?
ज्या बीटच्या रोपांना कमी किंवा मुळीच मॅग्नेशियम दिलेला नसतो त्यांच्या पानांमध्ये मॅग्नेशियम दिलेल्या पानांच्या ४ पट जास्त सुक्रोझ साठवली जाते. मॅग्नेशियम कमतरतेमुळे हि बहुमुल्य सुक्रोझ बीटच्या कंदांमध्ये पाठवलीच जात नाही. अर्थातच भरपुर खते घालुन देखिल कमी उत्पादन. (हेरमान्स २००४)
मॅग्नेशियम कमतरता पानांवर दिसण्या अगोदरच पिकाची मुळांची आणि शेड्यांचीवाढ लक्षणिय रित्या कमी झालेली असते. (कॅकमार्क १९९४)

♥गंधक (सल्फर S )

पिकाच्या वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्य सल्फरचा पुरवठा करणारे सेंद्रिय पदार्थ हे मुख्यत्वे करुन जमिनीच्या वरच्या थरातच असतात.
इलिमेंटल सल्फर (जे आपण बाजारातुन सल्फर आणतो तेच) हे पिक तोपर्यंत शोषुन घेवु शकत नाही जोवर त्याचे रुपांतर सल्फेट (SO4) स्वरुपात होत नाही, आणि हे होण्यासाठी जमिनीत सल्फर ऑक्सिडायझिंग बॅक्टेरीया असणे गरजेचे आहे.
सल्फेट हे ऋण भार असलेले मुलद्रव्य असल्या कारणाने ते जमिनीत लवकर नत्रा पेक्षा ५० टक्के जास्त वेगाने वाहुन जाते.

♥सल्फर चे कार्य-

प्रथिने आणि पेप्टाईड चा एक अविभाज्य घटक
नत्राचे (इनऑरगॅनिक नत्र) रुपांतर प्रथिनांत करण्यासाठी उपयुक्त
हरितलवक निर्मितीत संप्रेरक म्हणुन कार्य करते.
द्विदल धान्य पिकांतील मुळांवरिल उपयुक्त गाठी तयार होण्यात कार्य करते.
विविध इन्झाइम्स चा घटक
ज्या रसायनांमुळे कांदा, मोहरी आणि लसणास वास आणि विशिष्ट चव येते त्या रसायनांचा घटक.
पिकाच्या खराब झालेल्या पेशींच्या दुरुस्तीसाठी गरजेचे अन्नद्रव्य
जमिनीचा सामु कमी करण्यासाठी हल्ली सल्फ्युरीक आम्लाची शिफारस केली जाते आहे, खालिल तक्त्यात आपल्यास दिसुन येईल की, सल्फ्युरीक आम्लामधिल सल्फर चे प्रमाण हे केवळ ३२ टक्के इतकेच आहे, त्या उलट सल्फर मधिल त्याचेप्रमाण 90 टक्के आहे.
म्हणजेच ज्याठिकाणी 45 किलो सल्फर टाकुन काम होईल त्या ठिकाणी 138 किलो सल्फ्युरीक असिड लागेल.
जमिनीचा सामु हा जर कमी करावयाचा असेल तर त्यात सल्फर घालणे गरजेचे आहे जे सल्फर (इलिमेंटल सल्फर) किंवा सल्फ्युरीक आम्लातुन मिळते ज्यापैकी इलिमेंटल सल्फरचा वापर हा सुरक्षित आणि स्वस्त देखिल.

♥रासायनिक खतसल्फर चे प्रमाण
सल्फर90%
अमोनियम सल्फेट24%
अमोनियम थायोसल्फेट26%
कॅल्शियम सल्फेट15-17%
फेरस सल्फेट12%
पोटॅशियम सल्फेट17.5%
पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट22%
सल्फ्युरीक असिड32%

♥कॅल्शियम -
जमिनीतील विविध मुलद्रव्यांचा कॅल्शियम हा घटक आहे. जमिनीत पुरेश्य़ा प्रमाणात कॅल्शियम उपलब्ध आहे.

♥कॅल्शियम चे कार्य -

पेशी विभाजन व पेशी लांब होण्यासाठी अत्यंत गरजेचे अन्नद्रव्य
पेशी भित्तिका परिपुर्ण तयार होण्यासाठी आवश्यक
नायट्रेट च्या शोषणात आणि त्याच्या वापरात गरजेचे.
पिके दिलेला नत्र याच नायट्रेटच्या स्वरुपात ग्रहण करित असतात. त्यामुळे पिकाच्या शाकिय वाढीच्या काळात कॅल्शियम ची गरज भासते.
पिकातील विविध संप्रेरकांच्या कार्यासाठी गरजेचे शर्करा तयार होवुन त्याच्या वापरासाठी गरजेचे.
कॅल्शियम पिकामध्ये रसवाहीन्यांद्वारे (Xylem) द्वारे आयन एक्सचेंज (मुलद्रव्यांची अदला-बदली म्हणजेच आयन एक्सचेंज (जसे संगित खुर्ची एक किंवा वस्तुंची देवाण घेवाण) पध्दतीने वाहुन नेले जाते.
कॅल्शियम लिग्निन च्या कणांना चिकटते आणि त्यानंतर समान अशा मॅग्नेशियम, सोडीयम, पालाश किंवा अमोनिकल आयनच्या बदल्यातच कॅल्शियमचे एक्सचेंज होत असते.
कॅल्शियम पिकात सहजासहजी वाहुन नेले जात नाही, त्यामुळे थोडा-थोडा पण सतत कॅल्शियमचा पुरवठा करणे गरजेचे आहे.

♥कॅल्शियम उपलब्धतेवर परिणाम करणारे घटक -

जमिनीचा सामु - PH
आम्ल धर्मिय जमिनीत कॅल्शियम चे प्रमाण अल्प असते त्या विपरित अल्क धर्मिय जमिनीत कॅल्शियमचे प्रमाण वाढते.
जसा जसा सामु ७.२ च्या वर जातो तसे तसे कॅल्शियम चे प्रमाण वाढत जाउन ते जमिनीत सहजा सहजी वाहुन जात नाही, व त्यामुळे स्फुरदच्या कणांशी संयोग पावुन स्फुरदची उपलब्धता कमी करते.

कॅटायन एक्चचेंज कॅपिसिटी (CEC)-
ज्या जमीनीचा सी.ई.सी. कमी असतो त्या जमिनीत कॅल्शियम चे प्रमाण कमी असते.

कॅटायन (धनभार असलेले मुलद्रव्य) -
ज्यावेळेस जमीनीत कमी कॅल्शियम असते त्यावेळेस धन भार असलेल्या अन्नद्रव्यांच्या वापराने कॅल्शियम ची कमतरता जाणवते.

सोडीयम -Na
ज्या जमिनीत सोडीयम चे प्रमाण जास्त असते, त्या जमिनीत कॅल्शियम ची कमतरता जाणवते.

बोरॉन Bo
अति जास्त प्रमाणातील कॅल्शियम च्या वापराने बोरॉनची कमतरता जाणवते.
जर पिकास जास्त प्रमाणात बोरॉन दिले गेले असेल तर कॅल्शियम च्या फवारणीने किंवा जमिनीतुन देण्याने बोरॉनची विषबाधा कमी करता येते.

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!