आपली तक्रारीला न्याय असा द्यावा

आपली तक्रारीला न्याय असा द्यावा♥प्रगतशील शेतकरी♥

♥बहुतेक वेळी आपणा सर्वांवर वस्तु(खत, बियाणे, किटकनाशक व अन्य वस्तु) खरेदी करताना अन्याय होतो.

विकत घेतलेली वस्तु खराब असते/दर्जा(क्वालिटी) हिन असतो/वस्तु कालबाह्य असते (एक्स्पायर)/किंमत (MRP) जास्त असते  / नकली ईत्यादि.

त्यावेळी आपणापैकि बहुत:श लोक दुर्लक्ष करतात व
थोडेबहुत अन्यायाला वाचा फोडतात पण
अयोग्य ठीकाणी व चुकिच्या पद्धतीने
म्हणजे जखम कुठे आणि ईलाज कुठे.

तक्रार करणारा ( ग्राहक )आरोपी होतो आणि
ग्राहक ज्याच्यावर आरोप करते(दुकानदार, दलाल वा मध्यस्थ) ही त्या तक्रारीशी बहुदा संबधीत नसते (म्हणुन काहीतरी करुन समस्या रफादफा करणाच्या तयारित असते) व
मुख्य आरोपी म्हणजे ज्याने ही वस्तु तयार केली ती निर्माण करणारी संस्था किंवा कंपनी ही नेहमीप्रमाणे दृष्टीआड राहुन सुरक्षित राहते.

म्हणुन तक्रार संबधी संस्थेशी वा व्यक्ति शी थेट संपर्क करावा.

♥शक्य तितके पुरावे, सदर्भ व नुकसानीचा ( सद्य व संभावित) रक्कम कागदपत्री तयार ठेवा.

♥सर्वप्रथम ज्या वस्तुने नुकसान झाले त्या वस्तुचे (मालाचे) पक्के बिल घ्यावे. त्या वस्तु पासुन इतर व्यक्ति नाडले गेल्यास त्यांचे पुरावे व त्यांचे नुकसानीचे नमुने लिखीत गोळा करावे.

♥वस्तु बनवणार्या कंपनीची तक्रार

1. कंपनीच्या समस्या निवारण क्रमांकावर वा प्रतीनीधी कडे करावी व त्याचा तक्रार क्रमांक व निवारण होण्याची सिमारेषा पुरावे जपावे. समस्या निवारण झाली तर ठीक नाही तर..

2. स्थानिक स्थरावर तक्रार करावी व समेस्येचे निराकरण करावे. 
समस्या निवारण झाली तर ठीक नाही तर

3. तक्रार राज्य स्तरावर ऑनलाइन करा >आपले सरकार, महाराष्ट्र राज्य
आणि(क्लिक करा)
https://grievances.maharashtra.gov.in/en/member/login

त्यानंतर
राष्ट्रीय स्तरावर करावी. National Consumer Forum
राष्ट्रीय ग्राहक मंच वर फोन करुन तक्रार सांगा व त्याचा तक्रार क्रमांक घ्या
Toll Free No-1800-11-4000.

आपले नाव व शहराचा एस.एम.एस.(SMS) पण पाठवु शकतात+918130009809 (charges apply)

(वरील तक्रार क्रमांक व पुराव्याची प्रत शक्यतो ऑनऑनलाइन किंवा फोनद्वारे  किंवा अन्य माध्यमाव्दारे संबधीत संस्थेला द्यावी)
नंतर काही दिवसात जर तुमची तक्रार योग्य असेल तर नक्कीच सोडवीली जाइल!

♥समस्या स्वत:पुरता न आकलन करता सामाजिक स्थरावर मांडावी व
एकटे न लढता ..
सर्वांनी एकी करावी त्याने त्रास कमी व न्याय योग्य मिळतो.
तक्रारीकडे दुर्लक्ष करु नये कारण कंपनीच्या वस्तु निर्मीतीमध्ये होणार्या जाणुन वा अज्ञानपणे होणार्या चुका (ज्या भारताच्या करोडो ग्राहकास त्रासदायक असतात त्या समस्या )दुर होण्यास आपले श्रम निश्चितच होणार्या न्यायापेक्षा कित्येक पटीने अधिक असणार.

(वरील माहीती जनहितार्थ जरी असली तरी तक्रार योग्य कारणाकरिता, योग्य पुराव्याने, स्वजबाबदारीवर, योग्य पद्धतिने, एकमताने सर्व शक्तिसह व देशहितार्थ  करावी!

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!