युरिया बनला निम कोटेड युरिया
युरिया बनला निम कोटेड युरिया♥प्रगतशील शेतकरी♥
♥यूरिया असा असतो
यूरिया ('Urea किंवा carbamide) एक कार्बनिक यौगिक आहे.
जयाचे रासायनिक सूत्र (NH)2CO आहे.
कार्बनिक रसायन च्या क्षेत्राथ युरियाला कार्बामाइड पण म्हणतात.
हा एक रंगहीन, गन्धहीन, पांढरा, रवेदार ठोस पदार्थ आहे.
युरिया पाण्यात, हवेत विरघळणारा आहे.
AgNCO (सिल्वर आइसोसाइनेट) + NH4Cl → (NH2)2CO (यूरिया) + AgCl
मोठ्या प्रमाणात यूरिया चे उत्पादन द्रव अमोनिया किंवा द्रव कार्बन डाई-आक्साइड च्या प्रतिक्रिया ने होते.
♥निमकोटेड युरियाचा करण्याचे फायदे
पिकांना युरिया खत वापरल्यानंतर त्यातील बराचसा नत्र लिचींग व्दारे वाया जातो.
यासाठी केंद्रशासनाने मे २०१५ पासून देशात उत्पादित होणारा यूरिया व डिसेंबर २०१५ पासून आयातीत यूरिया, सर्व उत्पादक, पुरवठादार यांना निम कोटींग करुनच पुरवठा विक्री करण्याचे बंधनकारक केले आहे.
निम कोटींग युरियाच्या वापरामुळे ५-१० टक्के युरिया खताची बचत होणार आहे.
निम विलोपीत युरियामुळे युरियाखतातील नत्रचे रुपांतर नायट्रेट मध्ये होण्याची प्रक्रिया मंदावते.
त्यामुळे पिकाची नत्र वापराची कार्यक्षमता वाढते.
निम मधील असलेल्या अंगभूत कीटक नाशक गुणधार्मामुळे जमिनीत असणारे निमॅटोड, वाळवी इत्यादी पिकांच्या शत्रंचे नियंत्रण होते.
युरिया खताची मात्रा कमी प्रमाणात लागत असल्यामुळे शेतक-याच्या खर्चात बचत होते.
यूरिया खतातील नत्रचे वाहून जाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे पाण्याचे प्रदुषण कमी होण्यास मदत होते.
पिकाची नत्र वापराची कार्यक्षमता वाढल्यामुळे उत्पन्नात देखील वाढ होते.
राज्यात प्रतिवर्षी सरासरी ६५ ते ७० लाख मे.टन खताचा वापर होतो.
यामध्ये युरियाचा वापर सरासरी २५ लाख मे.टन आहे.
यूरिया खत हे नत्रयुक्त खताचा प्रमुख स्त्रोत आहे व नत्राची मात्रा देण्यासाठी प्रामुख्याने वापरले जाते.
यूरिया खताचा वापर प्रामुख्याने पिकाची पेरणी झाल्यानंतर नत्र खताचा मात्रा देण्यासाठी केला जातो.
संकलित!
Comments
Post a Comment