एका विधवेचे दारूने मृत झालेल्या नवऱ्याला लिहीलेलं पत्र.
सर्वांनी वाचावे असे 📝 एका विधवेचे दारूने मृत झालेल्या नवऱ्याला लिहीलेलं पत्र. . . *प्रिय -----------* काल तुझा अकाली मृत्यू झाला. वय 49 फक्त. म्हणजे आयुष्यात स्थिरस्थावर होऊन आनंद उपभोगण्याचे , मुलांबरोबर फिरण्याचे, खेळण्याचे, बायकोबरोबर गप्पागोष्टी, थट्टामस्करी करण्याचे वय. परंतु त्या सुखाला तू मुकालासच पण या आनंदाला तुझी मुलंही पारखी झाली. तुझी बायकोही मुकली या सुखाला अन् पती सुखालाही. काय कारण होतं या सगळ्याचं? तू खोट्या आनंदात रममाण झाला होतास. त्यामुळे खऱ्या आनंदाला तू मुकतो आहेस याचे तुला भानच राहिले नाही. लग्न झाल्यापासून पाहतेय, तू कायम मित्रांच्याच गराड्यात cheers 🍻करत असायचास. मित्र असावेतच, पण आपलं कुटुंब सुद्धा आहे, त्याबद्दल आपली जबाबदारी सुद्धा आहे याचा तुला विसर पडला होता. शिवाय रोज रात्री बाटली घेऊन घरी बसणे 🍷होतेच. त्यामुळे आपल्या मुलांवर काय परिणाम होतो याची तू चिंताच करत नव्हतास.रोज रात्री 9 नंतर