पपई लागवड करण्यापुर्वी नियोजन असे कराल Papaya cultivation practices
पपई लागवड करण्यापुर्वी नियोजन असे कराल♥प्रगतशील शेतकरी♥
♥पपईच्या लागवडीसाठी हलक्या ते मध्यम, भारी जमिनीपर्यंत कोणतीही जमीन चालते;
मात्र पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन असावी.
♥पपई हे उष्ण कटिबंधात वाढणारे पीक आहे.
♥जोरदार वारे आणि कडाक्याची थंडी या पिकास मानवत नाही.
♥कोरडे हवामान या फळपिकाच्या कालावधीत उपयोगी ठरते.
♥संकरित पपई जातींच्या वाढीसाठी सरासरी 25 ते 30 अंश से. तापमान योग्य ठरते.
♥रानाची स्वच्छता करून मशागतीनंतर पूर्वीच्या पिकाची धसकटे, चिपाडे व बांधावरील तणे काढून वेचून नष्ट करावीत.
यामुळे रोग व किडींच्या अवशेषांचा नाश होऊन पुढील प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.
♥जमिनीची निवड केल्यानंतर तिची उभी-आडवी नांगरट करून खड्डे करण्यासाठी ढेकळे फोडून जमीन सपाट करून घ्यावी.
♥जमिनीच्या मगदुराप्रमाणे दोन बाय दोन(2X2) मीटर अंतरावर खुणा करून घ्याव्यात.
अशा खुणा केलेल्या ठिकाणी 45 X 45 X 45 सें.मी. आकाराचे खड्डे खोदून, तळाला पालापाचोळा टाकावा.
♥यानंतर पोयट्याची माती, शेणखत यांचे मिश्रण समप्रमाण घेऊन खड्डे भरून घ्यावेत आणि झाडांना पाणी देण्यासाठी पाट पाडून घ्यावेत.
♥लागवड करण्यासाठी पेरणीपूर्वी बियाणे सात ते आठ तास पाण्यात भिजत ठेवावे.
♥पपईची रोपे पिशवीतसुद्धा तयार करता येतात.
♥रोपे साधारणतः नऊ ते दहा इंच उंचीची झाल्यावर म्हणजेच दोन ते अडीच महिन्यांची झाल्यावर लागवडीसाठी तयार होतात.
♥प्रत्येक खड्ड्यामध्ये दोन रोपे लावून त्यांना पाणी द्यावे.
♥रोपे कोलमडू नयेत म्हणून काठीने आधार द्यावा.
♥पपईच्या प्रत्येक झाडाला माती परीक्षणानुसार
250 ग्रॅम नत्र,
250 ग्रॅम स्फुरद,
500 ग्रॅम पालाश दिल्यास चांगले उत्पादन मिळते.
♥त्याचबरोबर दोन ते तीन घमेली शेणखत प्रत्येक झाडाला मातीत मिसळून द्यावे.
---------------------------------------------------------------------------
तैवान पपई ७८६च्या लागवडीविषयी माहिती♥प्रगतशील शेतकरी♥
♥ तैवान पपई ७८६ कोणत्या वेळी लागवड करावी
पपईची लागवड वर्षातून जून-जुलै, सप्टेंबर-ऑक्टोबर, फेब्रुवारी-मार्च या महिन्यांत करावी.
♥ तैवान पपई ७८६ एकरी किती लागवड करावी
रोपांची संख्या 1000 प्रति एकर
लागवडीचे अंतर - 2 X 2 मीटर.
बी पेरण्याचे प्रमाण - 20 ग्रँम प्रति एकर.
♥ तैवान पपई ७८६ शेतकऱ्यांच्या दृष्टीने रोप विकत घेणे योग्य की बी विकत घेणे योग्य
रोपे घेणे महाग पडते तेव्हा शक्य असल्यास, रोपे घरी बनवावीत.
त्यासाठी, 12.5 X 7.5 चौ. सेमी आकाराच्या पिशवीला तळाशी छिद्र पाडावे.
त्यात शेणखत व माती हे 1:1 प्रमाणात मिसळून भरावे. प्रत्येक पिशवीत 1 ताजे बी रुजत घालावे.
ह्या बीयांना नियमित पाणी घालावे.
त्यानंतर दीड ते दोन महिन्यांनी रोपाची लागण करावी.
♥ खात्रीलायक बी किंवा रोप कोठे उपलब्ध होईल
बियाण्यासाठी जवळपासच्या कृषि सेवा केंद्राशी संपर्क साधावा.
संकलित!
छान माहीती
ReplyDeleteBest Information.....!!!
ReplyDeleteChan mahiti aahe
ReplyDeleteChan mahiti
ReplyDeleteपपई किती महिन्यात काढणीस येते
ReplyDelete11 month
Delete8te 8.5 month
Deleteचांगली माहिती मिळाली
ReplyDelete