सोयाबिनची झाडे पिवळी पडत आहेत तसेच त्याची उंचीही वाढत नाही त्याचे कारण!
सोयाबिनची झाडे पिवळी पडत आहेत
तसेच त्याची उंचीही वाढत नाही त्याचे कारण! ♥प्रगतशील शेतकरी♥
♥पिकात पाणी साचल्यास काय कराल
जर सतत पाऊस झाल्यास पाणी जास्त दिवस साचणार नाही, याची काळजी घ्यावी.
शेतातुन अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल अशी योग्य व्यवस्था करावी.
पाणी जास्त दिवस साचल्याने मुळांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडतो, मुळसड, रोग वाढणे आणि अन्नद्रव्यांचे शोषण बंद झाल्याने पीक पिवळे पडायला लागते, म्हणजे अन्नद्रव्याची कमतरता दिसायला लागते.
पावसामुळे साचलेले पाणी त्वरित बाहेर काढावे. पिके पिवळी पडली असल्यास २% युरिया किंवा १९:१९:१९ ची ७५ ग्राम / १० लिटर पाण्यात घेवून फवारणी करावी. गरज भासल्यास सुक्ष्म अन्नद्रव्य फवारावे.
♥पावसाचा खंड पडल्यास संरक्षित ओलित द्यावे.
♥रस शोषणा-या किडींच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट (०.०३ टक्के) या किटक नाशकांची फवारणी करावी.
♥मुळाजवळ हवा खेळती राहण्यासाठी नत्र गाठीचे प्रमाण वाढण्यासाठी पिकाला कोळपणी/डवरणी आणि मातीचा भर द्यावा.
♥तण आणि पीक यांची ओलावा, अन्नद्रव्य, सूर्यप्रकाश आणि जागा यासाठी स्पर्धा होणार नाही याची काळजी घ्यावी.
योग्य वेळी डवरणी/कोळपणी आणि निंदण करून पीक 40 दिवसांपर्यंत तणमुक्त ठेवणे गरजेचे आहे.
♥पेरणी नंतर १० ते १५ दिवसाच्या आसपास पहिली फवारणी निंबोळी अर्काचि करावी.
संकलित!
Comments
Post a Comment