टोमॅटो या पिकांसाठी खत व्यवस्थापन असे करावे

टोमॅटो या पिकांसाठी
खत व्यवस्थापन असे कराल♥प्रगतशील शेतकरी♥

♥“टोमॅटो” खतांचे व्यवस्थापन:

लागवडीसाठी क्षेत्र तयार करताना चांगले कुजलेले शेणखत हेक्टरी २० टन शेतामध्ये मिसळावे.

टोमॅटो हे पीक रासायनिक तसेच जैविक खतांचा चांगला प्रतिसाद देते.

रासायनिक खतांमध्ये
सरळ जातीसाठी
२०० किलो नत्र,
१०० किलो स्फुरद व
१५० किलो पालाश.

संकरित वाणासाठी
३००:१५०:१५० किलो नत्र: स्फुरद : पालाश प्रति हेक्टरी वापरावे.

त्या रासायनिक खतांपैकी निम्मे नत्र व संपूर्ण स्फुरद व पालाश लागवडीच्या अगोदर वाफ्यात टाकावे
तर उरलेल्या निम्म्या नत्राच्या ३ ते ४ समान मात्रा २० दिवसाच्या अंतराने द्याव्यात.

लागवडीच्या वेळी 20 ते 25 किलो फेरस सुल्फेट व झिंक सल्फेट पर हेक्टर द्यावे.

निंबोलीपेन्ड 8 ते 10 बॅग पर हेक्टर द्यावे.

वरील सर्व खते म्हणजे NPK, मायक्रोन्युट्रिएन्ट (सुक्ष्म अन्नद्रव्ये ) व निंबोलीपेन्ड हे बेड मध्ये भरावे व मातीने झाकावे.

खते टाकल्यावर ताबडतोब पाणी देणे जरुरीचे आहे.

रोपांची लागवड वरंब्याच्या बगलेत वाफ्यांना अगोदर पाणी देऊन करावी.
त्यावेळी रोपांची मुळे सरळ खाली राहतील याची काळजी घ्यावी.

♥टोमॅटो साठी फवारणी व ड्रीप द्वारे खत व्यवस्थापन

१९ : १९ : १९ लागवडीनंतर १५ व २५ दिवसांनी फवारणीतून ५ ग्रॅम प्रती लिटर किंवा ड्रीप मधून २ किलो प्रती एकर असे दोन वेळेस द्यावे.

मायक्रोन्युट्रिएन्ट लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी फवारणीद्वारे ५ मि. ली प्रती लिटर किंवा ड्रीप मधून १ लिटर प्रती एकर द्यावे.

फुलोरा अवस्थेत १३ : ४० : १३ व १२ : ६१ : १० दिवसाच्या आंतराने फवारणीद्वारे ७ ग्रॅम प्रती लिटर किंवा ड्रीप मधून ३ किलो प्रती एकर द्यावे.

मायक्रोन्युट्रिएन्ट लागवडीनंतर ५५ ते ६० दिवसांनी फवारणीद्वारे ५ मि. ली प्रती लिटर किंवा ड्रीप मधून १. ५ लिटर प्रती एकर द्यावे.

फळ धारण होत असतांना 00 : ५२ :३४ दोन वेळा १० दिवसांच्या आंतराने फवारणीद्वारे १० ग्रॅम प्रती लिटर किंवा ड्रीप मधून ५ किलो प्रती एकर द्यावे.

फळ पोसत असतांना १३ : 00 : ४५ व 00 : 00 :५०, १० दिवसांच्या आंतराने फवारणीद्वारे १० ग्रॅम प्रती लिटर किंवा ड्रीप मधून ५ किलो प्रती एकर द्यावा.

(वरिल शिफारस माती परिक्षणानुसार बदलेल!)

संकलित!

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!