कारले पिकाची अनुभवीत यशोगाथा
कारले पिकाची अनुभवीत यशोगाथा♥प्रगतशील शेतकरी-आत्माराम हातमोडे♥
♥अशी होते कारल्याची शेती
पावसाळा संपल्यानंतर पुढे नोव्हेंबरमध्ये रोपवाटिका करून डिसेंबर महिन्यात कारल्याची पुनर्लागवड केली जाते.
रोपे तयार करण्यासाठी कोकोपीटचा वापर केला जातो.
प्लॅस्टिकच्या ट्रेमध्ये बियाणे लावून वाढवलेले रोप शेतात लावले जाते.
या पद्धतीने रोपांची वाढ लवकर आणि व्यवस्थित होते.
तसेच रोप वाया जाण्याचा धोका कमी होतो.
वेल वाढीसाठी शेतात 7 x 7 फूट अशा अंतराने बांबू लावले जातात.
हे बांबू जीआय तारेने बांधले जातात.
तसेच बांबूंच्या डोक्यावर 9 x 9 इंच या आकाराची नायलॉनची जाळी बसवली जाते.
त्यामुळे वेल पसरण्यास मदत होते आणि फळांनाही आधार मिळतो.
कारले पिकाचा हंगाम डिसेंबर ते मे असा म्हणजे पावसाळा सुरू होण्याआधीचा असतो.
♥गिरवले (जि. रायगड, ता. पनवेल) येथील आत्माराम हातमोडे यांची एकूण सात एकर शेती आहे. खरिपात त्यांच्याकडे केवळ भात असतो.
मात्र हिवाळ्यात नोव्हेंबर-डिसेंबरच्या सुमारास विविध भाजीपाला पिकांच्या लागवडीचे नियोजन ते करतात.
यात गेल्या दोन वर्षांपासून कारले पिकाची शेती त्यांना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर वाटू लागली आहे.
♥खत व पाणी व्यवस्थापन -
लागवडीआधी एकरी दहा ट्रॉली शेणखत तर काही प्रमाणात गांडूळ खताचा वापर केला जातो.
लागवडीनंतर आठ दिवसांनी डायमिथोएट या कीटकनाशकाची फवारणी केली जाते. त्यानंतर पंधरा दिवसांनी वेगवेगळ्या कीडनाशकांचा वापर केला जातो.
19-19-19, 0-52-34, 0-0-50 आदी विद्राव्य खतांचा वापर गरजेनुसार केला जातो. शेतामध्ये ठिबक सिंचनाची सोय करण्यात आली आहे.
भाजीपाला पिकांसाठी मिनी स्प्रिंकलर बसवण्यात आले आहेत.
♥दर्जेदार कारल्यांचे उत्पादन तोडणी हंगाम सुमारे चार महिने चालतो.
महिन्याला सुमारे चार ते पाच तोडे होतात.
प्रति तोडीस सुमारे सातशे किलो माल मिळतो.
हे प्रमाण पिकाची वाढ व परिस्थितीनुसार कमी-जास्त होते.
सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत काढणी पूर्ण करून दुसऱ्या दिवशी पहाटे माल बाजारपेठेत नेला जातो.
एकूण हंगामात एकरी सुमारे 12 टन मालाचे उत्पादन मिळते.
♥एकूण उत्पादनापैकी दर्जेदार कारली वाशीच्या व्यापाऱ्यांतर्फे लंडन, कुवेत आदी देशांत पाठवली गेल्याचे हातमोडे यांनी सांगितले.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, तसेच स्थानिक म्हणजे पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीत कारल्याची विक्री केली जाते.
निर्यातीसाठी पाठविलेल्या मालाला प्रति किलो 30 ते 35 रुपये दर मिळाला.
♥कारले पीक सध्या फायदेशीर वाटत असल्याचे हातमोडे म्हणतात.
या पिकाचा तोडणी हंगाम चार महिने चालतो.
त्यात दरही किलोला 20 ते 25 रुपये मिळतो.
उत्पादन 10 ते 15 टन मिळाले तरी खर्च वजा जाता हाती समाधानकारक उत्पन्न येऊ शकते. कारल्याची जात निवडताना ती रोगप्रतिकारक असण्याला प्राधान्य दिले जाते.
बियाणे दर्जेदार असले तर त्यावर विषाणूजन्य रोगांचा (व्हायरस) प्रादुर्भाव होण्याचा धोका कमी होतो.
फळेही दर्जेदार आणि चांगली मिळतात असे ते म्हणतात.
♥कारले काढणीसाठी पाच ते सहा मजूर लागतात.
दिवसाला प्रत्येकी 200 रु. मजुरी द्यावी लागते.
साधारण 25 हजार रुपये त्यावरच खर्च येतो.
खतांवर सुमारे 50 हजार रुपये,
मंडप, बांबू तसेच जीआय तार व नायलॉनच्या जाळीसाठी वीस हजार रुपये खर्च होतात. मंडपाचे आयुष्य तीन वर्षे असते.
पाणीपुरवठा आणि वीज बिलापोटी व वाहतुकीसाठी प्रत्येकी पाच हजार रुपये खर्च होतात. स्प्रिंकलर आणि पाइपवर 17 हजार रुपये खर्च झाले. याचे आयुष्य सुमारे पाच वर्षे आहे.
♥मिळालेले दर (प्रति किलो) वर्ष ------------------किमान दर-----------कमाल दर------------सरासरी
पहिल्या हंगामी ---------------20-25 रु.------------30-35 रु.------------30 रु.
दुसर्या हंगामी---------------15-20 रु.-------------25-30 रु.-----------25 रु.
संकलित!
Comments
Post a Comment