हुमनिचे नियंत्रण असे कराल
हुमनिचे नियंत्रण असे कराल♥प्रगतशील शेतकरी ♥
१) हुमणीने केलेल्या नुकसानीचे स्वरूप लक्षात घेता उभा पहारीने पिकाच्या बुंध्यालगत खड्डा काढावा.
२) ४० मिलि क्लोरपायरिफॉस १० लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे.
फवारणी पंपाचे नोझल काढून बुंध्यालगत तयार केलेल्या खड्ड्यात या द्रावणाची आळवणी करावी
किंवा
एकरी १० किलो फोरेट (१० जी) किंवा १० किलो फीप्रोनिल (दाणेदार) हे १० किलो मातीत मिसळून कच्च्या घातीवर टाकावे.
३) नुसते सरीतून कीटकनाशक सोडून हुमणीचे नियंत्रण होणार नाही.
कारण, हुमणी ही बोधात असते.
त्यामुळे पिकाच्या बुंध्यालगत केलेल्या खड्ड्यात या कीटकनाशकाच्या द्रावणाची आळवणी करावी.
=================================================
हुमनी साठी इलाज असाही♥प्रगतशील शेतकरी♥
♥(१) वेखंड १ किलो ६ लिटर पाण्यात उकळून ३ लिटर करणे,+५०० ग्रम हिंग २०० लिटर पाण्यात टाकुन हे पाणी ओलावा असतांना ड्रिंचिंग करणे व झाडाच्या बुडाशी टाकणे
♥(२) १ किलो रुईच्या ओल्या काड्या ६ लिटर पाण्यात उकळुन निम्मे होईस्तोवर आटवणे जमीनीवर व बुडाशी टाकणे
♥(३) तंबाखू पावडर जमिनीत पिकाच्याबुडावर ५० ग्रम देणे किंवा अर्क काढुन पाणी ओतणे
♥(४) निवडुंग(साबरकांड) ठेचुन बुडावर टाकणे.
♥(5)रुई/रुचकिण हिरव्या फांदया पानासह 6 किलो 10ते20लिटर पाण्यात निम्मे होईपर्यन्त उकळावे 200 लिटर पाण्यात टाकुन ड्रिचिंग करा किंवा ठिबक मधुन द्यावे
♥(6 )पारंपरिक कृती मागील विज्ञान
आपले वडील आजोबा पहिल्या कोळपणीला रुईची फांदी कोळप्यावर ठेवुन कोळपणी करायला लावत-👉कारण पहिला पाऊस पडला म्हणजे हुमनिचे पतंग निघत कडुनिंबाच्या झाडावर पाला खाउन मिलन होते झाडाखाली पाला पाचोळ्यात किंवा उकिरडया वर हे पतंग अंडी घालतात मग अळया जन्म घेतात आधी शेणखत पाला पाचोला खातात ते नाही मिळाले पिकांच्या मुळया खातात
संकलीत!
Comments
Post a Comment