तेल्या तेलकट डाग किंवा बॅक्टेरिया मुळे होणारा करपा
तेल्या, तेलकट डाग
किंवा बॅक्टेरिया मुळे होणारा करपा ♥प्रगतशील शेतकरी♥
♥सुरुवातीला हे फळांवरील ठिपके आहेत असा सर्वांचा गैरसमज झाला.
मात्र आता ते तेलकट डाग किंवा तेल्या म्हणून ओळखले जावू लागलेत, ते त्यांच्या फळांवरील विशिष्ट तेलकट डागांमुळे.
♥तेलकट डाग, बॅक्टेरिया मुळे होणारा करपा किंवा तेल्या
2007 ते 2012 या काळात तेल्याचे डाळिंब उत्पादकांचे कंबरडे मोडले.
♥याचे कारण झॅन्थोमोनास ऍक्सोनोपोडीस pv पुनिकी हा बॅक्टेरीया आहे, ज्याचा भाउबंद लिंबूवर्गीय फळातील कॅंकरमध्ये दिसून येतो.
♥त्याचा प्रसार झाडावरील जखमा आणि झाडाच्या नैसर्गिक छिद्रामधून होतो.
सुरुवातीला पाण्याने भरलेले फोड येऊन 2-3 दिवसात पाणी सुकून गडद लाल व तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात.
♥जुलै-सप्टेंबर व ऑक्टोबर मधील कालावधीत याचा प्रसार वेगाने होतो.
♥नियंत्रणाचे उपाय पुढील प्रमाणे:
प्रतिबंध: रोगट गोष्टींचा झाडाशी संबंध येऊ न देणे, बागेत वापरलेली उपकरणे , हत्यारे डेटाॅल किंवा मोरचुदच्या द्रावणाने(50g/L) स्वच्छ करूनच वापरणे, या गोष्टी कटाक्षाने पाळाव्या.
♥ओलसर जमिनीत शेणखत/ कम्पोस्ट मध्ये मिसळून जैविक बुरशीनाशकांचा चांगला उपयोग होतो.
♥5kg ट्रायकोडर्मा किंवा 2.5 kg ट्रायकोडर्मा+ 2.5kg पॅसिलोमयसिस प्रती हेक्टर वापरावा.
संकलित!
Comments
Post a Comment