टोमॅटो येणारे करपा नियंत्रण असे कराल

टोमॅटो येणारे करपा नियंत्रण असे कराल♥प्रगतशील शेतकरी♥

♥लवकर येणारा करपा -

टोमँटोवरील लवकर येणा-या करप्याच्या नियंत्रणासाठी

कार्बेन्डँझीम ०.००५ टक्के

किंवा

डेल्टान ०.२ टक्के

किंवा

बेनोमिल ०.०५ टक्के च्या तीन फवारण्या घेण्याची शिफारस करणेत आली आहे.

पहिली फवारणी लागणीनंतर २० दिवसांनी
व उरलेल्या दोन फवारण्या १५ दिवसांच्या अंतराने घ्याव्यात.

♥टोमँटोच्या पुसा रुबी या जातीवर येणा-या करप्याच्या प्रभावी नियंत्रणासाठी आणि टोमँटोचे उत्पादन वाढविण्यासाठी

मँन्कोझेब ०.२५ टक्के

किंवा

डायफोलँटॉन ०.२० टक्के

किंवा

कॉपर ऑक्सीक्लोराईड ०.३० टक्के

किंवा

झायनेब ०.३० टक्के च्या फवारणीची शिफारस करण्यात आली आहे.

♥म.फु.कृ.वि.राहुरी येथून लवकर येणा-या करप्याच्या नियंत्रणासाठी

डायथेन एम-४५ (०.२५ टक्के)

किंवा

डायफोलँटॉन (०.२ टक्के) च्या फवारणीची शिफारस करण्यात आली आहे.

रोग दिसताच तीन फवारण्या १५ दिवसांच्या अंतराने घ्याव्यात.

♥टोमँटोवरील करप्याच्या प्रभावी नियंत्रणासाठी तसेच त्याचे उत्पादन वाढविण्यासाठी खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार फवारण्या घेण्याची शिफारस करणेत आली आहे. -

पहिली फवारणी कार्बेन्डँझीम ५० डब्ल्यू.पी. (०.१५ टक्के)

दुसरी फवारणी मँन्कोझेब ७५ डब्ल्यू.पी. (०.२टक्के) आणि

तिसरी फवारणी कॉपर ऑक्सीक्लोराईड ५० डब्ल्यू.पी. (०.२५ टक्के)

किंवा - -

पहिली फवारणी क्लोरोथँलोनिल ४० एस.सी. किंवा (०.१ टक्के),

दुसरी फवारणी मँन्कोझेब ७५ डब्ल्यू.पी. (०.२ टक्के) आणि

तिसरी फवारणी कॉपर ऑक्सीक्लोराईड ५० डब्ल्यू.पी. (०.२५ टक्के)

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

♥अल्टरनेरीया करपा -

टोमँटोवरील अल्टरनेरीया करप्याचा नियंत्रणासाठी व त्यातून जास्त उत्पादन मिळविण्यासाठी

निमपावडर (५ टक्के)

किंवा

मँन्कोझेब (०.२५ टक्के) च्या पाच फवारण्या लागणीनंतर १५ दिवसांच्या अंतराने घेण्याची शिफारस करणेत आली आहे.

टोमँटोवरील बक आय रॉट या रोगाच्या प्रभावी नियंत्रण साठी

प्रोपिनेब ०.१५ टक्के

किंवा

मँन्कोझेब ०.२५ टक्के च्या चार फवारण्या रोग दिसल्यापासून १० दिवसांच्या अंतराने घ्याव्यात .

♥टोमँटोमधील वैशाली या जातीमधील स्पॉटेड विल्ट व्हाईरस या रोगाचा प्रादुर्भाव करणेसाठी आणि उत्पादन वाढविणेसाठी कार्बोफ्युरॉन १.२५ किलो प्रती हेक्टर वाफ्यामध्ये देण्याची व नंतर एन्डोसल्फान ०.०५ टक्के च्या तीन फवारण्या १५ दिवसांच्या अंतराने घेण्याची शिफारस करणेत आली आहे.

(वरिल शिफारस स्वजबाबदारी वर वापर करावा!)

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!