मिरची तणनाशक वापर असा कराल
मिरची तणनाशक वापर असा कराल♥प्रगतशील शेतकरी♥
♥मिरचीचे शेत तयार कऱण्यापुर्वी
तणनाशकातील घटक - ऑक्झिफ्लोरफेन
व्यापारी/कृषी केंद्रातील नाव - गोल
शेत तयार करण्यापुर्वी वापरावे. रुंद पानांचे तण उगवणीपुर्वी आणि उगवणीनंतर देखिल नियंत्रण करते. पिक लागवडीपुर्वी शेताची मशागत करुन मगच लागवड करावी. लागवड करण्याच्या ९० ते १२० दिवस अगोदर वापरावे.
----------------------------------------------------------------------------
♥तयार केलेल्या शेतावरिल तण नियंत्रण
♥तणनाशकातील घटक - पॅराक्वेट
व्यापारी/कृषी केंद्रातील नाव - ग्रामोक्झोन
तण १ ते ६ इंचाचे असतांना वापरावे. तणसोबत उगवुन आलेले किंवा पुर्नलागवड केलेले रोप देखिल मरुन जाते, त्यामुळे लागवड करण्यापुर्वी वापरावे. दुपारच्या उन्हात फवारणी केलेली जास्त फायदेशिर ठरते.
♥ तणनाशकातील घटक - ग्लायफोसेट
व्यापारी/कृषी केंद्रातील नाव - ग्लायसेल, राउंडअप
तणाच्या उंचीवर बहुतांशी नियंत्रण अवलंबुन असते. पिक पेरणी (पुर्नलागवड नव्हे) च्या तिन दिवस आधी पर्यंत वापर केलेला चालतो.
---------------------------------------------------------------------------------
♥ मिरचीचे शेत उगवणीनंतर
♥ तणनाशकातील घटक - पेंडीमेथिलिन
व्यापारी/कृषी केंद्रातील नाव - टाटा पनिडा, स्टॉम्प
पुर्नलागवड केलेल्या मिरची साठीच उपयुक्त, लागवड करण्यापुर्वी किंवा लागवड केल्यानंतर वापरता येते. फवारणी करतांना जमिनीला चिकटुन फवारणी करावी, मिरचीच्या पानांवर उडाल्यास पिकास इजा पोहचते, काळजी पुर्वक फवारणी घ्यावी.
♥ तणनाशकातील घटक - ऑक्झिफ्लोरफेन
व्यापारी/कृषी केंद्रातील नाव - गोल
फवारणी करतांना जमिनीला चिकटुन फवारणी करावी, मिरचीच्या पानांवर उडाल्यास पिकास इजा पोहचते, काळजी पुर्वक फवारणी घ्यावी.
♥ तणनाशकातील घटक - मेटाक्लोर
व्यापारी/कृषी केंद्रातील नाव - मॅचेट
फवारणी करतांना जमिनीला चिकटुन फवारणी करावी, मिरचीच्या पानांवर उडाल्यास पिकास इजा पोहचते, काळजी पुर्वक फवारणी घ्यावी.
(जरी वरिल माहिती उपयुक्त आहे तरी तणनाशक शिफारस स्व-जबाबदारी वर वापरावे!)
संकलित!
माहिती खूप उपयुक्त आहे
ReplyDeleteमिरची पिकात कोणते तणनाशक वापरावेत
ReplyDeleteगोल हे तणनाशक वापरावे पण मिरचीच्या पानावर पडू देऊ नये
Deleteमीरची चार फुट ऊंचीची आहे कोणते तण नाशक वापरायला हवे
ReplyDeleteमिर्चीमध्ये कोणते तणनाशक योग्य राहील
ReplyDeleteमिरची पिकात कोणते तणनाशक वापरावेत मिरची चलू ज़ाली आहे
ReplyDelete