मैत्री दिनानिमीत्त...थोडे मिंत्राबद्दल
मैत्री दिनानिमीत्त थोडे मिंत्राबद्दल♥प्रगतशील शेतकरी♥
♥आयुष्याच्या वळनावर भेटले काही अनोळखी मित्र ,
त्याच्या संगतीत बदलले माझ्या आयुष्याचे चित्र,
घट्ट होत गेली आमच्यातली नाती , जवळ येत गेली आमची मन,
अशीच आयुष्यभर निभावत राहू हि मैत्री , हि यारी
कारण "तेरी मेरी यारी मग विसरुन गेलो दुनियादारी "
------------------------------------------------------------------------------------
♥सुख दुःखाच्या क्षणांत
साथ मैत्रीला देत चला,
चिमुकल्या यशालाही
आनंदाने मिरवीत चला....
आहे कुणी सोबत म्हणून
धीर जरासा मिळेल....
आत्मविश्वास वाढविणारा
आधार मैत्रीचा मिळेल....
तुझं माझं असं काही नाही
असाच मैत्रीचा नारा,
असावा मित्रपरिवार सर्वांचा
एकमेकांना समजून घेणारा....
टिकून राहो नेहमी
अशीच गोड ही मैत्री,
एकमेकांस सांभाळून
घेण्याची अशी ही खात्री....
------------------------------------------------
♥आपली मैत्री
आपल्या नात्यात आहे ,प्रेमाची सावली
त्यातून फुलली ,स्नेहाची पालवी !
मैत्रीत आहे ,मायेची साखळी
गुंफून ठेवतेय ,सर्वांना जवळी !
मैत्रीत नाही ,कधीच दूरावा ,
आलाच रुसवा ,तरी ठरला फसवा !
शब्दात आहे ,साखर पेरणी
कधीच नाहीत ,टोकाची बोलणी !
सर्वात आहे , कायम विश्वास
कधीच नाही ,मैत्रीत दुस्वास !
मैत्रीत आहे ,आधार हक्काचा
हलका होतो ,ताण मनाचा !
मैत्रीत आहे ,मोहक ताजगी
मोकळ्या मनात ,काही नाही खाजगी !
मैत्रीत नाही ,उगीच नाराजी
ध्यानात असते ,सर्वांची मर्जी !
सतत फुलवा ,हा बहर मैत्रीचा
गन्धून टाकावा ,दिवस सर्वांचा !
तुमची आमची ,मैत्री ही सुखाची
जपून ठेवावी ,आहेही मोलाची !
---------------------------------------------------
♥आयुष्य म्हणजे...
४ मित्र
४ ग्लास
१ टेबल
गरम चहा
आयुष्य म्हणजे...
१ बाईक
१ मात्रीन
ट्राफिक पोलीस
आणि पिक्चर ला उशीर
आयुष्य म्हणजे...
१ मित्राचे घर
हलका पावूस
आणि खूप खूप गप्पा
आयुष्य म्हणजे...
कोलेज चे मित्र
बंक केलेले लेक्चर
तिखट १ सामोसा
आणि बिला वरून भांडण
आयुष्य म्हणजे...
फोन उचलल्यावर
मित्राची शिवी
आणि
सॉरी बोलल्यावर आणखी
१ शिवी
आयुष्य म्हणजे...
३ वर्षा नंतर
अचानक जुन्या मित्राचा
ढोलीत पडलेला फोटो
आणि डोळ्यात आलेले अश्रू .....
---------------------------------------------
♥मैत्री हा असा एक धागा,
जो रक्ताची नातीच काय
पण परक्यालाही खेचून आणतो
आपल्याही मनाला जवळचा करून ठेवतो
आपल्या सुख-दु:खात तो स्वत:ला सामावून घेतो...
मैत्री करण्यासाठी नसावं लागतं श्रीमंत आणि सुंदर
त्याच्यासाठी असावा लागतो फ़क्त मैत्रीचा आदर...
----------------------------------------------------------------------
♥काहीजण मैत्री कशी करतात?
उबेसाठी शेकोटी पेटवतात अन
जणू शेकोटीची कसोटी पहातात...
स्वार्थासाठी मैत्री करतात अन
कामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात...
शेकोटीत अन मैत्रीत फ़रक काय?
दोन्हीपण एकच जाणवतात...
मैत्री करणारे खूप भेटतील
परंतू निभावणारे कमी असतील
मग सांगा, खरे मित्र कसे असतील?
कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात
कधी प्रेमाची बात, अशी असते
निस्वार्थ मैत्रीची जात...
या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो?
नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच
अडखळला, मित्र या शब्दाचा अर्थ
तो दूर गेल्यावर कळला...
आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं
सुख-दु:खाच्या क्षणी आपल्या मनाला जपणारं
जीवनाला खरा अर्थ समजावणारं
काय चिज असते नाही ही मैत्री ?
----------------------------------------------------
♥मैत्री असावी अशी... मैत्रीसारखी
हसत राहणारी.., हसवत राहणारी...
संकटकाळी हात देणारी...
आनंदी समयी साद घालणारी...
मनाची कवाडे उघडून डोकावणारी...
काहीं गुपितांचे राखण करणारी...
मन मोकळे करुन सारं सांगणारी...
सांगता सांगता मोहीत करणारी...
कधी कुणाला न लुटणारी...
चांगल्याच कौतुक करणारी...
तितकीच चूका दाखविणारी...
शूध्द सोन्याप्रमाणे चम चम चमकणारी...,
मैत्री असावी अशी... मैत्रीसारखी
----------------------------------------------------
संकलित!
Comments
Post a Comment