वांगीवरील अळीचे नियंत्रण असे कराल
वांगीवरील अळीचे नियंत्रण असे कराल ♥ प्रगतशील शेतकरी ♥
♥या किडींमुळे वांगी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
♥ह्या अळ्या शेंड्यातून खोडात शिरुन आतील भाग पोखरुन खातात आणि त्यामुळे झाडाचे शेंडे वाळून झाडाची वाढ खुंटते फळे लहान असतांना अळी देठाजवळून फळात शिरुन फळाचे नुकसान करते यासाठी
♥ वांगीवरील अळीचे नियंत्रण एकात्मिक उपाय केले तरच नियंत्रण शक्य आहे!
♥ वांगीवरील अळीचे एकात्मिक नियंत्रणासाठी खालील उपाययोजना करावी
♥आळीग्रस्त शेंडे काढून टाकावेत.
♥फवारणीसाठी
क्लोरोपायरीफॉस १७ मि.ली. प्रती १०लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
♥त्यानंतर
निंबोळी अर्क ५ टक्के ची ( निंबोळी पावडर ५ किलो प्रती १०० लिटर पाणी याप्रमाणे भिजवून आर्क काढून घ्यावा ) फवारणी करावी.
♥त्यानंतर
डेमिथोएट १५मिली + नुवान ८ मि.ली. प्रती १० लिटर पाणी मिसळून फवारणी करावी.
♥त्यानंतर निंबोळी आर्काची फवारणी घ्यावी.
♥पिक सशक्तिकरण करिता माती परिक्षणानुसार मुख्य अन्नद्रव्याची मात्रा द्यावी अन्यथा डी.ए.पी. ०•५ टक्के व १३:०:४५ हे ख़त ०•५ टक्के च्या ८ दिवसाचे अंतराने फवारण्या कराव्यात.
♥ पिकांची शुक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता(असल्यास) भरुर काढण्याकरिता, माती परिक्षणानुसार शुक्ष्म अन्नद्रव्याची मात्रा द्यावी अन्यथा जमिनीतून झिंक सल्फेट, फेरस सल्फेट, मॅग्निज सल्फेट १० किलो प्रत्येकी व बोरँक्स २किलो प्रती एकर प्रमाणे शेणखतासोबत द्यावे.
किंवा
शुक्ष्म अन्नद्रव्य २लीटर प्रती ३०० लीटर पाणी याप्रमाणे २० दिवसाचे अंतराने फवारणी करावी.
♥लैगिक गंध सापळे(फेरोमन ट्रॅप) ५ प्रती अर्धा एकर प्रमाणे लावावीत त्यातील गोळी दर १५ दिवसांनी बदलावी.
♥प्रकाश सापळे(लाईट ट्रॅप) १ प्रती अर्धा एकर क्षेत्रात लावावा.
♥जिवाणू खते अझाटोबँक्टर २ किलो + पी.एस.बी. २ किलो + शेणखत मिसळून जमिनीतून द्यावे.
(वरिल शिफारस जरी उपयोगी असली तरी वापरकर्त्याने स्व-जबाबदारिवर वापरावी!)
संकलीत!
Comments
Post a Comment