जिवामृत किंवा घनजिवामृत का व कसे तयार कराल
जिवामृत किंवा घनजिवामृत का व कसे तयार कराल♥प्रगतशील शेतकरी♥
♥जिवामृत किंवा घनजिवामृत का तयार कराल
पिक उत्पादन वाढविण्यासाठी आवश्यक व पोषक घटक जिवामृतात असतात.
देशी गाईचेच ताजे शेण घ्या कारण त्यात नत्र स्फुरद पालाश उपलब्ध करुन देणारे जिवाणु असतात तसेच ज्या पिकाला द्यायचे त्या पिकाच्या मुळयावरील माती घ्या कारण त्यापिकास अन्नद्रव्य उपलब्ध करुन देणारे उपयुक्त जिवाणु असतात व बांधावरील समृद्ध माती मुठभर कारण तीच्यात विविध उपयुक्त बुरशी असतात ह्या सर्व किण्वन क्रियेत वाढतात व तेच आपण जिवामृतातुन उपलब्ध करुन देत असतो
♥ घनजिवामृत सामग्री
ताजे गाईचे शेणखत १०० किलो
बांधावरील समृद्ध माती
गुळ १ किलो
बेसन १ किलो
♥आपल्या कडे असलेले उपलब्ध शेणखत जमीन सारवुन सावलीच्या ठिकानी किंवा झाडाखाली शेतात वा जेथे सोयीचे असेल तेथे वाहुन घ्या, जिवामृत तयार करुन १०० किलोला २० लिटर या अंदाजाने त्यात जिवामृत टाकुन फावड्याने कालवुन गोणपाटाने ७२ तास झाकुन ठेवा, नंतर पसरवुन सुकवुन घ्या ढेकडे फोडुन रेतु गाळायच्या गाळणी/चाळणी ने गाळुन गोणी भरुन पाणी लागणार नाही अशा जागी ठेवा जमिनीवर लाकडी फड्या वगैरा ठेवुन त्यावर झाकुन ठेवा वर्षभरात केव्हाही वापरता येईल.
ताजे शेण असेल तर १०० किलो ला +
१ किलो गुळ व+
१ किलो बेसन मिसळुन
७२ तास झाकुन ठेवा,
नंतर उन्हात पसरुन सुकवून गाळुन कोरड्या जागी भरुन ठेवा.
पेरणी आधी हे तयार करुन जमीनीवर
एकरी ४०० किलो पसरवुन वखराने मातीत कालवुन घ्या, व
पेरणी करतांना पण पेरुन द्या्.
-----------------------------------------------------------------
♥जिवामृत सामग्री
प्लास्टिक किंवा सिमेंट ची टाकी
गाईचे ताजे शेण १० किलो
गोमुत्र ५ते१० लिटर
काळा गुळ १ किलो
ऊसाचा रस २ते४ लिटर
किंवा
ऊसाचे बारीक तुकडे १० किलो
किंवा
देशी गोड ज्वारीचे धाटाचे१० किलो तुकडे
किंवा
नारळाचे पाणी १ लिटर
किंवा
गोड फळांचा गर(चिकु, केळी, पपई,पेरु, आंबे, किन्नो) १ किलो
कडधान्याचे बेसन(चवळी, चना, मुग, उडीद, हरबरा) १ते२ किलो
शेताच्या बांधावरील किंवा जंगलातील किंवा पिकाच्या मुळ्यावरील माती
ज्युटचे बारदान(पोते)
(ट्रालित किती शेणखत बसते तो अंदाज़ घेवुन तेवढे जिवामृत तयार करणे ते त्यात टाकुन झाकुन ठेवणे)
१००किलो खतात२० लिटर पहिल्यांदा च तयार केलेले ७ दिवसाच्या आत
घनजिवामृत किंवा जिवामृत देवुन शिल्लक राहीलेली रबडी२० लिटर टाकु शकता.
-------------------------------------------------------------
♥"" जिवामृत "" जिवामृत बनवण्यासाठी
एक प्लास्टिक ची टाकी किंवा सिमेंट टाकी सावलीत ठेवावी, टाकी गोल असावी,
त्यात २००लिटर पाणी घ्यावे, व
+
त्यात देशी गाईचे ताजे शेण १० किलो
+
५ते१० लिटर गोमुत्र
+
१ किलो काळा गुळ किंवा
+
खालीलपैकी कोणताही एक घटक
२ते४ लिटर ऊसाचा रस किंवा ऊसाचे१० किलो बारीक तुकडे
किंवा
देशी गोड ज्वारी च्या धाटाचे१० किलो तुकडे
किंवा
१ लिटर पक्व नारळाचे पाणी
किंवा
१ किलो गोड फळांचा गर(चिकु, केळी, पपई,पेरु, आंबे, किन्नो)
+
१ते२ किलो कडधान्याचे बेसन(चवळी, चना, मुग, उडीद, हरबरा)
+
शेताच्या बांधावरील किंवा जंगलातील किंवा ज्या पिकास द्यायचे त्या पिकाच्या मुळ्यावरील माती यात घ्यावयाचे..
-----------------------------------------------------------------
♥जिवामृत बनविण्याची प्रक्रिया अशी करा
आधी२०० लिटर पाणी टाका.
सुरवातीला त्या पाण्यामध्ये हाताच्या बोटाने शेण कुसकरुन फोडुन कालवुन पाण्यात मिसळा.
नंतर गोमुत्र टाकाव गोड पदार्थ टाका.
एका दुसर्या भांड्यात पाणी घेवुन त्यात बेसन टाका
वे व हाताने मिसळुन एकजीव करावे व नंतर ते२०० लिटर पाण्यात टाकावे
व सोबत मुठभर माती टाकावी.
नंतर काठीने घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने ते द्रावण चांगले ढवळावे.
नंतर त्यावर ज्युटचे बारदान(पोते) झाकुन ठेवावे.
हे जीवामृत द्रावण सावलीमध्ये २ते ३ दिवस किण्वन क्रियेसाठी ठेवावे.
त्यावर थेट सुर्यप्रकाश पडु देवु नये.
रोज सकाळ संध्याकाळकाडीने दोन मिनटासाठी ढवळावे.
सछिद्र बारदानाच्या छिद्रातुन जीवामृत तयार होतांना उत्सर्जित झालेला अमोनिया, कार्बन मोनो आक्साईड, कर्बाम्लवायु व मिथेन हे वायु वातावरणात निघून जातात.
४८ ते७२ तास किण्वन क्रिया चालल्यानंतर पुढे सात दिवसांपर्यंत सिंचनाच्या पाण्यासोबत त्याचा उपयोग करता येतो.
७ दिवसानंतर त्याचा उपयोग करु नये जमीनीवर फेकुन द्यावे.
देशी गाईचेच ताजे शेण घ्या कारण त्यातनत्र स्फुरद पालाश उपलब्ध करुन देणारे जिवाणु असतात तसेच ज्या पिकाला द्यायचे त्या पिकाच्या मुळयावरील माती घ्या कारण त्यापिकास अन्नद्रव्य उपलब्ध करुन देणारेउपयुक्त जिवाणु असतात व बांधावरील समृद्ध माती मुठभर कारण तीच्यात विविध उपयुक्त बुरशी असतात ह्या सर्व किण्वन क्रियेत वाढतात व तेच आपण जिवामृतातुन उपलब्ध करुन देत असतो
जिवामृत तयार झाल्यावर ते न ढवळता गाळुन घेणे किंवा पाटपाण्यातुन देणे, राहीलेल्या गाळात फक्त पुन्हा तेवढेच पाणी टाकुन ढवळणे व शांत झाल्यावर किंवा दुसर्या दिवशी देणे पुन्हा ईतर पदार्थ टाकण्याची आवश्यकता नाही तेवढ्याच शेणगोमुत्रात असे तीन वेळा जिवामृत तयार होते परंतु हे ७ दिवसाच्या आतच देणे
एकरी २००लिटर जिवामृत दर१५-२०दिवसांनी देणेे
संकलित!
छान माहिती आहे
ReplyDeleteNice Information in simple word.
ReplyDelete