आपल्या मुलांना उच्च शिक्षण जरुर द्या,पण सोबत माणुसकी पण जरूर शिकवा!

आपल्या मुलांना उच्च शिक्षण जरुर द्या,*
*पण सोबत माणुसकी पण जरूर शिकवा*

*माणुसकी*

कुटुंबातील आई वडिलांनी उपाशी राहुन आपल्या दोन्ही मुलांना उच्च शिक्षण दिले.
मुलंही अभ्यासात हुषार !
दोघांनी शिक्षण घेवून अमेरिकेत उच्च पदावर नोकरी मिळवली.
अनेक लटपटी करुन अमेरिकेतच आपले बस्तान बसविले.
दोघांनीही अमेरिकन मुलींशी लग्न करुन संसार थाटला.
आता भारतात येणं दुर्मिळ झालं.

अशातच आई गेल्याची वार्ता दोघांनाही पोहोचली.
धाकटा मुलगा उशीरा, सर्व सोपस्कार झाल्यावर गावी पोहोचला.

दोनच दिवसांनी बाबांच्या हातात लाख रूपये ठेवले व म्हणाला
"बाबा मी निघतो, आज रात्रीची फ्लाईट आहे".

बाबा न राहवुन बोलले,
"अरे तू आलास पण तुझा दादा?"
"त्याचं काय आहे बाबा,मी दादाला फ़ोन केला होता, मात्र वर्कलोड जास्त असल्यामुळे त्याला येणं शक्य नव्हते.
त्यामुळे तोच म्हणाला,
"यावेळी तू जा, बाबांच्या वेळी मी जाईन....!"

बाबा काहीच बोलले नाहीत.

*आपल्या मुलांना उच्च शिक्षण जरुर द्या,*
*पण सोबत माणुसकी पण जरूर शिकवा.!*

🙏🙏🙏🙏

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

भगत सिंह के अनमोल विचार ... Bhagat Singh Quotes in Hindi & English