मिरची या पिकांसाठी खत व्यवस्थापन असे करावे

मिरची या पिकांसाठी
खत व्यवस्थापन असे कराल♥प्रगतशील  शेतकरी♥

♥मिरची खत व्यवस्थापन :

लागवडीसाठी वाफे तयार करण्यापूर्वी २० ते २५ टन चांगले कुजलेले शेणखत प्रति हेक्टरी जमिनीत मिसळावे.

मिरची पिकासाठी
१००:५०:५० किलो नत्र: स्फुरद : पालाश प्रति हेक्टरी द्यावे.

लागवडीच्या वेळी संपूर्ण स्फुरद, पालाश व
अर्धा नत्राचा हफ्ता लागवडीनंतर ४ ते ६ आठवड्यांनी म्हणजे फलधारणेच्या वेळी द्यावा.

लागवडीच्या वेळी २० ते २५ किलो फेरस सल्फेट व झिंक सल्फेट पर हेक्टर द्यावे.

निंबोलीपेन्ड ८ ते १० बॅग प्रती हेक्टर द्यावे.

वरील सर्व खते म्हणजे NPK, मिक्रोनुट्रिएन्ट व निंबोलीपेन्ड हे बेड मध्ये भरावे व मातीने झाकावे.
खतांची मात्रा दिल्यानंतर ताबडतोब पाणी द्यावे व नंतर मिरचीचे रोप लावावे.

♥मिरची साठी फवारणी व ड्रीप द्वारे खत व्यवस्थापन

१९ : १९ : १९ लागवडीनंतर १५ व २५ दिवसांनी फवारणीतून ५ ग्रॅम प्रती लिटर किंवा ड्रीप मधून २ किलो प्रती एकर असे दोन वेळेस द्यावे.

मायक्रोन्युट्रिएन्ट लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी फवारणीद्वारे ५ मि. ली प्रती लिटर किंवा ड्रीप मधून १ लिटर प्रती एकर द्यावे.

फुलोरा अवस्थेत १३ : ४० : १३ व १२ : ६१ : १० दिवसाच्या आंतराने फवारणीद्वारे ७ ग्रॅम प्रती लिटर किंवा ड्रीप मधून ३ किलो प्रती एकर द्यावे.

मायक्रोन्युट्रिएन्ट लागवडीनंतर ५५ ते ६० दिवसांनी फवारणीद्वारे ५ मि. ली प्रती लिटर किंवा ड्रीप मधून १. ५ लिटर प्रती एकर द्यावे.

फळ धारण होत असतांना 00 : ५२ :३४ दोन वेळा १० दिवसांच्या आंतराने फवारणीद्वारे १० ग्रॅम प्रती लिटर किंवा ड्रीप मधून ५ किलो प्रती एकर द्यावे.

फळ पोसत असतांना १३ : 00 : ४५ व 00 : 00 :५०, १० दिवसांच्या आंतराने फवारणीद्वारे १० ग्रॅम प्रती लिटर किंवा ड्रीप मधून ५ किलो प्रती एकर द्यावा.

(वरिल शिफारस माती परिक्षणानुसार बदलेल!)

संकलित!

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!