डाळिंब जैविक शेती..
डाळिंब जैविक शेती♥प्रगतशील शेतकरी♥
डाळिंबात जीवाणु खत वापरतांना घ्यावयाची काळजी
♥शक्य तितके ताजे जीवाणु खत घ्या.
♥जर उत्पादका-कडून घेतले तर चांगले.
अड्वान्स नोंदवून घेतले तर जास्तच चांगले.
♥अझोटोबॅक्टर,
अझोस्पिरीलम,
एसिटोबॅक्टर (N),
शूडोमोनास स्ट्रायटा (P) व
♥फ्राउटेरीया औरेंन्शीया (K) शक्यतो द्रव माध्यमात
तर
रायझोबिअम (N) घन माध्यमातून घ्या
♥उत्पादकाने उत्पादनावर परवाना क्रमांक छापला आहे का ते तपासून घ्या.
♥उगाच भारंभार दाव्यांवर विश्वास ठेवू नका.
♥शेतात सोडताना, एक तर भरपुर शेणखत किवा कंपोस्ट मधे मिसळून सोडा
किवा
ड्रिप ने रोपाच्या मुळालगत सोडा.
♥बियाणे प्रक्रिया सर्वोत्तम पर्याय आहे.
♥कीटक नाशकापासून दूरच ठेवा.
------------------------------------------------------------------------------------------------
♥कीड आणि रोग नियंत्रणासाठी जैविक कीडनाशकाचा वापर करावा.
♥ट्रायकोडर्मा, पॅसिलोमयसिस, निंबोळी पेंड वापर करावा. यामुळं तेल्या आणि मर रोगापासून बाग मुक्त होउ शकते!
♥गांडुळांमुळं जमिनीची मशागत 8 फुटांपर्यंत होउ शकते.
♥प्रचंड संख्येनं प्लॉटमध्ये गांडुळं असल्यानं जमीन भुसभुशीत राहून ओलावा टिकून राहिण्यास मदत होते.
शिवाय फळं दिसायला आणि चवीलाही उत्तम आहेत. पाहताक्षणी हा फरक लक्षात येतो.
♥ तेलकट डाग, बॅक्टेरिया मुळे होणारा करपा किंवा तेल्या
2007 ते 2012 या काळात तेल्याचे डाळिंब उत्पादकांचे कंबरडे मोडले.
सुरुवातीला हे फळांवरील ठिपके आहेत असा सर्वांचा गैरसमज झाला.
मात्र आता ते तेलकट डाग किंवा तेल्या म्हणून ओळखले जावू लागलेत, ते त्यांच्या फळांवरील विशिष्ट तेलकट डागांमुळे.
याचे कारण झॅन्थोमोनास ऍक्सोनोपोडीस pv पुनिकी हा बॅक्टेरीया आहे, ज्याचा भाउबंद लिंबूवर्गीय फळातील कॅंकरमध्ये दिसून येतो.
त्याचा प्रसार झाडावरील जखमा आणि झाडाच्या नैसर्गिक छिद्रामधून होतो.
सुरुवातीला पाण्याने भरलेले फोड येऊन 2-3 दिवसात पाणी सुकून गडद लाल व तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात.
जुलै-सप्टेंबर व ऑक्टोबर मधील कालावधीत याचा प्रसार वेगाने होतो.
नियंत्रणाचे उपाय पुढील प्रमाणे:
प्रतिबंध: रोगट गोष्टींचा झाडाशी संबंध येऊ न देणे, बागेत वापरलेली उपकरणे , हत्यारे डेटाॅल किंवा मोरचुदच्या द्रावणाने(50g/L) स्वच्छ करूनच वापरणे, या गोष्टी कटाक्षाने पाळाव्या.
ओलसर जमिनीत शेणखत/ कम्पोस्ट मध्ये मिसळून जैविक बुरशीनाशकांचा चांगला उपयोग होतो.
5kg ट्रायकोडर्मा किंवा 2.5 kg ट्रायकोडर्मा+ 2.5kg पॅसिलोमयसिस प्रती हेक्टर वापरावा.
♥पिकातील मर
मर रोगात फांद्या सुकून पीक मेल्यासारखे दिसते, त्याची कारणे सेराटोसायटीस फिमब्रियाटा, फ्युसारियम ऑक्सीस्पोरम, रायझोक्टोनिया सोलानी या विविध बुरशिंचा प्रादुर्भाव तसेच सूत्रकृमी अशी बरीच आहेत.
सुरुवातीला पाने आणि फांद्या पिवळट, तपकिरी दिसतात आणि नंतर सुकून जातात,कालांतराने पूर्ण झाडही वाळून जाते.
हा रोग निचरा न होणा-या आणि भारी जमिनीत होतो.
कार्बेन्डॅझीम भिजवणीनंतर एक महिन्याने
1kg/acre ट्रायकोडर्मा + पॅसिलोमायसीस + 40kg शेणखत हे मिश्रण करून खोडाजवळ पसरा.
पिक सूत्रकृमी मुक्त ठेवा,सूत्रकृमीमुळे मुळांना बाधा पोहोचते व रोगांना शिरकाव मिळतो .
♥सूत्रकृमी
सूत्रकृमीमुळे केवळ मुळांना बाधा पोहचते असे नाही तर अनेक रोगांचे ते मूळ कारण बनतात.
यांच्या प्रतिबंधासाठी झेंडूची आंतरपीक म्हणून लागवड करावी,
त्याचबरोबर निंबोळी पेंड (1 टन /हे) मातीमधून द्यावे.
टोमॅटो, मिरची व वांगी या सूत्रकृमिला बळी पडणा-या पिकांची आंतरपीक म्हणून लागवड टाळावी.
संकलित!
Mast sir
ReplyDelete